काठीचा आधार घेत म्हतारी वेटींग पर्यंत कशीबशी पोहचली.
निळ्या रंगाचे जिर्ण झालेले लुगडं व त्याच रंगाचा सोनेरी किनार असलेला खन अंगात घातलेला.
डोक्यावरील केस पिकलेले,चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे विणलेले,हातात आधारासाठी काठी,येऊन म्हतारी वेंटीगरुम मध्ये बसली.
दोन तीन पेशंट झाल्यानंतर तिला आत बोलावले.
सोबत कुणीही नव्हते,आत पायरी चढून येण्याचा प्रयत्न करत होती पण ते तिला जमेना,मग खुर्चीवरून उठून तिला हात देत मी कॕबिनमध्ये घेतले.
"पाय दुखतो लई,म्हणून इथवर आले बाबा"
येवढे बोलून म्हतारी शांत झाली.
सहजच मुलांबद्दल विचारलं कि एकट्याच आल्या कुणी सोबत नाही आले का?
तर म्हतारीचे डोळे पाणावले.
जरा वेळ शांत झालो....
तिला थोडेसे पाणी दिले.
अश्रूंचा बांध जरा ओसरला तसे म्हतारी बोलू लागली...
नकळत्या वयातचं लग्न झालं आणि आई बाप अपघातात वारले,तिच्या मागे फक्त एक भाऊ होता तेव्हा.
दोन मुलींना जन्म दिला आणि नवऱ्याने टाकून दिलं.
हाताला काम नाही,एकटी बाईमाणूस मग भावाकडे मुलींना घेऊन राहयाला आली.
घरची परिस्थिती बेताचीचं एकरभर जमीन होती तीच करून कसेबसे दिवस ढकलायचे काम सुरु होते.
चार पाच वर्ष गेली आणि भावाला अर्धांगवायुचा झटका झाला,तो आथंरुनाला खिळला तो कायमचाचं.
एकुलताएक आधार ही दिवस दिवसभर पडून होता आता.
हाताशी दोन मुली आणि आता भावाचही बघावं लागणार होतं.
कशी बशी रडत कडत शेतीतून जे येईल ते व इतरांच्या वावरात मोलमजुरी करून मुलींना वाढवले.
दोघींचेही लग्न लावून दिली.
लग्नाच्या चौथ्याच दिवशी एक मुलगी व जावयी अपघातात गेले.
दुसरी मुलीचही माझ्यासारखीच गत झाली.
एक मुलगा झाला आणि तिचा नवरा तिला सोडून दुसऱ्याबाई सोबत निघून गेला.
मी तिलाही माझ्याकडे घेऊन आले.
अंथरूणावर पडलेला भाऊ,मुलगी आणि नातु या सर्वांच करत होते,मुलगीही मदत करत होती.
आता सर्व छान होईल या एका आशेवर आयुष्यात आलेले सर्व दुःख बाजुला सारून जगणे सुरु होते पण नियतीच्या मनात काय होते कुणास ठाऊक.नातु अठरा वर्षाचा झाला,मित्रांसोबत जातो असं सांगून घराबाहेर पडला तो परत आलाचं नाही.बरंच शोधलं पण सापडला नाही.
चार दिवसांनी शेजारच्याच एका विहरीत त्याच प्रेम तरंगताना दिसलं.
काय काय भोग भोगलेत आणि काय काय अजून बघावं लागेल देव जाणे.
हे सर्व ऐकताना म्हतारीचं आयुष्य डोळ्यांसमोर उभा राहीले.
शेवटी मनात विचार आला नियतीचा फेरा कुणाला चुकला नाही हेच सत्य.
आपण आपल्या वाटेला आलेल्या सुख दुःखाचा बाजार मांडत त्यालाच कवटाळून बसतो,जेव्हा अशा लोकांना आपण भेटतो तेव्हा कुठे वाटते कि,आहे ते खूप छान आहे सर्व आपले.
लोकांची दुःख ऐकायला शिकायला हवं.याने आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो.
कदाचित हेच नियतीला या सर्व घटनेतुन सांगायचे असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा