वैशूने अत्यंत आनंदाने सर्वात आधी भावाला call लावला. दादा अरे मी कंपनीची सीईओ झाले. लगेच मला अत्यंत सन्मानाचे असे चे स्मार्ट वुमन ॲवॉर्ड ही मिळणार आहे. वहिनीलाही सांग आणि तुम्ही सगळे या माझ्या ॲवार्ड कार्यक्रमाला. मी तुम्हाला कळवते तसे. अरे वा अभिनंदन तुझे. म्हणत भावाने फोन ठेवला सुध्दा. आई बाबांची ची खूप आठवण येतेय. आज असायला हवे होते ते. माझे हे यश पाहायला. दादा नाराज आहे अजूनही. सारखा म्हणतो आई केव्हढी आठवण काढत होती तुझी जाताना. सगळा जीव तुझ्यात अडकला होता तिचा. पण तू यायला उशीर केलास. "
दादाची आजची रुक्षता तिला चांगलीच जाणवली. ती त्यावर विचार करीत असतानाच तिचा मोबाईल वाजला आणि अभिनंदनाचे एका मागून एक फोन यायला लागले. दुसऱ्या दिवशी तिने तिच्या कौटुंबिक whatsapp समुहांवर ही आनंदाची बातमी शेअर केली. तीन मामा, एक मावशी, चार काका, काकू, एक आत्या ,सगळी आते मामे चुलत भावंड. सगळ्यानी congratulation करीत तिला दाद दिली पण त्या व्यतिरिक्त काहीच नाही कुणी साधा फोन सुध्दा केला नाही. आई गेली तिच्या सोबत सगळी नाती सुध्दा संपलीत की काय? या विचाराने तिला अस्वस्थ केले. आज लवकर जायचय. मिटींग आहे. तीने आवरायला घेतले. ती केबीन मधे चेअरवर जाऊन बसली. मिटींग आटोपली तशी स्मिता मॅडम नी रजेचा अर्ज दिला. इतके दिवस कुठे जाताय? मामाकडे त्याच्या मुलीचे लग्न आहे जरा चार दिवस आधी जाते. तेव्हढीच माझी मदत होईल ना तयारीला. वेळेवर गेले की काय काम करणार न. मामाशी असलेले त्यांचे नाते आणि आजवर मामाने त्यांच्यासाठी केलेल्या गोष्टी सांगत त्या म्हणाल्या.
आपण ही जाणीव ठेवायला हवी ना. आई वडील असो वा नसो या नात्यानी जर आपल्याला विचारायला हवे असेल तर आपण ही त्याना वेळ द्यायला हवा. स्मिता मॅडम गेल्या आणि तिला एकदम आई आठवली. सारखी सांगायची. वैशू, अग आपल्या माणसांसाठी वेळ काढावा ग थोडातरी. सगळ्या मामा काका आत्या मावशीची केव्हढी लाडकी होते मी. उच्च शिक्षणाच्या निमित्याने ती पुण्यात आली तशी आई कायम फोनवर सांगायची. मामा काकाला एक फोन कर. मावज बहिणीला मुलगा झाला मावशी शी बोल जरावेळ. काकूची आई गेली परवा. तर मामे भावाला फर्स्ट क्लास मिळाला. प्रत्येकाच्या घरातल्या विशेष प्रसंगाना अधोरेखित करुन ती सतत मला फोन करण्यासाठी बजावायची. मी ही तिला हो म्हणायचे पण विसरायचेच. पण मामा काका आत्या मावशी मात्र शिक्षण होईपर्यंत नौकरी लागल्यावर सुध्दा आवर्जून फोन करणार. वाढदिवस किंवा माझ्या प्रत्येक यशाच्या वेळी माझे कौतुक माझ्यासाठी आर्वजून काहीतरी वस्तू आणणं सणावाराला अगदी आठवण ठेवून मला विचारणं. माझे कौतुक करणं. कामाच्या नी यशाच्या धुंदीत हे सगळं हळूहळू बंद होत चाललय हे लक्षातच आले नाही माझ्या.
दादाचे आणि माझे लागोपाठ लग्न झाली. या तीन वर्षात तर माहेरच्या नात्यातील माझी गुंतवणूक तर जणू संपूनच गेलीय आणि सासरी सुध्दा वेळ नाही ही सबब कायमच. खरच सासरी माहेरी कुठेच राहिले नाहीत आपले संबंध भांडण नाही कुणाशी पण नात्याचा स्नेहबंध ही नाही ना राहिला. तिला तिची वहिनी आठवली. सगळ्या नातेवाईकान्मधे अगदी प्रिय होती ती. अगदी माझ्या आईसारखी. वाढदिवसाला आवर्जून फोन सणावाराला भेट देणं. तिच्या घरी कायम सगळ्यांच येणजाणं. ॲवार्ड कार्यक्रमाला सगळे येतीलच त्यावेळी नक्की संवाद साधायचा. वैशुने मनोमन ठरवले. ॲवार्ड कार्यक्रमाचा दिवस वैशू स्टेजवर. ॲवार्ड घेतेय. तिने समोर पाहिले तर फक्त सगळे निमंत्रित. आप्त कुणीच नाही. टाळ्या वाजत होत्या. पण त्या मनापासून होत्या का? लग्नानंतर आई तिला एकदा म्हणालेली. एका ती ची गोष्ट सांगतेय तुला. नीट ऐक. विचार कर गोष्टीचे नाव आहे "निर्णय" पण मला वाटतं या गोष्टीचे नाव "भान" असायला हवे होते. नाव असू दे काहीही त्यातला मतितार्थ वेळीच लक्षात घे हो. सांगतेय ऐक जरा.
आज "ती" यशाच्या उंच शिखरावर विराजमान झालीय. सहज म्हणून ती खाली पाहते. असंख्य दिसतात तिला पण तिच्यासाठी मनापासून टाळ्या वाजवणारे तिच्या कौतूक करणारे तिला कुठेच दिसत नाही. अगदी परवा परवा पर्यंत अवतीभवती असणारी सारी गेली कुठे? ती शोधू लागते. त्यांच्या आठवणीनी बेचैन होते. यशाची शिखरे चढतांना नकळतपणे एकेक हात सुटत जाताना दिसू लागतो. सगळे आहेत पण माझ्यापासून दूर खूप दूर गेल्यासारखे वाटताहेत. काय चूकल माझ ? माझा करीयरचा निर्णय? फोन वाजतोय माझा. अरे वा मावशीचा फोन
thanks तू फोन केलायस फक्त. तुला काहीतरी विचारायचय मला. काय चुकलेय माझं?
हो सांगते ना.
करीयर चा निर्णय चुकीचा नव्हता आणि नाही पण निर्णया मागे धावताना ज्यानी तुला निर्णयात साथ दिली त्या आपल्या माणसांसाठी थोडा तरी वेळ काढायला हवा ना. संवादाच्या हजारो माध्यमातून जगभर संवाद साधताना आपल्या माणसाना मात्र तू गृहीतच धरलस अस नाही का वाटत तुला. निर्णय घेतला यश ही मिळाल पण निर्णय ते यश या प्रवासात माणस दूर गेली. भान महत्वाच ...😊 त्या गोष्टीतली "ती" कधीतरी "मी" असणार आहे हे आईला आधीच कळलेले का ?
सौ साधना डोंगरे 😊🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा