खूप जवळच्या मित्राची आई गेली.
मी आणि आमचे आणिक काही मित्र
असे तिथं होतोच...
अगदी शेवटपर्यंत.
अग्नी देण्याआधी गुरुजींनी जमलेल्यांना
पार्थिवावर चंदनाच्या काड्या वाहायला सांगून,
अप्रदक्षिणा घालायला सांगितली.
अप्रदक्षिणा म्हणजे उलटी प्रदक्षिणा...
अँटीक्लाॅकवाईज.
मित्राचे बाबा वृद्धत्वामुळं,
वाॅकिंग स्टीक घेऊन चालतात...
आणि योगायोगानं त्यांच्या जवळ
त्यावेळी मीच असल्यानं,
मी त्यांना धरून त्यांच्याकडून
चंदनाच्या काड्या वाहवल्या.
ते झाल्यावर त्यांना धरून,
अप्रदक्षिणा घालू लागलो.
काका अतिशय शांत आणि कंट्रोल्ड होते.
पायापासून फेरी मारत आम्ही,
काकूंच्या चेहर्यापाशी आलो…
आणि अगदी पाचेक सेकंदांकरता
काका थांबले.
त्यांच्या तिथं थांबण्यामुळं,
अर्थातच मीही थांबलो.
काकांनी काकूंकडे पाहिलं…
आणि एक हात हवेत उंचावत,
त्यांनी तो किंचितसा हलवला.
मानेनं अगदी हलकसं ‘हो’ केलं त्यांनी…
आणि ते पुढं सरकले.
आता हे आणखी कुणी
पाहिलं असेल की नाही, माहीत नाही.
पण मी अगदी त्यांना चिकटूनच असल्यानं,
मला हे स्पष्ट दिसलेलं.
काका नक्कीच काहीतरी बोलले होते काकूंशी!
कदाचित म्हणाले असतील की…
‘पहिल्यांदाच एकटी इतकी लांब चाललीयेस,
काळजी घे स्वतःची…’
किंवा म्हणाले असतील…
‘पहिल्यांदाच तुझ्याशिवाय
रहावं लागणारेय इतकं…
कसं जमेल कुणास ठाऊक!’
की ते म्हणाले असतील…
‘मुलांची काळजी करू नकोस गं,
मी आहे त्यांच्यासोबत!’
की काहीच बोलले नसतील काका?
म्हणजे तो उंचावलेला हात,
नी ती हलवलेली मान…
ह्या अनुक्रमे ओपनिंग अन् क्लोजींग ब्रॅकेटमध्ये,
खरंच काहीही नसेल…?
रिकामाच असेल तो कंस?
कारण आधिच्या पिढीला तशीही
संवादांची विशेष अशी गरज पडतच कुठे होती?
एकमेकांच्या मौनातूनच तर
सारं काही समजायचे ते लोक.
अख्खा संसार व्हायचा त्यांचा…
एकमेकांच्या डोळ्यांतून!
पण हे पाहून क्षणभराकरताच,
माझ्या घशात मात्र आवंढा दाटून आला.
एक अप्रदक्षिणा झाल्यावर
काकांनी मलाच विचारलं…
“एकच घालायची होती का?”
मी गुरुजींकडून कन्फर्म करुन घेत,
काकांना ‘हो’ म्हटलं
आणि मनात आलं माझ्या…
‘म्हणजे काकांना अजून काही
बोलायचं असावं का काकूंशी…?
त्यांनी काही ठेवलं असावं का बोलायचं
पुढच्या अप्रदक्षिणेला…?’
काका पुन्हा जाऊन खुर्चीवर बसले.
तेवढेच शांत आणि कंट्रोल्ड.
आणि सहजच मनात आलं माझ्या…
‘हे असं जोडीदाराशी बोलावसं वाटूनही,
तो मात्र नसेल ऐकायला…
तर कसं होत असेल…? बापरे…!!!’
नंतर त्या आगीनं वेढलेल्या काकू
आणि तिच्या धगीनं वेढलेले काका
मला एकाच पातळीवर दिसू लागले…
असहाय्य!
काकू बंद पडलेल्या घड्याळासारख्या…
आणि काका घड्याळ चालू असूनही,
काटे उलटे फिरत असल्यासारखे…
त्या अप्रदक्षिणेसारखेच…
अँटीक्लाॅकवाईज !
- सचिन देशपांडे
मी आणि आमचे आणिक काही मित्र
असे तिथं होतोच...
अगदी शेवटपर्यंत.
अग्नी देण्याआधी गुरुजींनी जमलेल्यांना
पार्थिवावर चंदनाच्या काड्या वाहायला सांगून,
अप्रदक्षिणा घालायला सांगितली.
अप्रदक्षिणा म्हणजे उलटी प्रदक्षिणा...
अँटीक्लाॅकवाईज.
मित्राचे बाबा वृद्धत्वामुळं,
वाॅकिंग स्टीक घेऊन चालतात...
आणि योगायोगानं त्यांच्या जवळ
त्यावेळी मीच असल्यानं,
मी त्यांना धरून त्यांच्याकडून
चंदनाच्या काड्या वाहवल्या.
ते झाल्यावर त्यांना धरून,
अप्रदक्षिणा घालू लागलो.
काका अतिशय शांत आणि कंट्रोल्ड होते.
पायापासून फेरी मारत आम्ही,
काकूंच्या चेहर्यापाशी आलो…
आणि अगदी पाचेक सेकंदांकरता
काका थांबले.
त्यांच्या तिथं थांबण्यामुळं,
अर्थातच मीही थांबलो.
काकांनी काकूंकडे पाहिलं…
आणि एक हात हवेत उंचावत,
त्यांनी तो किंचितसा हलवला.
मानेनं अगदी हलकसं ‘हो’ केलं त्यांनी…
आणि ते पुढं सरकले.
आता हे आणखी कुणी
पाहिलं असेल की नाही, माहीत नाही.
पण मी अगदी त्यांना चिकटूनच असल्यानं,
मला हे स्पष्ट दिसलेलं.
काका नक्कीच काहीतरी बोलले होते काकूंशी!
कदाचित म्हणाले असतील की…
‘पहिल्यांदाच एकटी इतकी लांब चाललीयेस,
काळजी घे स्वतःची…’
किंवा म्हणाले असतील…
‘पहिल्यांदाच तुझ्याशिवाय
रहावं लागणारेय इतकं…
कसं जमेल कुणास ठाऊक!’
की ते म्हणाले असतील…
‘मुलांची काळजी करू नकोस गं,
मी आहे त्यांच्यासोबत!’
की काहीच बोलले नसतील काका?
म्हणजे तो उंचावलेला हात,
नी ती हलवलेली मान…
ह्या अनुक्रमे ओपनिंग अन् क्लोजींग ब्रॅकेटमध्ये,
खरंच काहीही नसेल…?
रिकामाच असेल तो कंस?
कारण आधिच्या पिढीला तशीही
संवादांची विशेष अशी गरज पडतच कुठे होती?
एकमेकांच्या मौनातूनच तर
सारं काही समजायचे ते लोक.
अख्खा संसार व्हायचा त्यांचा…
एकमेकांच्या डोळ्यांतून!
पण हे पाहून क्षणभराकरताच,
माझ्या घशात मात्र आवंढा दाटून आला.
एक अप्रदक्षिणा झाल्यावर
काकांनी मलाच विचारलं…
“एकच घालायची होती का?”
मी गुरुजींकडून कन्फर्म करुन घेत,
काकांना ‘हो’ म्हटलं
आणि मनात आलं माझ्या…
‘म्हणजे काकांना अजून काही
बोलायचं असावं का काकूंशी…?
त्यांनी काही ठेवलं असावं का बोलायचं
पुढच्या अप्रदक्षिणेला…?’
काका पुन्हा जाऊन खुर्चीवर बसले.
तेवढेच शांत आणि कंट्रोल्ड.
आणि सहजच मनात आलं माझ्या…
‘हे असं जोडीदाराशी बोलावसं वाटूनही,
तो मात्र नसेल ऐकायला…
तर कसं होत असेल…? बापरे…!!!’
नंतर त्या आगीनं वेढलेल्या काकू
आणि तिच्या धगीनं वेढलेले काका
मला एकाच पातळीवर दिसू लागले…
असहाय्य!
काकू बंद पडलेल्या घड्याळासारख्या…
आणि काका घड्याळ चालू असूनही,
काटे उलटे फिरत असल्यासारखे…
त्या अप्रदक्षिणेसारखेच…
अँटीक्लाॅकवाईज !
- सचिन देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा