तू बदललीस / तू बदललास" म्हणण्याआधी स्वतःला विचारा - तिला / त्याला बदलायला भाग पाडलं कोणी?
एखादी व्यक्ती अचानक बदलत नाही.
तिच्या बदलामागे अनेक दिवसांचा त्रास असतो, अनेक न बोललेल्या भावना असतात, अनेक वेळा गिळून टाकलेले अश्रू असतात आणि असंख्य वेळा स्वतःलाच समजावण्याचे प्रयत्न असतात.
म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती पूर्वीसारखी राहत नाही, तेव्हा लगेच तिला दोष देण्याआधी एकदा स्वतःला प्रश्न विचारा...
"ती अशी का बदलली? तो असा का बदलला?"
कारण कदाचित ती/ तो कालपर्यंत तुमच्यासाठी खूप काही सहन करत होती / होता.
तुमच्या छोट्या छोट्या चुका दुर्लक्षित करत होती /होता.
तुमच्या कठोर शब्दांना मनावर घेत नव्हती /नव्हता.
तुमच्या व्यस्ततेला समजून घेत होती / होता.
तुमच्या रागामागचं कारण शोधत होती / होता.
तुम्ही बदलाल या आशेवर पुन्हा पुन्हा विश्वास ठेवत होती/ होता.
पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते.
सुरुवातीला ती रागावते/ तो रागवतो.
मग समजावून सांगते/ सांगतो...
नंतर रडते/ रडतो...
पुन्हा शांत होते/ होतो...
आणि शेवटी अपेक्षा करणंच सोडून देते/ देतो.
आणि जेव्हा अपेक्षा संपतात, तेव्हा माणूस बदलल्यासारखा दिसतो.
पूर्वी तुमच्या एका मेसेजची वाट पाहणारी व्यक्ती आता उत्तराची घाई करत नाही.
पूर्वी तुमच्या एका शब्दाने दुखावणारी व्यक्ती आता तुमच्या शब्दांकडे दुर्लक्ष करते.
पूर्वी प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करणारी व्यक्ती आता मनातलं काहीच सांगत नाही.
पूर्वी तुम्ही कुठे आहात, काय करत आहात याची काळजी करणारी व्यक्ती आता विचारतही नाही.
मग आपण म्हणतो...
"तू खूप बदललीस/ तू बदललास..."
पण कदाचित ती बदलली नसते.
तिने फक्त स्वतःला वाचवायला शिकलेलं असतं.
कधी कधी माणूस प्रेम कमी झाल्यामुळे दूर जात नाही...
तो सतत दुखावलं गेल्यामुळे स्वतःभोवती एक भिंत उभी करतो.
कारण त्याला पुन्हा त्याच जागी जखम व्हायला भीती वाटते.
ज्याने प्रत्येक वेळी तुमचं मन जपलं, त्याचं मन तुम्ही किती वेळा जपलं?
ज्याने तुमच्या चुका माफ केल्या, त्याच्या चुका तुम्ही किती वेळा समजून घेतल्या?
ज्याने तुमच्या शांततेमागचा त्रास ओळखला, त्याच्या शांततेचा अर्थ तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला?
नातं फक्त प्रेमाने टिकत नाही.
प्रेमासोबत आदर हवा असतो.
आदरासोबत संवाद हवा असतो.
संवादासोबत समजूतदारपणा हवा असतो.
आणि या सगळ्यासोबत एकमेकांना जपण्याची इच्छा हवी असते.
एक व्यक्ती सतत देत राहिली आणि दुसरी व्यक्ती फक्त घेत राहिली, तर नातं कधी ना कधी थकणारच.
म्हणून एखादी व्यक्ती बदलली असेल तर तिच्यावर लगेच आरोप करू नका.
कदाचित तिच्या बदलामध्ये तुमच्या वागण्याचा काही भाग असेल.
कदाचित तिच्या शांततेमध्ये तुमच्या दुर्लक्षाचा आवाज असेल.
कदाचित तिच्या दूर जाण्यामागे तुमच्या वारंवार केलेल्या चुका असतील.
आणि कदाचित तिच्या "मला काही फरक पडत नाही" या वाक्यामागे कधी काळी "तू मला सोडू नकोस" अशी केलेली हजारो मनापासूनची विनंती दडलेली असेल.
सगळ्यात वेदनादायक गोष्ट कोणती माहिती आहे?
ज्याला आपण सर्वात जास्त जपलं, त्याच व्यक्तीसमोरच एक दिवस स्वतःच्या भावना सिद्ध कराव्या लागतात.
"मी तुझ्यासाठी इतकं केलं..."
पण खरं प्रेम हिशोब मागत नाही.
नातं टिकवताना कोणी किती दिलं, याची गणितं केली की नात्याची उब कमी होते.
त्याऐवजी एकदा एवढंच विचारा—
"आपण दोघांनी मिळून हे नातं किती जपलं?"
कारण नात्यात कोण जिंकलं हे महत्त्वाचं नसतं...
नातं टिकून राहिलं का, हे महत्त्वाचं असतं.
आणि जर आज तुमच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती पूर्वीसारखी बोलत नसेल, पूर्वीसारखी काळजी घेत नसेल, पूर्वीसारखी तुमच्याकडे पाहत नसेल...
तर तिच्यावर "बदललीस / बदललास" असा आरोप करण्याआधी तिच्या मनात डोकावून पाहा.
कदाचित ती तुमच्यापासून दूर गेलेली नसेल...
कदाचित तुम्हीच तिला इतकं दूर ढकललं असेल की आता परत येण्यासाठी तिच्याकडे ताकद उरलेली नसेल.
🌹 शेवटी एवढंच...
"तू बदललीस / तू बदललास" म्हणणं खूप सोपं आहे...
पण "तुला बदलायला मी भाग पाडलं का?" हा प्रश्न स्वतःला विचारण्याचं धैर्य फार कमी लोकांमध्ये असतं.
म्हणून नात्यातील माणूस बदलण्याआधी त्याला समजून घ्या.
त्याच्या शांततेकडे लक्ष द्या.
त्याच्या डोळ्यांतील थकवा ओळखा.
त्याच्या कमी झालेल्या अपेक्षा समजून घ्या.
कारण ज्याला आपण प्रेमाने जपलं असतं, त्याला बदलण्याची गरज पडत नाही... आणि ज्याला आपण सतत दुखावत राहतो, तो एक दिवस स्वतःला वाचवण्यासाठी नक्कीच बदलतो. 💔🌹
बरोबर ना 😊🙏

- स्मिता खलाटे जाधव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा