आपले आई-वडील, आजी-आजोबा आपल्या तुलनेत वैज्ञानिकदृष्ट्या खूप पुढे होते. शेवटी दमून-भागून आपल्याला पुन्हा त्यांच्या वाटेवरच यावं लागतंय.
1. मातीच्या भांड्यांपासून स्टील व प्लास्टिकच्या भांड्यांपर्यंत, आणि मग कॅन्सरच्या भीतीने पुन्हा मातीच्या भांड्यांकडे वळणं.
2. अंगठ्याच्या छापापासून सही (Signature) पर्यंत, आणि आता पुन्हा अंगठ्याच्या स्कॅनिंगपर्यंत पोहोचणं.
3. फाटलेल्या साध्या कपड्यांपासून स्वच्छ व इस्त्री केलेल्या कपड्यांपर्यंत आणि मग "फॅशन"च्या नावाखाली पुन्हा फाटकी जीन्स घालणं.
4. सुताच्या कपड्यांपासून टेरीलीन, टेरिकॉट आणि मग पुन्हा सुताच्या कपड्यांमध्ये परतणं.
5. खूप मेहनतीच्या आयुष्यापासून पळून शिक्षण घेणं, MBA व IIM करणे, आणि शेवटी "Organic Farming"च्या नावाखाली पुन्हा शेतात घाम गाळणं.
6. नैसर्गिक अन्नापासून प्रोसेस्ड फूड, डबाबंद रस याकडे वळणं, आणि मग रोगांपासून वाचण्यासाठी पुन्हा नैसर्गिक अन्नाकडे परतणं.
7. साध्या आणि जुना वस्तूंऐवजी ब्रँडेड वस्तूंना महत्व देणं आणि नंतर मन भरल्यावर पुन्हा "Antique" वस्तूंचं कौतुक करणं.
8. मुलांना मातीशी खेळू न देणं. त्यांना घरात बंद करून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी करणं आणि मग पुन्हा ती वाढवण्यासाठी मातीशी खेळू देणं.
9. गाव, जंगल सोडून डिस्को, पब आणि शहराच्या झगमगाटाकडे धावणं, आणि मग मन:शांती व आरोग्यासाठी पुन्हा गावाकडे, निसर्गाकडे परतणं.
या सर्वातून एकच निष्कर्ष निघतो:
तंत्रज्ञानाने जे दिलं त्यापेक्षा खूप सुंदर आणि आरोग्यदायी गोष्टी निसर्गाने आधीच दिलेल्या होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा