बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

3114. Royal Enfield

 १८९३ मध्ये Royal Enfield ची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. सुरुवातीला कंपनी सायकली आणि इतर अभियांत्रिकी उत्पादने बनवत होती. १९०१ मध्ये त्यांनी पहिली मोटरसायकल तयार केली. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्यासाठी हजारो मोटरसायकली तयार केल्यामुळे Royal Enfield जगभर प्रसिद्ध झाली.
१९५५ मध्ये भारत सरकारला सीमावर्ती भागात वापरण्यासाठी मजबूत मोटरसायकलींची गरज होती. त्यामुळे ब्रिटनमधील Royal Enfield आणि Madras Motors यांनी मिळून चेन्नईमध्ये Enfield India ची स्थापना केली. Bullet 350 चे भारतात उत्पादन सुरू झाले आणि पुढील अनेक दशकांमध्ये Bullet ही पोलिस, सैन्य आणि दमदार बाईकची ओळख बनली.
मात्र १९७० मध्ये ब्रिटनमधील मूळ Royal Enfield कंपनी आर्थिक अडचणींमुळे बंद पडली.
पण भारतातील Enfield India ने Bullet चे उत्पादन थांबवलं नाही.
पुढे Eicher Group ने कंपनीत गुंतवणूक केली. १९९४ मध्ये Eicher ने Enfield India ची पूर्ण मालकी मिळवली आणि Royal Enfield हा ऐतिहासिक ब्रँड अधिकृतपणे भारतीय कंपनीचा भाग बनला.
पण १९८० आणि ९० च्या दशकात चित्र बदललं.
Hero Honda, Yamaha, Suzuki आणि Bajaj सारख्या कंपन्या हलक्या, स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या बाइक्स घेऊन आल्या.
Royal Enfield मात्र जड, तेल गळणारी, Kick Start असलेली आणि वारंवार बिघाड होणारी बाइक म्हणून ओळखली जाऊ लागली.
विक्री सतत घसरत होती.
तोटा वाढत होता.
Board Meeting मध्ये एकच प्रश्न होता…
“ही कंपनी विकायची का बंद करायची?”
त्याच वेळी २६ वर्षांचा एक तरुण पुढे आला.
सिद्धार्थ लाल.
तो Eicher Group चे संस्थापक विक्रम लाल यांचा मुलगा होता.
पण त्याला पदामुळे संधी मिळाली नाही.
त्याने Royal Enfield वर जीवापाड प्रेम केलं होतं.
तो स्वतः Bullet चालवायचा. इतकंच नाही, स्वतःच्या लग्नातही घोड्यावर बसण्याऐवजी Bullet वरून वरात घेऊन गेला होता.
त्याने Board ला एकच विनंती केली.
“मला दोन वर्ष द्या. कंपनी विकू नका.”
Board ने होकार दिला.
२००० साली सिद्धार्थ लाल Royal Enfield चे CEO बनले. तेव्हा त्यांचं वय फक्त २६ वर्षं होतं.
पहिल्या दिवशी त्यांनी Marketing वर पैसा खर्च केला नाही.
ते स्वतः शेकडो किलोमीटर बाइक चालवत फिरले.
प्रत्येक समस्या स्वतः अनुभवली.
कुठे Oil Leak होतो…
Gear का अडकतो…
Clutch Cable का तुटते…
Customer खरंच कशामुळे त्रासतो…
त्यांनी Engineers ना एकच सांगितलं…
“पहिल्यांदा Bike ठीक करा… जाहिरात नंतर करू.”
यानंतर त्यांनी आणखी एक धाडसी निर्णय घेतला.
Royal Enfield कधीच Hero Honda बनणार नाही.
ती १००cc बाइक बनवणार नाही.
ती Discount देऊन बाजार जिंकणार नाही.
Royal Enfield फक्त Character असलेल्या मोटरसायकली बनवेल.
त्या काळात हा निर्णय वेडेपणाचा वाटत होता.
कारण संपूर्ण भारतीय बाजार मायलेजच्या मागे धावत होता.
पण सिद्धार्थ लाल यांनी गर्दीत मिसळण्याऐवजी स्वतःची वेगळी Category तयार केली.
२००९ मध्ये Classic 350 लॉन्च झाली.
ही फक्त नवीन बाइक नव्हती.
Royal Enfield चा पुनर्जन्म होता.
लोकांनी Bike नाही तर Lifestyle विकत घ्यायला सुरुवात केली.
Weekend Rides…
Leh-Ladakh Tours…
Rider Clubs…
Himalayan Odyssey…
Royal Enfield ने ग्राहक नाही तर Community तयार केली.
आज Royal Enfield ही Eicher Motors च्या मालकीची भारतीय कंपनी असून जगातील २५०cc ते ७५०cc Mid-size Motorcycle Segment मधील सर्वात मोठा ब्रँड आहे. भारतासह अमेरिका, युरोप, आशिया आणि इतर अनेक देशांमध्ये तिच्या मोटरसायकली विकल्या जातात.
ही कथा फक्त एका मोटरसायकलची नाही…
ही कथा आहे एका २६ वर्षांच्या मुलाची… ज्याने सगळ्यांनी “संपली” म्हटलेल्या कंपनीवर विश्वास ठेवला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3200. अज्ञान आणि अंधश्रद्धा

     रात्री २ वाजता १४ वर्षांची मुलगी विचित्र आवाज काढत अंगाचे लचके तोडत होती. भूत की भयंकर आजार? रात्रीचे २ वाजले होते. माझ्या ड्युटी रूममध...