सायंकाळ झाली होती. वाराणसीच्या एका छोट्याशा रेल्वे स्थानकावर वाफेच्या इंजिनांचा आवाज आणि मंद दिव्यांचा प्रकाश पसरला होता. एक वृद्ध स्त्री हातात छोटेसे गाठोडे घेऊन धापा टाकत प्लॅटफॉर्मकडे धावत होती. तिच्या मनात एकच भीती होती.
"दिल्लीची शेवटची ट्रेन चुकली तर?"
पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. ती प्लॅटफॉर्मवर पोहोचली, तोच ट्रेनची शेवटची शिट्टी वाजली आणि ट्रेन निघून गेली. थकलेल्या ती वृद्धा एका जुन्या बाकावर जाऊन शांतपणे बसली.
हे पाहून जवळचा एक कुली पुढे आला आणि प्रेमाने विचारलं.
"मावशी, एवढ्या का काळजीत आहात? कुठे जायचं होतं?"
वृद्धा म्हणाली.
"बाळा, माझ्या मुलाकडे दिल्लीला जायचं होतं. पण शेवटची गाडी निघून गेली."
कुली म्हणाला.
"काळजी करू नका. आज इथेच विश्रांतीची व्यवस्था करतो. उद्या सकाळी ट्रेन मिळेल."
थोड्या गप्पांनंतर त्याने विचारलं.
"दिल्लीत तुमचा मुलगा काय करतो? मजुरी करतो का?"
तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं.
"नाही बाळा. माझा मुलगा रेल्वे खात्यात काम करतो."
कुली म्हणाला..
"वा ! मग त्याचं नाव सांगा. मी त्याला तार पाठवायचा प्रयत्न करतो."
ती अगदी सहज म्हणाली.
"मी तर त्याला 'लाल' म्हणते... पण जग त्याला 'लाल बहादूर शास्त्री' म्हणून ओळखतं."
हे नाव ऐकताच कुली थरथर कापू लागला. तो धावत स्टेशनमास्तरांकडे गेला.
"साहेब ! बाहेर बाकावर बसलेल्या मावशी म्हणजे आपल्या रेल्वेमंत्र्यांच्या आई आहेत!"
क्षणात संपूर्ण स्टेशन प्रशासन धावून आलं. स्टेशनमास्तरांनी त्यांच्या पायांवर डोकं ठेवलं. ते नम्रपणे विचारले.
"आई, शास्त्रीजींनी तुम्हाला कधी सांगितलं नाही का, ते नेमक्या कोणत्या पदावर आहेत?"
आई शांतपणे म्हणाल्या.
"सांगितलं होतं ना. म्हणाले होते, 'आई, मी दिल्लीच्या रेल्वे कार्यालयात एक छोटासा कर्मचारी आहे.'"
हे ऐकून स्टेशनमास्तरांच्या डोळ्यांत पाणी आलं. ते म्हणाले.
"आई, तुमचे संस्कार धन्य आहेत! 🙏
तुमचा मुलगा छोटा कर्मचारी नाही. तो संपूर्ण भारतीय रेल्वेचा प्रमुख आहे. तो भारताचा रेल्वेमंत्री आहे."
क्षणात संपूर्ण वातावरण बदललं. अधिकारी, पोलीस, सुरक्षा कर्मचारी सर्वजण तिथे पोहोचले. त्या साध्या दिसणाऱ्या आईला अत्यंत सन्मानाने दिल्लीला रवाना करण्यात आलं. आणि दिल्लीत बसलेला तो महान नेता आपल्या आईभोवती घडलेल्या या सगळ्या प्रसंगापासून पूर्णपणे अनभिज्ञ होता.
यातून काय शिकायला मिळतं?
आज अनेक जण छोट्या पदावर जाऊनही अहंकार दाखवतात.
पण लाल बहादूर शास्त्री यांनी स्वतःला आईसमोर फक्त "एक छोटासा कर्मचारी" म्हणून सांगितलं.
खरं मोठेपण पदात नसतं... ते स्वभावात, संस्कारात आणि नम्रतेत असतं. 🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा