आई: तुमच्या पिढीप्रमाणेच...
मुलगा: काय?
आई: तुम्हाला आवडणाऱ्या पदार्थांची नावंसुद्धा अजब-गजब आहेत.
मुलगा: म्हणजे?
आई: मॅक अँड चीज, डिमसम, केसाडिया, नाचोज, साते...
मुलगा: मग नॉर्मल नावं कोणती?
आई: मिसळ पाव, पावभाजी, मसाला पाव, दाबेली...
मुलगा: हे पदार्थ आउटडेटेड मातोश्री..
आई: गाढवाला गुळाची चव काय?
मुलगा: मारला टोमणा.
आई: वास्तव आहे बाळा.
मुलगा: आपलं ठरलंय...
आई: काय?
मुलगा: जनरेशन गॅप दूर करण्यासाठी...
आई: हो, एकमेकांच्या भावनांचा आदर करायचा.
मुलगा: असं असूनही तू मला इनडिरेक्टली गाढव म्हणाली...
आई: अरे, ती फेमस म्हण आहे.
मुलगा: असू दे...
आई: तुझ्या इच्छेनुसार मी या रेस्टॉरंटमध्ये आले ना?
मुलगा: कारण तूच म्हणाली होतीस...
आई: काय?
मुलगा: नात्यात संवाद जिवंत ठेवण्यासाठी, एकमेकांच्या आवडीनिवडी जपायला हव्यात.
आई: करेक्ट.
मुलगा: येताना काय विचारत होतीस?
आई: अरे मघाशी त्या चौकात...
मुलगा: काय?
आई: आपल्या बिल्डिंगमध्ये राहणारी ती नुपूर दिसली.
मुलगा: तिचं काय?
आई: तू तर म्हणाला होतास की, ती राहुलसोबत रिलेशनमध्ये आहे.
मुलगा: हो.
आई: पण आज तर ती वेगळ्याच मुलाच्या बाईकवर, त्याला मिठी मारून बसलेली...
मुलगा: हो, कारण आता ती ओपन रिलेशनमध्ये आहे.
आई: म्हणजे?
मुलगा: तुला काही सांगितलं की, लगेच त्याचा पूर्ण इतिहास-भूगोल जाणून घ्यायचा असतो!
आई: आपलं ठरलंय...
मुलगा: मला तर तीच माझी सर्वात मोठी चूक वाटतेय.
आई: का बरं?
मुलगा: कारण तू माझ्याकडून सगळी माहिती जाणून घेतेस आणि मग ती तुझ्या इतर मैत्रिणींना सांगतेस.
आई: मग त्यांच्या घरातलाही जनरेशन गॅप कमी व्हायला नको का?
मुलगा: नुपूर ओपन रिलेशनमध्ये असल्याचं तिच्या आईला समजलं, तर...
आई: तर काय?
मुलगा: हार्ट अटॅक येईल काकूंना...
आई: काही नाही होणार.
मुलगा: मम्मी, सगळ्या आया तुझ्यासारख्या नाहीत.
आई: म्हणजे?
मुलगा: तू आमच्या पिढीशी इंटरॅक्ट करून नवनवीन विषय जाणून घेतेस...
आई: मग?
मुलगा: त्यामुळे कोणताही टॉपिक ऐकताना, तुझ्या मनाची तयारी झालेली असते.
आई: सहमत.
मुलगा: इतरांच्या घरच्यांचं तसं नाहीये...
आई: मग कसं आहे?
मुलगा: ते अजूनही डेलुलुमध्ये आहेत.
आई: म्हणजे?
मुलगा: म्हणजे, त्यांना अजूनही खरी परिस्थिती समजलेली नाही.
आई: कोणती परिस्थिती?
मुलगा: आजच्या पिढीचे विचार आणि त्यांची रिलेशन्स...
आई: तुम्ही सांगितल्याशिवाय कळणार कसे?
मुलगा: काय सांगू?
आई: ही ओपन रिलेशनशिप काय भानगड आहे?
मुलगा: ओपन रिलेशनशिप म्हणजे दोन व्यक्ती प्रेमसंबंधात असतात, पण परस्पर संमतीने एकमेकांना इतर व्यक्तींशीही रोमँटिक किंवा फिजिकल रिलेशनशिप ठेवण्याची मुभा देतात.
आई: बाप रे!
मुलगा: बघ, तूच ऐकून थक्क झालीस!
आई: कारण आमच्या पिढीसाठी हे कल्पनेपलीकडचं आहे, बाळा.
मुलगा: सहमत.
आई: म्हणजे त्या नुपूरचा आणखीही एक बॉयफ्रेंड आहे?
मुलगा: फक्त एकच नाही, इतरही असू शकतात.
आई: म्हणजे?
मुलगा: ओपन रिलेशनशिपमध्ये पार्टनर्सना इतर व्यक्तींशी संबंध ठेवण्यावर बंधन नसतं.
आई: जोडीदार अशी खुली सूट देतो?
मुलगा: अशा ओपन नात्यात दोघांनाही पार्टनर बदलण्याची मोकळीक मिळते.
आई: अरे, पण लग्नाआधीच अनेक पार्टनर्सची सवय लागल्यावर...
मुलगा: एकतर नाती हाताळण्याची मॅच्युरिटी येणार किंवा...
आई: किंवा काय?
मुलगा: पार्टनर बदलण्याचं व्यसन जडणार.
आई: भयानकच आहे सगळं.
मुलगा: म्हणुनच तर नात्यांची नवी कन्सेप्ट जाणून घेण्याआधी पालकांची मानसिक तयारीही गरजेची आहे.
आई: सगळीच मुलं काही ओपन रिलेशनशिपमध्ये राहण्याचं धाडस करू शकत नाहीत.
मुलगा: मग त्यांच्यासाठी रिलेशनशिपचे इतर ७-८ पर्याय उपलब्ध आहेत.
आई: कोणते पर्याय?
मुलगा: सिच्युएशनशिप, लिव्ह-इन रिलेशनशिप, कॅज्युअल रिलेशनशिप, व्हर्च्युअल रिलेशनशिप, लाँग-डिस्टन्स रिलेशनशिप, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स किंवा ऑन-अँड-ऑफ रिलेशनशिप.
आई: देवा!
मुलगा: शॉक लगा... शॉक लगा...
आई: ही सर्व नाती लग्नाआधी?
मुलगा: हो.
आई: पण या रिलेशनशिप्सचे नेमके अर्थ काय?
मुलगा: नावातच अर्थ दडलेले आहेत.
https://whatsapp.com/channel/0029VaDinBXFcowDhOwBNW0y
आई: म्हणजे?
मुलगा: लिव्ह-इन रिलेशनशिप तर तुला ठाऊकच आहे.
आई: हो, लग्न न करता एकत्र राहण्याचा निर्णय.
मुलगा: बरोबर.
आई: सिच्युएशनशिप म्हणजे?
मुलगा: मैत्री आणि प्रेम यांच्यामधील अस्पष्ट नातं; त्या नात्याला स्पष्ट नाव किंवा दिशा नसते.
आई: कन्फ्युजन मॅटर...
मुलगा: हो.
आई: कॅज्युअल रिलेशनशिप म्हणजे?
मुलगा: एकमेकांच्या संमतीने, गंभीर बांधिलकीशिवाय ठेवलेलं नातं.
आई: म्हणजे, एक प्रकारचा टाइमपास...
मुलगा: तसंही म्हणता येईल.
आई: फ्रेंड्स विथ बेनिफिट्स काय चक्कर आहे?
मुलगा: त्या रिलेशनशिपमध्ये मैत्री असते आणि त्यासोबत शारीरिक जवळीकही असते; मात्र, त्यात प्रेमसंबंधाची कसली अपेक्षा नसते.
आई: म्हणजे, फायद्यापुरती मैत्री...
मुलगा: तसंही म्हणू शकतो.
आई: व्हर्च्युअल रिलेशनशिप काय मामला आहे?
मुलगा: प्रामुख्याने इंटरनेट, सोशल मीडिया किंवा व्हिडिओ कॉलद्वारे टिकणारं नातं.
आई: ऑनलाइन नातं.
मुलगा: हो, तसं म्हणायला हरकत नाही.
आई: लाँग-डिस्टन्स रिलेशनशिप काय विषय?
मुलगा: दोघे वेगवेगळ्या शहरांत किंवा देशांत राहून नातं टिकवतात.
आई: तू मागे दिवसरात्र त्या साक्षीसोबत फोनवर बोलायचास, तसं?
मुलगा: तू चोरून आमच्या गप्पा ऐकायचीस काय?
आई: लेकरांवर लक्ष ठेवावं लागतं.
मुलगा: म्हणूनच मी अंगावर ब्लँकेट घेऊन गुपचूप कॉलवर बोलण्याची ट्रिक शोधून काढली.
आई: गरज ही शोधाची जननी आहे.

आई: ते सोड... आपण कुठपर्यंत आलो होतो?
मुलगा: लाँग-डिस्टन्स रिलेशनशिपपर्यंत...
आई: याला दूर अंतरावरचं नातं म्हणता येईल.
मुलगा: हो, म्हणता येईल.
आई: आता काय राहिलं?
मुलगा: ऑन-अँड-ऑफ रिलेशनशिप.
आई: हा काय प्रकार आहे?
मुलगा: वारंवार ब्रेकअप आणि पुन्हा पॅचअप होणारं नातं.
आई: म्हणजे गरज असेपर्यंत टिकणारं नातं.
मुलगा: हो.
आई: भावनिक, मानसिक आणि शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्या पिढीने शोधलेला नात्याचा आणखी एक पर्याय.
मुलगा: बाकी राहू दे... आधी सांग, आपलं बोलणं सुरू असताना टाइप काय करत होतीस?
आई: तू सांगितलेली माहिती टाइप करून घेतली.
मुलगा: का बरं?
आई: वयोमानामुळे तुमच्या पिढीचे असे जड शब्द आता लक्षात राहत नाहीत...
मुलगा: टाइप केलेल्या माहितीचं काय करणार?
आई: सगळी इन्फर्मेशन मैत्रिणींशी शेअर करणार.
मुलगा: त्याने काय होईल?
आई: जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी सांगावे | शहाणे करुन सोडावे | सकळ जन ||
मुलगा: आता याचा अर्थही सांग...
आई: तुम्हाला जे चांगलं माहीत आहे, ते इतरांनाही शिकवा. ज्ञान वाटल्याने समाज अधिक जागरूक आणि सुशिक्षित होतो.
मुलगा: ओके.
आई: किमान यानिमित्ताने पालकांना त्यांच्या पोरांच्या पिढीतील नात्यांच्या नव्या कन्सेप्ट्स तरी कळतील.
मुलगा: ट्रू...
आई: नाहीतर तू म्हणतोयस तसं व्हायचं.
मुलगा: काय?
आई: मनाची तयारी नसल्यामुळे, आपल्या पोरांचे पराक्रम ऐकून एखाद्या आई-बापाला मानसिक धक्काच बसायचा.
मुलगा: पॉसिबिलिटी आहे.
आई: तुमच्या पिढीची बोलण्याची पद्धत वेगळी आहे.
मुलगा: हो.
आई: तुमच्या खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत.
मुलगा: हो.
आई: तुमच्या पिढीची व्यक्त होण्याची माध्यमं वेगळी आहेत.
मुलगा: हो.
आई: तुमच्या पिढीच्या नात्यांच्या संकल्पना वेगळ्या आहेत.
मुलगा: बरोबर.
आई: म्हणूनच तर तुमच्या आणि आमच्या पिढीमध्ये एवढी दरी निर्माण झाली आहे.
मुलगा: कसलं दरी?
आई: विचारसरणी, तंत्रज्ञानाचा वापर, जीवनशैली, नातेसंबंध, करिअरची निवड आणि सामाजिक मूल्यांमधील दरी...
मुलगा: सच बात.
आई: समाधानाची बाब म्हणजे, गेल्या काही वर्षांत आपल्या दोघांमधील ते जनरेशनचं अंतर हळूहळू कमी होत चाललंय.
मुलगा: कारण आपण ठरवलं आहे...
आई: होय, आपल्यातील संवादच दुरावे कमी करतोय.
मुलगा: तू दरवेळी नवनवीन गोष्टी ऐकण्यास उत्सुक असतेस.
आई: तुझं भावविश्व जाणून घेण्याचा, त्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.
मुलगा: म्हणजे?
आई: आजारावर उपचार करण्याआधी, आजाराचं अचूक निदान होणं आवश्यक असतं.
मुलगा: कोणता आजार?
आई: तू बरेचदा निर्णय घेताना कन्फ्युज असतोस.
मुलगा: हो.
आई: तेव्हा काय करतोस?
मुलगा: आधी तर मी मित्रांकडून सजेशन्स घ्यायचो.
आई: आणि आता?
मुलगा: आता आधी प्रॉब्लेम तुझ्याशी शेअर करतो.
आई: मग मी तुला गाईड करते.
मुलगा: हो, कित्येकदा आपली ओपिनियन्स नाही जुळत...
आई: किमान आपण मिडपॉइंटपर्यंत तरी येतो.
मुलगा: ॲब्सोल्युटली!
आई: तेच आजच्या युगात गरजेचं आहे.
मुलगा: काय?
आई: नात्यातील जनरेशन गॅपच्या भिंती दूर करणं...
मुलगा: आणि त्यानंतरच...
आई: काय?
मुलगा: नात्यातील जनरेशन गॅपच्या भिंती पाडल्यानंतरच विश्वासाचे नवे पूल बांधता येतात.
आई: ज्जे बात!
©️अक्षय भिंगारदिवे,
१ ऑगस्ट २०२६

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा