बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५

2144. इश्कवालं अरेंज मॅरेज

 "शेतीबागा माड्याची ग वाडी;
नवरीला घुंगराची गाडी;
जशी राजाराणीची ग जोडी;
नवरीला चांदण्याची साडी;"
"Wow...कसलं सॉलीड गाणं लागलय यार..!"
सरिता आनंदाने म्हणाली.
मेघा :- "ए बंद कर ते गाणं आधी...उगाच रडु येत..."
सरिता:- रडायला काय झालं तुला...अजुन दोन महिने बाकी आहेत...मस्त मजा कर...आणि थोडे अश्रू जातांनासाठी शिल्लक ठेव...हेहेहे...
सरिता हसत हसत म्हणाली.
मेघा :- तुझं लग्न असतं तेव्हा समजलं असतं...मला या गाण्यतला एक एक शब्द टोचतोय ग...का मला अस दुसऱ्याच्या घरी पाठावत आहात तुम्ही..?
सरिता:- दी...आपण मुली परक्याचं धन असतो अस तूच मला सांगितलं होतं ना?...आज तु चाललीयेस उद्या मलाही जावं लागेल...
मेघा;- खरय..आपल्या मुलींच्या life मध्ये काहीच permanent नसतं. ना आपलं घर...ना आपलं नाव...काहीच नाही..
दोन्ही बहिणी गप्पा मारत होत्या..
मेघा मोठी बहीण...स्वच्छंदी स्वभावाची...जिन्स, टॉप, घड्याळ, मोकळे केस ,गॉगल...एवढाच तिचा शृंगार.
इन्कमटैक्स अॉफिसमध्ये दोन वर्षांपासुन काम करत होती. 45,000 पगार...तिला बघायला आलेल्या निखिल देसाई सोबत तिचे सुत जुळले आणि सुदैवाने दोघांचे लग्न ठरले होते. साखरपुडा होऊन एक आठवडा झाला होता...आणि तिचं स्वतःच घर आता माहेर झालं आहे हे तिला जाणवु लागले होते..तशी ती दिसायला फारच सुंदर होती. निखिलपण हैण्सम हंक होता....निखिलच्या आईला तर दोघांची जोडी लक्ष्मी नारायणाची जोडी वाटायची.
सरिता धाकटी बहिण होती. शांत स्वभावाची...निरागस...कमी बोलणारी..
अरुणशेट आणि सुलोचनाताईंच्या या दोन्ही मुलीच. गुण आणि सौंदर्याची खाण...
सरिता डी-फार्मसीच्या शेवटच्या वर्षाला होती. 
दोन्ही मॉडर्न होत्या. राहणीमाणानेही आणि विचारांनीही...
#कथाविश्व 
"दी...लवकर ये...जिजुंचा कॉल आहे..."
"हॕलो...काय रे निखिल लँडलाईनवर का कॉल केला...माझ्या फोन वर करायचा न नेहमी सारखा"
"अगं तुझा फोन लागत नाहीये...मी खुप ट्राय केलं...मग काळजी वाटली म्हणून घरी केला.."
"अरे सॉरी...आज हळदीला गेलो होतो ना आम्ही मितालीदीच्या म्हणून स्विचअॉफ झाला माझा फोन...आता अर्धा तासापुर्वीच आलो आम्ही घरी.."
"अस होय...मला वाटलं काय झालं अचानक फोन बंद लागतोय.."
"बरं निखिल तु उद्या लग्नाला येणार आहेस ना..आज मामा म्हणत होते...तुला घेऊन येऊ अस.."
"हो मला लक्षात आहे ते..आपण जाऊ सोबत.."
"ठिक आहे...मी तुला रात्री माझ्या मोबाईलवरुन कॉल करेल...byee"
"हो चालेल byee"
लग्नाचा दिवस उजाडला...निखिल मेघाच्या घरी पोहोचला.
निखिल :- नमस्कार बाबा..
अरुण:- अरे या या जावाईबापु...बसा...सुलु अग जावाईबापु आलेत...चहा पाण्याच बघ...मि मेघा ला बोलवतो हा....मेघा...अग झाली का तयारी??...निखिलराव आले सुद्धा...या बायकांना नटायला आख्खा दिवस ही कमी पडेल..हेहेहे...
हसत हसत ते निखिलला म्हणाले...निखिल किंवा त्याच्या घरचे कुणीही आले की अरुणशेठला किती करु आणि किती नाही असे व्हायचे...आणि होऊ का न्ये...पहिलाच जावाई त्यांचा आणि देसाई मंंडळी म्हणजे सज्जन कुटुंब...
मेघा धडपड करत हॉलमध्ये गेली...तिने पडद्यामागनं निखिलला चोरून पाहिलं आणि लाजली...निखिलने मात्र तिला पकडले...त्याला समजले हे पाहून ती बाहेर आली...
कायम 
जिन्स पँट आणि टी शर्ट घालणाऱ्या मुलीला आज पारंपरिक साडी मध्ये पाहून बाबा आणि निखिल दोघे आश्चर्यचकित झाले...बाबांचे डोळे भरून आले कारण त्यांचं लेकरु मोठं झालं होतं....निखिलच्या हृदयात "तारीफ करु क्या उसकी जिसने तुम्हे बनाया" हे गाणे वाजत होते....
चहा घेऊन आलेली आई सुद्धा तिच्या त्या मनमोहक रुपा कडे बघतच राहिली..
पहिल्यांदा साडी नेसल्यामुळे तिला थोडं अवघडल्यासारख वाटत होतं...पण ती खुश होती...
बाबा:- झाली बेटा तयारी...घ्या जावाईबापु चहा घ्या...
निखिलने पटपट चहा संपवला....
आई:- चला आपण निघुया आता...दादाचा फोन येऊन गेला...
मेघा:- आई बाबा तुम्ही सरीला घेऊन व्हा पुढे...मी आणि निखिल त्याच्या गाडीत येतो...
आई:- चालेल...पण वेळेत या दोघेही...
स्मित हास्य देत आई म्हणाली...
मेघा आणि निखिल एकत्र यायला निघाले...निखिलच्या गप्पा सुरु होत्या...पण मेघा कोणत्या तरी विचारात हरवली होती..
निखिल :- मेघा...काय ग...कुठे हरवलीयेस..???
मेघा :- आज मितु दी चं लग्न आहे...तुला माहितीये...मितु दी रंगाने सावळी...अबोल आणि भोळी आहे...पण तेवढीच हुशार आणि talented आहे...तिच्या लग्नासाठी मामा एक वर्षापासून प्रयत्न करत होते...खुप स्थळे पाहिली...पण कुणी रंग सावळा असल्यामुळे नकार दिला तर कुणी "ही एवढी शांता आहे संसार कसा सांभाळेल" म्हणून नकार कळवायचे...माघच्या महिन्यात तिला प्रमोशन भेटले...आणि त्यानंतर तिला जे स्थळ आलं त्या मुलासोबत तिचं जमलं...
तिला प्रमोशन भेटलं आणि लगेचच लग्न जमलं...फक्त ति आता जास्त कमवणार म्हणून..हे चुकीचे आहे....
निखिल:- हो...पण दोघांनाही ते पसंत आहेत ना...मिया बिवी राजी तो क्या करेगा काजी...
हसत हसत तो म्हणाला...
मेघा :- मितुदी थोडी disturbed वाटली काल म्हणून मी तिची best friend अंकिताला विचारलं...ती म्हणाली सुबोध मिताली पेक्षा पाच सहा वर्षाचा मोठा आहे...मला धक्काच बसला...नेहमीच आम्हा मुलींनाच का समाजुन घ्याव्या लागतात सगळ्या गोष्टी.
निखिल ने तिला कसतरी समजवलं आणि शांत केलं. दोघेही विवाह स्थळी पोहोचले...सगळे मस्त नटले होते. तिन चारशेच्या आसपास लोक होते. मुलीकडुन आलेले बहुतेक पाहुणे दोन महिन्यात परत येणार होते...मेघा आणि निखिलच्या लग्नाला...मेघा पाहुण्यंना निखिलसोबत ओळख करून देत होती...वरात आली...सुबोध आणि मिताली मांडवात आले...मंगलआष्टक सुरू होते. मेघा आणि निखिल एकमेकांकडे बघुन गालातल्या गालात हसले. पण मेघाला माञ विचारांनी घेरलं होतं...
आपल्या प्रेयसी आणि होणाऱ्या बायकोचा समज असा झाला आहे की सगळ्या तडजोडी मुलींनाच कराव्या लागतात...पण लग्नानंतर मुलांनाही बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात...अस निखिल मनातल्या मनात म्हणाला..
लग्न झालं आणि सगळे आपल्या घरी गेले..
दिवस जात होते आणि लग्नाचा तो सोनेरी दिवस जवळ येऊ लागला...
लग्नाचा दिवस उजाडला...घर पाहुण्यांनी भरलं होतं...सर्व पहाटे 4 वाजे पासुनच उठले होते...वेळेत तयारी व्हावी म्हणून सगळे आवरसावर करत होते...बघता बघता 11 वाजले...मुलाकडाची मंडळी हॉलमध्ये आली...लग्नाची वेळ सायंकाळी 7:19 ची होती...दुपारी सगळ्यांना हॉलवरच जेवण होतं...आता फक्त ओढ होती ती साडेसात वाजेची...वरात निघाली...लाल कुर्ता क्रिम कलरच धोतर...सोनेरी आणि लाल कॉंबिनेशनचा फेटा...मुंडवळ्या जणु राजपुत्राची सवारी निघाली आसावी असे दृश्य होते...अर्थातच राजपुत्र म्हणजे निखिल....वरात मांडवाच्या दाराशी आली...सगळ्यांची नजर आता नवरीला शोधत होती....तेवढयात मेघाला घेऊन सरिता आणि त्यांच्या चुलत-मावस बहीणी आल्या. मरुण कलरची पैठणी, पांढराशुभ्र गजरा, सोनेरी दागिने, डोक्यावर शोभून दिसणारी सोनेरी ओढूणी आणि या सगळ्या सुंदर रुपात भर पाडणारी मेंदी आणि मुंडवळ्या...लक्ष्मी प्रमाणे दिसत होती मेघा...
दोघेही मांडवात आले...मंगलाष्टके झाली...विधी सुरू झाल्या...मग फेर्यांसाठी दोघेही उभे राहिले...
पहिली फेरी घेतांना निखिल मेघाच्या कानात म्हणाला
निखिलः- ही पहिली फेरी. मी या फेरी सोबत माझ्या स्वतंत्रतेचा त्याग करतो. यापुढे माझा प्रत्येक निर्णायात तुझ मत महत्त्वाचे असेल.
दुसरी फेरी. या फेरी सोबत मी माझ्या घरच्यांची माझ्यावर असलेली 100% जवाबदारी 50% होईल असे घोषित करतो. कारण आता मला तुझी जवाबदारी तितकीच महत्त्वाची आहे जितकी त्यांची.
तिसऱ्या फेरीसोबत मी स्वतःच्या आवडीनिवडींचा काही प्रमाणात त्याग करतो. कारण यापुढे मला काही गोष्टी  तुझ्या आवडीप्रमाणे करायला लागणार.
चौथ्या फेरीसोबत मी माझ्या मिञपरीवारा कडुन क्षमा मागतो. कारण मला जास्तीत जास्त वेळ तुला द्यावा लागणार आणि त्यामुळे आमच्यात मित्रांमध्ये दुरावा येणाची शक्यता नाकारता येत नाही. 
पाचवी फेरीत मला काही वेळा प्रसंगानुसार आईवडिलांच्या विरूद्ध वागायला लागणार. कारण तुझे रूसवे फुगवे दुर होण महत्त्वाचे असणार.
सहावी फेरी थोडी कठीण आहे कारण यात मला कायम तुझ्या सोबत राहिल हे वचन पुर्ण कराव लागणार आणि भविष्यात तुझ्यात व माझ्या आईवडीलांमध्ये भांडणे ओढावली तर दिलेल्या वचनाप्रमाणे घर व त्या मायबापाचा त्याग करावा लागेल. अशी वेळ येऊ नये यासाठी आपण दोघेही दोन्ही बाजूने प्रयत्नशील राहिले पाहिजे. 
शेवटच्या म्हणजेच सातव्या फेरीत सगळ्यात कठीण वचन बोलावे लागणार...ते असे की आता तु, तुझ्या ईच्छा, तुझ्या आकांक्षा, तुझे छंद, तुझे आनंद, आपली मुलं या सगळ्यात मला माझ्या ईच्छा, छंद काही प्रमाणात विसरावे  अथवा कमी करावे  लागणार. लहानपणी कधी रडलो तर आई पदराने डोळे पुसुन देत...पण आता मात्र बायकोचा धीर तुटु न्ये म्हणून अश्रू डोळ्यांत दाबुन ठेवावे लागणार..."
निखिल प्रत्येक फेरीसोबत एक एक वचन घेत होता...ते फक्त मेघाच ऐकत होती...तिचे डोळे रडल्याने आणि चेहरा शरमेने खाली झुकलेला होता...आता तिला कळुन चुकले होते की मुलींनाच नाहीत तर मुलांना सुद्धा लग्नानंतर बरेचसे त्याग करायला लागतात...
मनातल्या मनात ती स्वतःशीच म्हणाली
"किती चुकीचा विचार करत होतो आपण...मुलींना समजुन घ्यावं लागतं...पण मुलांना समजुन घेणार कुणीच नसतं..."
विधी झालेल्या आणि आता सगळे नातेवाईक भेटण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी स्टेजवर येऊ लागले...
हळुवार निखिलच्या कानात मेघा म्हणाली
"निखिल...मि ही तुला वचन देते...माझ्यामुळे तुला कधीच कोणतेही कठीण निर्णय घ्यावे लागणार नाही...आणि हो...फेऱ्यांच्या वेळी बोलत होतास ना माझे आईबाबा...माझे आईबाबा...आता ते आपले आईबाबा आहेत..."
निखिलचा आनंद गगनात मावत नव्हता..
"चला..राणीसाहेबांचे डोळे उघडले म्हणायचे" तो मनोमनी म्हणाला..
आता मेघाला कोणतीही शंका नव्हती फक्त आपलं भविष्य उज्वल आहे याची खाञी होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...