पाचचा गजर झाला तशी अरुणा उठली. रात्री तिला थोडी कणकण होती, थकवा जाणवत होता पण विजूची सकाळची शाळा, स्कुलबस कोपऱ्यावर साडेसहाला येणार, त्याआधी त्याला उठवून तयार करून नाश्ता देऊन आणि त्याचा डबा भरून बसमध्ये बसवायचे.. मग इतरांची तयारी. थोडे बरे वाटतं नसले तरी तिला उठावेच लागले, त्याशिवाय इतर पाचजणांचे झाले नसते. तिने विजूला उठवले, हातात ब्रश दिला, तोपर्यत तिने दूध तापत ठेवले, एका बर्नरवर तूपटाकून रवा गरम करायला घेतला. विजू तोंड धुवून आला तसा तिने गरम दूधचा कप त्याच्यासमोर ठेवला. तिचे डोके फारच दुखू लागले म्हणून तिने पटकन एक क्रोसीन तोंडात टाकली आणि ती विजूसाठी गरम पाणी काढायला बाथरूम मध्ये गेली. तिने विजूचे कपडे बाथरूममध्ये ठेवले. तसा तो अंघोळीला गेला. तिने तोपर्यंत शिरा केला. विजू बाहेर आला तसा तिने त्यांच्यापुढे एका बाउल्स मधून शिरा दिला. त्याच्या टिफिनमध्ये तिने थोडा शिरा आणि एक सफरचंद कापून ठेवले.
विजुची तयारी होईपर्यत तिने अंगातील गाऊन बदलला आणि ड्रेस चढवला. साडे सहाला पाच मिनिटे कमी होती.. चटकन तिने विजूच्या केसावरून फणी फिरवली आणि आपल्या हातात त्याचे दप्तर आणि दुसऱ्या हातात त्याचा हात पकडून ती जिना उतरू लागली. कोपऱ्यावर जाईपर्यत स्कुलबस आलीच होती.. तिने हाताला धरून त्याला गाडीत चढवले आणि ती मागे वळली. घामाघूम होऊन अरुणा घरात शिरली, तिने पाहिले तिच्या सासूबाई उठल्या होत्या आणि बाथरूममध्ये शिरत होत्या.. ती पटकन किचनमध्ये गेली आणि तिने सासूसाठी गरम पाणी गॅसवर ठेवले.गरम पाणी आणि त्त्यांची आयुर्वेदिक पावडर बाटली तिने टेबलावर ठेवली.सासूबाई बाहेर आल्या आणि ती पावडर पाण्यात मिक्स करून प्यायला लागल्या.पाणी पितापिता त्या सुनेला म्हणाल्या..
'अरुणा, त्या चॅनेलवाल्याने माझे आस्था चॅनेल बंद करून टाकले बघ, त्याला जरा फोन कर.
'हो हो करते, यांचा डबा भरून झाला कीं फोन करते.
अरुणाने काल बाजारातून आणलेली दोडकी चिरायला घेतली इतक्यात तिला तिच्या नवऱ्याची जाग लागली. तिचा नवरा शरद बेसिनवर तोंड धूत होता. ती विळीवरुन उठली आणि तिने त्याच्याकरिता ब्लॅककॉफी गॅसवर ठेवली. तो खुर्चीवर बसल्याबसल्या तिने त्याच्या हातात ब्लॅककॉफीचा मग ठेवला. एका हातात कॉफी आणि एका हातात टाइम्स वाचत शरद म्हणाला.
'दोडक्याशिवाय हल्ली बाजारात भाजीच येत नाही काय? चार दिवसापूर्वी दोडकीच होती..
'हो, तुम्हाला दोडकी आवडत नाहीत पण तुमच्या बाबांना आवडतात, काल मी भाजी आणायला निघाले तर म्हणाले.. दोडकी आण ग न विसरता.. बर, मी अस करते.. तुम्हाला दोडक्याची भाजी देत नाही डब्यात.. त्या ऐवजी आम्लेट काढून देते.
शरदणे समाधानाने मान डोलावली आणि तो पेपर वाचू लागला. अरुणाची नवऱ्याचा डबा तयार करण्याची घाई सुरु होती तोपर्यंत तिची पाचवीतील कन्या श्यामा आळोखेपाळोखे देत किचनमध्ये आली. तिच्याकडे पहात अरुणा म्हणाली.
'श्यामा.. जा तोंड धू, हा शिरा केलाय तो खा आणि काल रात्री मी सांगितलेला निबंध पुरा कर. मग मी तुझे गणित घे, मागच्या परीक्षेत तुला गणितात मार्क्स कमी आहेत.. नाहीतर तू जोशीच्या क्लासला जातेस का?
'नको आई, तू आमच्या मॅडमपेक्षा गणित मस्त शिकवतेस. म्हणजे सर्वच विषय चांगले शिकवतेस. तूच घे माझे गणित..
'हो ग.. मला पण आवडत शिकवायला. आमच्या शाळेतील मठ्ठ मुली आता शिकवायला लागल्यात. लाखात पगार घेतायत आणि मी. मला तूझ्या बाबांनी आणि आजीआजोबानी नोकरी करू दिली नाही. मी आहे धुंडीभांडी घासत. श्यामाने दूध आणि शिरा घेतला आणि ती आतल्या खोलीत जाऊन निबंध लिहू लागली. तिचे सासरे पाय ओढत ओढत हॉलमध्ये आले. अरुणाने त्यांना पाहिले आणि त्यान्च्यासाठी आणि आपल्यासाठी चहा टाकला. चहाचा कप घेऊन ती सासऱ्याकडे गेली, तेंव्हा ते म्हणाले...
'अरुणा.. काल शरदने ऑइल आणलंय, तुझं आटोपलं कीं पायांना मालिश कर जरा.. तूच मालिश चांगले करतेस त्या मालिशवाल्यापेक्षा..
'हो हो बाबा.. मी करते पण यांचा डबा आणि श्यामलाची शाळा.. यातून मोकळी झाली कीं येतेच मी..
अरुणाने मग कणिक मळली आणि चपात्या करायला घेतल्या. एका गॅसवर भात.. भात झाला तशी तिने आम्लेट्स करायला घेतली. हे सर्व झाल्यावर तिने शरदचा डबा भरला आणि ती आतल्या खोलीत श्यामला अभ्यास करत होती तिथे गेली. तिने श्यामलाने लिहिलेला निबंध वाचला, त्यात काही सुधारणा सांगितल्या आणि तिने चॅनेलवाल्याला फोन लावून आस्था चॅनेल चालू करायला सांगितले.
नऊ वाजले तसा शरद आपला डबा घेऊन बाहेर पडला. नेहेमीप्रमाणे तो स्कुटरची चावी विसरला आणि खालून 'अरुणा.. अरुणा 'अस हाका मारू लागला. त्याची ही नेहेमीची सवय माहित असल्याने अरुणाने त्याच्या किल्ल्या टेबलावरून उचलल्या आणि ती धावत झाली गेली आणि चाव्या देऊन आली.
तिच्या सासूबाई देवखोलीतून बाहेर आल्या तश्या तिने त्याना शिरा आणि चहा दिला आणि त्यान्च्या खोलीत जाऊन त्त्यांची औषधे हातात घेऊन ती समोर उभी राहिली. तिची सासू तिच्याकडे एकटक पहात राहिली.. तिच्या हातून आपल्या गोळया घेतल्या आणि म्हणाली..
'अरुणा.. तू सुन का मुलगी असा मला प्रश्न पडतो. मला मुलगी नाही पण तू सुन नाही मुलगी म्हणूनच इथे आलीस.. आता तुझी एव्हडी सवय झाली म्हणून सांगू.. तू एक दिवस भावाकडे गेलीस ना.. इथे सर्वांचे अडते बघ...
अरुणा हसून म्हणाली..
'मी तशी कुठे जाते हो? दादाकडे गेले तरी एकदिवस वर्षातून..
परत एकदा अरुणा आतल्या खोलीत गेली आणि श्यामलाला गणित शिकवू लागली. पुढील अर्धा तास ती मुलीचा अभ्यास घेत होती. श्यामला अंघोळीला गेली आणि अरुणा किचनमध्ये आली आणि ती तिचा डबा भरू लागली.. डबा भरल्यावर तिची पाण्याची बॉटल तिने भरून ठेवली.
ती बाबांच्या खोलीत गेली आणि तिने मसाज ऑइलची बॉटल आणली आणि ती बाबांच्या पायांना मसाज करू लागली. तिच्या मसाजने बाबा सुखावले आणि कधी लहानशी डुलकी लागली त्यांनाच कळले नाही.
बाहेरून श्यामला 'आई.. आई अशा हाका मारू लागली..तसे अरुणाने मालिश करणे थांबवले आणि ती हात साबणाने धुवून बाहेर आली आणि केस मोकळे सोडलेल्या श्यामलाचे केस ती विंचूरू लागली.. पटकन त्याची वेणी घालून तिने श्यामलाचा डबा उचलला आणि तिला बसवर सोडायला खाली उतरली.
नवरा आणि दोन्ही मुले बाहेर गेल्याने तिला थोडी उसंत मिळाली. मग फुल स्पीड मध्ये पंखा लावून ती पाच मिनिटे शांत बसली. मग तिने वहिनीला फोन लावला, भाच्याची चौकशी केली, मैत्रिणींना फोन लावले. टीव्हीवरच्या बातम्या लावल्या.. एव्हड्यात कॉलनीतल्या कुलकर्णीवहिनीचा फोन आला..
'अरुणा .. दुपारी येऊ का?
'होय.. दोन नंतर. काय करायचंय?
'अग आयब्रो.. आणि फेशियल..
'हो या..
'आणि सुमनच व्हॅक्सीन..
'बघू.. वेळ असेल तर ते पण करू. पाचपर्यत होईल ते, कारण मग श्यामला घरी येते ना.. शिवाय बाबाची पुस्तके बदलायची असतात लायब्ररीमध्ये आणि माझी भाजी खरेदी वगैरे उदयासाठी...
'ते सांभाळून कर.. सुमनला तुझ्याचकडे करायच असत सगळं.. दुसरीकडे जायला बघत नाही ती.
'हो हो.. या तुम्ही दोन वाजता.
सकाळी शाळेत गेलेला विजू यायची वेळ झाली.. अरुणा अंघोळीला गेली.... पहिल्यांदा तिने बाथरूममधील सर्वांचे कपडे धुतले, मग स्वतःची आंघोळ करून ती बाहेर पडली. धुतलेले कपडे वाळण्यासाठी तारेवर घातले आणि ती देवखोलीत गेली. लहानपणापासून पाठ असलेली रामरक्षा आणि अर्थवशिष्य तोंडाने पुटपुटत तिने देवासमोर दिवा लावला, अगरबत्ती पेटवली आणि ती बाहेर पडली. तोपर्यंत विजू दारावर थापा मारत होता. तिने विजूला आत घेतलं.. विजूने दप्तर एकाबाजूला भिरकावलं आणि चप्पल दुसऱ्या बाजूला.. मग ती विजुवर ओरडली...
'विजू.. तुला किती वेळा सांगितले.. दप्तर तूझ्या टेबलावर ठेवायचं.. चप्पल स्टॅन्डवर.. चल, उठ.. नाहीतर..
विजूला आईचा राग माहित होता.. तो गुपचूप उठला आणि त्याने चप्पल स्टॅन्डवर ठेवली आणि दप्तर तो आत घेऊन गेला.
दुपारच्या जेवणासाठी अरुणाने कुकर लावला, भात आणि वरण.. सकाळची भाजी होतीच. इतक्यात तिच्या नवऱ्याचा फोन आला..
'अरुणा, आज रात्री कंपनीतले चारजण जेवायला आहेत.. गेल्या महिन्यात मला प्रमोशन मिळाले ना, त्याची पार्टी मागत होतें, आज शुक्रवार आहे ना, म्हणून त्याना म्हंटले आज या जेवायला.. चिकन घेऊन ये आणि मस्त बिर्याणी कर.. चायनीज पण बनव.. ओके.
'ओके.. मनातल्या मनात चिडून अरुणा बोलली. तिला माहित होत, हे मित्र आले कीं बाटली काढणार, मग मला एकापाठोपाठ ऑर्डर सोडणार, काहींना दारू चढणार..
तिने कुकर खाली उतरवला आणि सासूसासऱ्यांना आणि विजूला जेवायला वाढले. तिघे जेवायला बसले आणि समाधानाने जेऊ लागले. आजीआजोबा सोबत छोटा विजू पण जेवत होता, त्याना शाळेतील गमती सांगत होता. आजी नातवाचे कौतुक कानात साठवत होती.. अरुणा मनात होती.. सुख सुख म्हणजे तरी काय? घरातील माणसे जेऊन तृप्त होतात.. समाधानाचे कटाक्ष आपल्यावर टाकतात हेच तर सुख.
ती तिघे उठल्याबरोबर अरुणा जेवायला बसली पण तिच्या डोक्यात दोन वाजता फेशियलला येणाऱ्या कुलकर्णीकाकू होत्याच पण त्याचबरोबर रात्री नवऱ्याचे जेवायला येणारे मित्र होतें.
तिने जेवण आटोपलं आणि पटकन भांडी धुवून टाकली. सासू सासरे त्यान्च्या खोलीत झोप काढायला गेले तसे ती विजूला घेऊन आपल्या खोलीत गेली.विजूला गोष्ट सांगता सांगता ती आणि विजू झोपी गेली.
पहाटे पाचपासून घरभर फिरून अरुणा दमली पण दोन वाजता कुलकर्णीकाकू येणार हे तिच्या सुप्तमनात होतच. पावणेदोन वाजता ती दचकून जागी झाली.. ती ग्यालरीत आली आणि तिची बुटीकची खोली व्यवस्थित करू लागली.. घरात जाऊन नवीन पाणी बाटलीत भरले, सर्व कंगवे वगैरे साफ केले.. कचरा काढला.. तोपर्यंत दारावर टकटक झाली.. तिने ओळखले कुलकर्णीकाकू आणि सुमन आली.
कुलकर्णीकाकू आणि सुमन यांचे फेशियल, वॅक्सीन करता करता गप्पा पण झाल्या चार वाजता तिच्या सासूसासऱ्याना आणि कुलकर्णीकाकना चहा दिला आणि साडेचारवाजता ती मंडळी गेली. मग तिने बाहेर जायची तयारी केली... तोपर्यंत विजू उठला. त्याने🌹 दूध घेतले आणि तो खेळायला खाली गेला. साडेपाचला श्यामल शाळेतून येणार म्हणून तिच्यासाठी खाणे टेबलावर ठेऊन ती बाहेर पडली.
पहिल्यांदा लायब्ररीमध्ये जाऊन सासऱ्यासाठी पुस्तके बदलून घेतली.. मग भाजी, किराणासामान घेतले.. येताना चिकन, अंडी घेऊन ती घरी परतली.
रात्र होत आली होती... तिने देवासमोर दिवा लावला आणि ती किचनमध्ये आली. चिकन साफ करून त्याला हळदमीठ लावून ती संध्याकाळच्या जेवणाच्या मागे लागली. येताना केळी आणली होती... त्याची शिकरण केली आणि
आणि दारावरची बेल वाजली.. तिने दार उघडले तर तिचा नवरा शरद आणि त्याचे चार मित्र हसतखेळत आत आले.. त्यातील एक मित्र म्हणाला.
'वाहिनी.. तुम्हाला त्रास दयायला आलोय.. तुमचा नवरा पार्टी दयायला का.कू करत होता.. पण आज त्याला पकडलाच..
'अरे पार्टी दयायची ना नसते रे.. पण घरात आईबाबा असतात ना.. त्याना आवडत नाही आणि मूल पण असतात.. आणि लेका तुला दोन पेगमध्ये चढते..
'पण वहिनी बिर्याणी करतात तशी बाहेर मिळतं नाही रे.. म्हणून
'चला आता.. ग्यालरीत बसा.. अरुणा म्हणाली.. तसे चौघेजण ग्यालरीत बसले. मग बाटली उघडली गेली.. त्यात सोडा.. सोबत उकडलेली अंडी.. शेंगदाणे..
पार्टी ऐन रांगात आली होती. हॉलमध्ये आई बाबा टीव्हीवर मालिका बघत होतें.. मुले बेडरूममध्ये अभ्यास करत होती.. इतक्यात तिच्या नवऱ्याची हाक तिला ऐकू आली..
'अरुणा.. बिर्याणी आण..
'हो हो.. आणते.. म्हणत अरुणा किचनमध्ये गेली आणि चार प्लेट्समधून बिर्याणी भरून घेऊन आली... ती टेबलावर ठेवत असताना, एक मित्र बोलला..
'शरद.. तूझ्या संसाराला वहिनीची पण मदत आहे रे बाबा.. कौतुक आहे.. संसार सांभाळून त्या बुटीकचा व्यवसाय पण करतात..
'अरे आयब्रो करून आणि फेशियलकरून संसार होतो काय रे? तिचा नवरा मोठयाने हसत आणि मित्रांना टाळी देत बोलला.
चटकन अरुणाने नवऱ्याकडे पाहिले.. पण तो बायकोची चेष्ठा करण्यात आणि मित्रांना टाळ्या देण्यात मग्न होता.. तिला वाईट वाटले.. आपण घर सांभाळून संसारला दोन पैसे मिळावे म्हणून दुपारच्या वेळात पार्लर चालवतो.. पण त्याचे आपल्या नवऱ्याला काहीच किमत नाही? उलट दारू पिऊन आपली चेष्ठा?
कुणाच्या तरी ताटातील बिर्याणी संपली हे पाहून शरद ओरडला..
'अरुणा.. बिर्याणी आण..
बाहेर बसलेली अरुणा चटकन किचनमध्ये गेली आणि बिर्याणीचे भांडे घेऊन आत गेली आणि बिर्याणी वाढू लागली.. ते पाहून अकजण म्हणाला...
'शरद्या.. पार्टी तुझी आणि त्रास मात्र वहिनींना..
'अरे त्रास कसला? कुठे काय बाहेर जाते काय? घरातच तर असते..हसत हसत तिचा नवरा म्हणाला आणि टाळीसाठी त्याने मित्राकडे हात केला..
चटकन अरुणाच्या डोळ्यातून पाणी आले.. ते अश्रू लपवत लपवत ती बाहेर पळाली. तिच्या सासूने ते पाहिले.. ती जवळ आली..
'काय झालं ग अरुणा? शरदचे मित्र काही बोलला?
'नाही हो..
'मग शरद?..
ती गप्प राहिली.
'तरी मी सांगत असते शरदला.. या तूझ्या पार्ट्या या घरात नको..
रडत रडत अरुणा म्हणाली..
'त्त्यांचे काही चुकले नाही हो... मला माझी लायकी समजली. घरात राहणाऱ्या स्त्रीला किमत नसते. मी अभ्यासात उत्तम होतें. पण माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती. म्हणून त्यानी मला पुढे न शिकवता माझे लग्न करून दिले.. आणि तुम्ही पण मला पुढे शिकू दिले नाही आणि मी या संसाराच्या गाडीला जुम्पून घेतले.. मी समजत होतें.. माझा नवरा, दोन मुले, सासूसासरे हेच माझे जीवन.. पण...
एव्हड्यात शरद आणि त्याचे मित्र आत आले आणि
'वाहिनी.. छान जेवण.. छान जेवण म्हणत ते घरी जायला निघाले.
शरद त्याना पोचवायला खाली गेला.. परत घरात आला आणि बेडरूममध्ये झोपी गेला.
मुले झोपली.. सासुसासरे झोपी गेले.. झोपी जाऊ शकली नाही ती अरुणा.. ती या कुशीवरून त्या कुशीवर करत होती. तिला तिच्या नवऱ्याचे शब्द परत परत आठवत होतें..
'आयब्रो करून आणि व्हयक्सीन करून का संसार चालतो? त्याचे पैसे कितीशे मिळतात?
'ती घरात तर असते..तिचे कसले कौतुक करता? तिला रडू कोसळत होते..काय ही आपली किमत? म्हणजे घरातील मोलकरीण आणि आपण सारख्याच काय?
पहाटे पहाटे तिला थोडी झोप लागली. पण पाचवाजता तिला उठायलाच हवे होतें. कारण दोन्ही मुलांची शाळा आज शनिवारी सकाळी होती. शेवटी ती उठलीच.. तिने दोन्ही मुलांना उठवले.. त्यांच्यासाठी नाश्ता केला.. त्त्यांचे कपडे काढून दिले आणि त्याना शाळेत पाठवलं. सासूसासऱ्याना नाश्ता दिला.. नवरा आठ वाजता उठला.. त्याला चहा.. नाश्ता दिला.. रोजच्यासारखे तिचे सुरु होतें.. पण हृदयात कल्लोळ माजला होता.
दुपारी तिला थोडी उसंत मिळाली.कुणाशी तरी बोलाव, आपलं मन मोकळे करावे असे तिला वाटतं होतें... तिची जिवाभावाची मैत्रीण म्हणजे प्रभा.. शाळेपासून मैत्री.. ती फारशी हुशार नव्हती पण धाडसी होती.. लग्नानंतर ती बंगलोरला गेली.. मुक्त पत्रकार होती.. कुठल्याकुठल्या पेपरसाठी लिहायची..तिलाच फोन करावा आणि मन हलक करावं अस अरुणाने ठरविले.
तिने प्रभाला फोन लावला..
'प्रभा..
'बोल अरुणा..
आणि अरुणा रडू लागली.
'अग काय झालं? सांग ना मला..
अरुणाने काल रात्रीचा प्रसंग आणि नवऱ्याने काढलेले उदगार तिला सांगितले.
'अग अरुणा... या नवऱ्यांना आणि कुणालाच घरात राहून घरदार सांभाळणाऱ्या बायकांची पर्वा नसते.. पण जोपर्यंत ती घरात असते तोपर्यंतच. ती बाई घरात नसली ना कीं त्याना कळते त्या बाईची किंमत.
'हो.. पण मी काय करू?
'तू अस कर.. सरळ माझ्याकडे ये.. सांग तूझ्या नवऱ्याला मला पण सुट्टी हवी.. एका महिन्याची. मी पण सध्या एकटीच आहे, नवरा परदेशी गेलाय.. आपण फिरू.. हिंडू.. तुला बाहेरच जग दाखवते.. किती वर्षे कधी बाहेर पडलीच नाहीस तू..
'पण मला जमेल हे? माझा संसार सोडून?
'जर तुझी किंमत तूझ्या नवऱ्याला कळायला हवी तर तुला बाहेर पडायलाच लागेल. मन घट्ट कर आणि मला सांग.. मी तुला प्लेनचे तिकीट पाठवते.
'बर.. म्हणत अरुणाने फोन ठेवला. रात्री जेवणे झाल्यावर ती नवऱ्याला म्हणाली.
'मी एक महिना बाहेरगावी जाते आहे, तेंव्हा एक महिना घर सांभाळा.
शरदला धक्का बसला.
'बाहेरगावी? ते पण एक महिना? वेड लागलेय का?
'नाही.. मी निर्णय घेतलाय.. मला पण विश्रांती हवी.. तुम्हाला कशी कंपनीतुन सुट्टी मिळते.. मुलांना सुट्टी मिळते.. तशी या संसारातून मला पण विश्रांती हवी..
'अग पण.. आईबाबा, मुले?
'ती तुमची पण आहेत ना?
अरुणाने कूस बदलली आणि ती झोपायचा प्रयत्न करू लागली.
दुसऱ्या दिवशी रविवार.. सर्वाना सुट्टी होती.तिने प्रभाला फोन करून प्लेनचे तिकीट बुक करायला सांगितले. ती सासूला म्हणाली..
'आई मी एका महिन्याच्या सुट्टीवर जाते आहे? तुम्ही सर्वांनी मिळून घर सांभाळा..
'काय? एक महिना? अग, तू जरा बाहेर गेलीस तर मला करमत नाही.. काल रात्री शरद बोलला त्याने तू दुखावलीस बहुतेक? म्हणून मी सांगत असते.. तुमच्या पार्ट्या घरात नको म्हणून.. पोटात ती दारू गेली कीं काहीही बरळायचं..?
'काहीही बरळायचं नाही आई.. जे मनात होत तेच बोललेत ते.. असो.. माझा निर्णय झालाय.. मी बुधवारी बंगलोरला जाते आहे, प्रभाकडे, एक महिना प्रभाकडे राहणार.. ती म्हणाली आहे.. आपण भरपूर फिरू.. उटी, म्हैसूरला जाऊ.. हॉटेलिंग करू.
रात्री अरुणा आपली बॅग भरू लागली.. तेंव्हा शरद म्हणाला..
'अरुणा.. अग मी गमतीने म्हणालो त्याचा राग धरू नकोस.. तू एक महिना गेलीस तर मुलांचे काय? त्याना बसमध्ये सोडायला.. त्त्यांचा डबा..
'तुम्ही करा ना? नाहीतर एक महिना बाई ठेवा.. जेवणासाठी.. धुण्याभांड्यासाठी.. आणि आई पण मदत करतील.
शरद गप्प झाला.. मुलांना कळलं आपली आई बंगलोरला जाते आहे प्रभामावशींकडे.. सुट्टी.. तब्बल एक महिन्यासाठी.. त्त्यांचे चेहेरे उतरले..
'आई तू बंगलोरला जाणार.. मग मी कुणाबरोबर झोपू? आणि माझा नाश्ता.. डबा. गृहपाठ?
'विजू तू आजीसोबत झोप.. आजी तुला गोष्ट सांगेल..
'श्यामल.. तू बाबासोबत झोप.. बाबा तुझे गणित घेतील.. आणि नाश्ता आणि डबा काय? कोणी एक महिना बाई ठेवली कीं.. तुम्हाला माझी आठवण पण यायची नाही.
सगळं घर चूपचाप झाले. शरद अपराधी नजरेने वावरत होता.. सोमवारी त्याने विजूसाठी किती वाजता बस येते हे पाहून ठेवले.. शामा मोठी होती, त्यामुळे ती स्वतः बससाठी जात होती.
त्याने शेजारच्याना जेवण आणि नाश्ता करायला बाई पाहायला सांगितली. ते म्हणाले या कामासाठी बायका चौदा हजार महिन्याला घेतात.. कपडे धुणारी बाई पाच हजार घेते.... दोन विषयाच्या शिकवणीसाठी जोशी मॅडम पाच हजार घेतात.. सर्वांच्या इस्त्रीचे एक हजार रुपये.. बाबांना मालिश करायला महिना सहा हजार रुपये?
शरदच्या लक्षात आले.. जी कामे अरुणा सहज करते त्यासाठी जवळजवळ आपला निम्मा पगार जाणार.. या खेरीच बाबांची पुस्तके कोण बदलणार? रोजची भाजी.. किराणा.. कचरा.. लाईटबिले?
शरदची झोप उडाली.. या एका महिन्यात आपली पुरी वाट लागणार हे त्याच्या लक्षात आले. आपला कंपनीत लक्ष लागेल का.. मुले शाळेत गेली.. आली का?
आई.. बाबनी औषधे घेतली का? दरवाजा व्यवस्थित बंद केला ना?
आपली रजा पण संपली आहे म्हणजे विदउटपे रजा घ्यावी लागेल.. म्हणजे महिन्याचा खर्च कसा भागवणार?
प्रभाचा अरुणला रोज फोन येत होता.. तीने अनेक प्रोग्राम ठरविले होतें..
शेवटी बुधवार उजाडला.. सकाळी नऊची फलाईट होती. अरुणा पहाटे उठली.. तिने सर्वासाठी नाश्ता बनवला. सर्वांच्या हातात नेऊन दिला.. तिचे सासूसासरे गप्प होतें.. डोळ्यातून पाणी काढत नाश्ता खात होतें.. शरद नाश्ता खाता खाता म्हणाला..
'मी येतो एअरपोर्टवर सोडायला? आणि तिकिटाचे पैसे?
'पैसे नकोत.. आहेत माझ्याकडं.. आयब्रो करून आणि व्हॅक्सीन करून मी जमवलेत. .
शरद खजिल झाला.. आपले शब्द परत आपल्याला मिळालेत हे त्याच्या लक्षात आले..
सात वाजता अरुणाने आईबाबांना नमस्कार केला.. मुलांना जवळ घेतले आणि तिने बॅग उचलली.
टॅक्सी आली.. सर्वजण तिला पोचवायला खाली आली.. डोळे पुसत पुसत सर्वांनी तिला निरोप दिला..
शरद मुलांना आणि आईबाबांना घेऊन घरात आला.. उदयपासून शेजारी जेवण करायला येणारी बाई आपल्यापण घरात येईल.. तिच्याकडुन नाश्ता.. जेवण करून घ्या असे तो आई बाबांना म्हणाला. तसेच एक बाई कपडे धुवायला पण येईल..
'पण शरद.. माझ्या पायांना मालिश कोण करणार? आणि माझी पुस्तके कोण बदलणार?
'मला ती चॅनेल्स बदलता येत नाहीत रे.. अरुणाच बदलायची नेहेमी..
'बाबा.. माझ्या शाळेत पेरेन्टडे आहे सोमवारी.. तुम्ही याल का? नेहेमी आई यायची. पण..
श्यामल रडवेली झाली... तिला बघून विजू रडू लागला... त्याना जवळ घयायला त्यांची आजी गेली.. त्याना समजावता समजावता ती कधी रडू लागली तिलाच कळले नाही.. बाबा ग्यालरीत जाऊन गप्प बसले... शरदला काय करावे समजेना... हे घर कसे सावरावे?
एव्हड्यात दारावरची बेल वाजली. यावेळी कोण म्हणून शरद दार उघडायला गेला. बाहेर हातात बॅग घेतलेली अरुणा होती..
'अग तू..? विजू.. श्यामला.. कोण बघा?
मुले धावत आली आणि आईला बिलगली.
'तू.. गेलीस नाहीस अरुणा?
सासूबाई तिला जवळघेत म्हणाल्या...
रडत रडत अरुणा बोलू लागली..
'नाही जाऊ शकले आई... कारण माझे घरटे.. आपण बांधलेले घरटे सोडून पक्षीणी जाईल का दूर? नाही जाऊ शकणार.. मी रागवले माझ्या नवऱ्यावर.. माझ्या स्वतःवर.. वाटतं होत जावं कुठेतरी दूर.. दूर.. पण माझे घरटे? माझी बाळ.. अजून लहान आहेत ती.. माझा नवरा.. बोलला असेल काहीही.. पण मी नसेन तर तो असाह्य होईल.
'खरच अरुणा.. घरची स्त्री काय काय करते आणि तिला किती हात असतात हे मला या चार दिवसात कळले. संसार म्हणजे एकखांबी तंबू.. तिचा मधला खांब म्हणजे त्या घरातली बाई.. तीच तोलून धरत असते तो तंबू.
'बर झालं अरुणा.. तू गेली नाहीस.. नाहीतर एका महिन्यात तुझा संसार जाग्यावर राहिला नसता.
अरुणाचे घड्याळाकडे लक्ष गेले... तिची धावपळ उडाली..
'अग बाई.. जेवायला उशीर होईल.. बाबांना भूक लागेल.. असे म्हणत पदर खोचून अरुणा कामाला लागली.

प्रदीप सुशीला रामदास केळुस्कर.
9422381299 / 9307521152
9422381299 / 9307521152
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा