त्या : अक्षय एक सांगू?
मी : काय ?
त्या : बाप तलवार असतो आणि आई ढाल असते.
मी : कशी काय ?
त्या : कारण दोघांच्याही अलिखित भूमिका ठरलेल्या असतात.
मी : कोणत्या?
त्या : बाप धारधार तलवार बनून संकटांशी प्राणपणाने लढत असतो. आणि..
मी : आईची भूमिका?
त्या : आई कणखर ढाल बनून लेकरांचा वेदनांपासून अहोरात्र बचाव करते असते.
मी : सहमत.
त्या : त्या दोघांपैकी एकजणही स्वतःची भूमिका निभावण्यात कमी पडला. तर..
मी : तर काय?
त्या : त्याचे थेट परिणाम लेकरांना सोसावे लागतात.
मी : खूप वेळा.
त्या : माझे मिस्टर आणि त्यांची बहीण दोघेही खूप हुशार.
मी : ओके.
त्या : ते दोघेही सरकारी अधिकारी आहेत.
मी : ग्रेट.
त्या : माझे सासरेही सरकारी अधिकारी होते.
मी : क्या बात.
त्या : त्यामुळे आमच्या गोतावळ्यात लाल दिव्याच्या गाडीचं विशेष आकर्षण.
मी : साहजिकच.
त्या : आम्हाला दोन मुलं आहेत.
मी : नावं काय?
त्या : मोठा क्षितिज आणि लहानी नेहा.
मी : ओके.
त्या : नेहा सुरुवातीपासून शाळेत खूप हुशार होती. त्यातुलनेत क्षितिज..
मी : क्षितिज जेमतेम?
त्या : हो. मात्र ती गोष्ट माझ्या मिस्टरांना मान्य नव्हती.
मी : म्हणजे?
त्या : म्हणजे क्षितिज अभ्यास करत नाही, त्याचं दुसऱ्याच गोष्टींमध्ये लक्ष असतं. असं त्यांचं म्हणणं.
मी : असं कसं?
त्या : तो नियमित अभ्यास करायचा. ट्युशन चुकवत नव्हता. मात्र..
मी : मात्र काय?
त्या : त्याचा बुद्ध्यांक कमी आहे, असं समज.
मी : ओके.
त्या : सर्वांनाच सर्व जमेल असं नसतं.
मी : सहमत.
त्या : तू चांगले लेख लिहितोस, म्हणजे तू चांगलं गाणं म्हणू शकतोस असं नाही.
मी : बरोबर.
त्या : तुला ज्या गोष्टीची आवड आहे, ती तुला करायला मिळणं महत्वाचं. तरच ती गोष्ट तू मनापासून करशील.
मी : लिखाण माझी पहिली आवड.
त्या : त्यामुळेच तर तुझं लिखाण प्रभावी ठरतं.
मी : प्रयत्न करतो.
त्या : माझ्या क्षितिजनेही खूप प्रयत्न केले.
मी : कशासाठी?
त्या : बारावीला सर्व विषयांमध्ये पास होण्यासाठी.
मी : मग?
त्या : नेमकी मला ज्याची भीती होती, तेच झालं.
मी : काय झालं?
त्या : क्षितिज फिजिक्समध्ये नापास झाला.
मी : बॅड लक..
त्या : इतरांसाठी ते शॉकिंग होतं, मात्र मला असं काहीतरी घडणार याचा आधीच अंदाज होता.
मी : का बरं?
त्या : सततचा दबाव.
मी : कुणाचा?
त्या : मिस्टरांचा.
मी : का बरं?
त्या : त्यांचं म्हणणं होतं की, क्षितिजमुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
मी : काहीही..
त्या : योगायोगाने क्षितिज आणि त्याची आतेबहीण दोघेही बारावीला.
मी : ओह..
त्या : त्यामुळे जणू दोघांमध्ये एक अघोषित स्पर्धा लागलेली.
मी : बरोबर.
त्या : मी मात्र हतबल असल्याने, काहीही बोलू शकत नव्हते.
मी : का बरं?
त्या : मी स्वतः फक्त बारावी शिकलेली.
मी : असं काही नाही. मुलगा तर तुमचाही.
त्या : माझा खूपदा कमी शिक्षणावरून घरात अपमान झालेला.
मी : अरे रे..
त्या : त्यामुळे मी माझ्यापरीने फक्त मुलांचा बचाव करू शकत होते.
मी : ढालीची भूमिका.
त्या : अक्षय हे असं काही झालं, तर क्षितिजचे पप्पा भयंकर चिडणार हे मला आधीच ठाऊक होतं.
मी : काय झालं?
त्या : ते ऑफिसवरून आले आणि त्यांनी क्षितिजला मारायला सुरुवात केली.
मी : शीट.
त्या : आधीच तो घाबरलेला, त्यात मिस्टरांची शिवीगाळ.
मी : अरे..
त्या : मी क्षितिजला वाचवायला गेले, तर मिस्टर माझ्यावरच भडकले.
मी : का बरं?
त्या : म्हणे तूच लाडावून ठेवलंय या नालायकाला.
मी : वाईट.
त्या : हे सगळं घडणार याची मला आधीच जाणीव होती. म्हणूनच..
मी : म्हणूनच काय?
त्या : मी आधीच तयारीत होते.
मी : कसली तयारी?
त्या : मी सर्टिफिकेट गोळा करून ठेवलेले.
मी : कुणाचे?
त्या : क्षितिजच्या वडिलांचे.
मी : कोणते?
त्या : त्यांच्या अपयशाचे.
मी : काय?
त्या : हो. माझे मिस्टर टायपिंगच्या परीक्षेला दोनदा बसलेले आणि दोन्ही वेळेस ते नापास झाले.
मी : काय?
त्या : माझी नणंदही एमएस सीआयटी परीक्षेत नापास झालेली.
मी : अरे..
त्या : सगळ्यांना सगळ्याच गोष्टी येत नाहीत.
मी : खरं आहे.
त्या : मी ते सर्टिफिकेट दाखवल्यावर मिस्टर नरमले.
मी : मग?
त्या : म्हणे, यापुढे तुम्हाला मायलेकांना जो गोंधळ घालायचा तो घाला.
मी : मग?
त्या : आता माझ्या मुलाच्या भविष्याची जबाबदारी सर्वस्वी माझ्यावर होती.
मी : बरोबर.
त्या : मी बारावी पास बाई, मी माझ्या मुलाच्या भविष्याची वाट लावणार.
मी : असं कोण म्हटलं?
त्या : माझी नणंद.
मी : का बरं?
त्या : कारण त्यांच्या मुलीला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं होतं.
मी : ओह..
त्या : अक्षय विरंगुळा म्हणून, बऱ्याच वर्षांपासून मी ब्लाउज शिवते.
मी : ओके.
त्या : माझ्या माहेरी आमचा टेलरिंगचा व्यवसाय होता. त्यामुळे आम्ही सर्व बहीण भावंडं शिवणकामात एक्सपर्ट.
मी : लहानपणापासून तेच पाहण्यात.
त्या : त्यामुळेच मी क्षितिजला माझ्या भावाकडे पाठवलं.
मी : का बरं?
त्या : तसंही त्याचं ते वर्ष वाया गेलेलं. म्हणून फिजिक्सचा अभ्यास करताना, टेलरिंग कामही शिकून होईल. या उद्देशाने..
मी : मग?
त्या : माझ्या त्या निर्णयालाही त्याच्या वडिलांचा विरोध.
मी : का बरं?
त्या : अधिकाऱ्याचा मुलगा टेलरिंग काम करणार म्हणून.
मी : कुठलंही काम लहान नसतं.
त्या : हेच कळायला त्यांना ७ वर्षे लागली.
मी : म्हणजे?
त्या : त्यावर्षी क्षितिज टेलरिंग तर शिकलाच, मात्र फिजिक्समध्येही पास झाला.
मी : क्या बात.
त्या : त्यानंतर मला नेहाने सांगितलं.
मी : काय?
त्या : तिला क्षितिजची डायरी सापडलेली.
मी : मग?
त्या : त्या डायरीत त्याने, आत्महत्येचे विचार मनात येत असल्याबद्दल लिहिलं होतं.
मी : कधी?
त्या : नापास झाल्यानंतर..
मी : बाप रे..
त्या : म्हणून तर माझा निर्णय योग्य ठरलेला.
मी : कोणता?
त्या : त्याला वडिलांपासून लांब पाठवण्याचा.
मी : त्याच्यावरील दबाव तुम्ही दूर केला.
त्या : ढाल असतेच त्यासाठी..
मी : पुढे?
त्या : पुढे क्षितिजने आर्ट्सला ॲडमिशन घेतलं आणि बाहेरून प्रायव्हेट फॅशन डिझायनिंगचा कोर्सही पूर्ण केला.
मी : वाह.
त्या : शिक्षण सुरु असताना, तो कपडेही शिवत होता. त्यामुळे पैसे मागे पडत होते.
मी : बरोबर.
त्या : ३ वर्षांपूर्वी त्याने स्वतःचं टेलरिंग शोरूम सुरु केलं.
मी : सही..
त्या : मला अभिमान आहे की, माझं पोरगं नावाजलेलं ब्लेझर एक्सपर्ट आहे.
मी : एका आईला आणि काय हवं?
त्या : माझ्या मिस्टरांची रिटायरमेंट जवळ आली आहे.
मी : ओके.
त्या : मात्र त्यांना आता जेवढा पगार आहे, त्याहून अधिक पैसे माझा क्षितिज कमावतो.
मी : कुठलंही काम लहान नसतं.
त्या : अक्षय तू विचार कर की, जर योग्यवेळी मी माझ्या मुलाची ढाल नसते बनले तर?
मी : तर काहीतरी अघटित घडलं असतं.
त्या : तेच तर मला घडू द्यायचं नव्हतं.
मी : तुम्ही तुमची जबाबदारी चोख पार पाडली.
त्या : म्हणून तर आज तुझ्याशी बोलायचं ठरवलं.
मी : खूप प्रेरणादायी अनुभव.
त्या : तुझ्या माध्यमातून मला सर्व आयांना एकच विनंती करायची आहे.
मी : कोणती?
त्या : जोपर्यंत तुमच्या पाखरांच्या पंखांमध्ये भरारी घ्यायचं बळ येत नाही, तोपर्यंत त्यांची ढाल बना.
मी : अगदी खरं.
त्या : एक आईच आपल्या मुलाच्या भावना सर्वात आधी जाणून घेऊ शकते.
मी : बरोबर.
त्या : आईचं आणि वडिलांचं स्वतःच्या मुलांवर जरी सारखं प्रेम असलं, तरी..
मी : तरी काय?
त्या : तरी मुलाने आईच्या उदरातून जन्म घेतलेला असतो. म्हणून आईशी त्याची नाळ जुडलेली असते.
मी : सच बात.
त्या : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, तुम्हाला तुमच्या मुलांसापासून दूर नेणारी बरीच साधनं आहेत.
मी : तीच तर शोकांतिका आहे.
त्या : म्हणूनच काम, मित्रमंडळी, नातेवाईक, मनोरंजन या सर्वांच्या आधी, तुमच्या मुलांना प्राधान्य द्या.
मी : का बरं?
त्या : कारण व्यसनं, अपराध, अविचार आणि इतर शेकडो संकटांपासून, फक्त आईरूपी ढालच लेकरांचा सर्वोतोपरी बचाव करू शकते.
मी : ज्जे बात.

लेखक : श्री. अक्षय भिंगारदिवे (सर्व हक्क राखीव आहेत.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा