बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५

2137. ओसरीतील खाट

 वृद्ध वडील हट्ट करत होते की त्यांची खाट ओसरीत टाकावी. मुलगा थोडासा त्रासलेला होता.
सुनेची कुरकुर सुरू होती. “कोणी म्हाताऱ्यांना वेगळी खोली देत नाही, आम्ही दुसऱ्या मजल्यावर खोली दिली. एसी, टीव्ही, फ्रीज, सगळ्या सुविधा आहेत, कामवाली पण ठेवलीये. काय झालंय, सत्तरीत सटकल्यासारखं वागायला लागलात का?”
वडील अशक्त आणि आजारी होते...पण हट्ट करत होते, म्हणून अरुणने विचार केला, “ठीक आहे, त्यांची इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे, ओसरीत खाट ठेवून टाकतो.”
आता त्यांच्या खाटेचं ठिकाण ओसरीत झालं. पूर्वी कायम खाटेवर पडून राहणारे वडील आता थोडं थोडं चालायला लागले. गेटपर्यंत फिरायचे, थोडं लॉनमध्ये फिरायचे. नातवंडांबरोबर खेळायचे, बोलायचे, हसायचे, मजा करायचे. कधी-कधी मुलाकडे आवडतं काही खाणं मागायचे. स्वतः खायचे आणि सून, मुलगा आणि नातवंडांनाही प्रेमाने भरवायचे... हळूहळू त्यांचं आरोग्य सुधारायला लागलं.
"आजोबा! तुम्ही बॉल फेका ना!" गेटमधून आत येताना अरुणने आपल्या १० वर्षाच्या मुलाचा आवाज ऐकला आणि तो चिडून म्हणाला, “अंशुल! बाबा म्हातारे आहेत, अशा गोष्टी त्यांना सांगू नकोस.”
"पप्पा! आजोबा तर रोज बॉल फेकतात..." अंशुल निरागसपणे म्हणाला.
"काय?" अरुणने आश्चर्याने वडिलांकडे पाहिलं.
वडील म्हणाले, "हो बेटा, तू वरच्या खोलीत खूप सुविधा दिल्या आहेत पण माणसं नव्हती. तुमच्याशी बोलणंही होत नव्हतं. पण ओसरीत ही खाट आली आणि दरवाजातून येता जाता तुमच्याशी बोलणं होतं. संध्याकाळी अंशुल, प्राचीचा खेळ पाहायला मिळतो. मन हलकं राहतं..."
वडील बोलतच राहिले आणि अरुण विचारात पडला.
'वृद्धांना कदाचित भौतिक सुख-सुविधांपेक्षा आपल्याच माणसांच्या सहवासाची अधिक गरज असते.'
वृद्धांचा सन्मान करा...ते आपली ठेव आहेत. त्यांची काळजी घ्या, कारण ते असे वृक्ष आहेत, जे कधी कधी कडवट भासतात, पण त्यांची फळे अतिशय गोड असतात आणि त्यांच्या सावलीला कोणताही पर्याय नाही... 🌳
🙏🏼वडिलधाऱ्यांप्रती आदर ठेवा 🙏🏼

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...