बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५

2139. वास्तुशास्त्र

        प्रमोद हा एक तरुण व्यावसायिक होता.आधीपासून त्याने नोकरी करायची नाही असे ठरवल्याने जेमतेम कॉमर्स मधून ग्रॅज्युएट झाला होता.त्याने आधी बऱ्याच ठिकाणी कामं करून अनुभव घेतला आणि काही वर्षांनी कपड्याची होलसेल एजन्सी घेतली. हळू हळू दरमजल करत त्याने शहरात व्यवसायात चांगला जम बसवला. आता बऱ्यापैकी दुकानांमधे त्याचा माल जात होता. चांगली सेवा आणि दर्जा यामुळे व्यापारी त्याला ऑर्डर देत होते. प्रमोद च्या घरी लहानपणापासून परिस्थिती गरिबीची होती. वडील खाजगी नोकरीत होते त्यामुळे पगार कमी असल्याने परिस्थिती बेताचीच होती. पण प्रमोद च्या आजोबांनी घेतलेला मोठा प्लॉट आणि घर या जमेच्या बाजू होत्या त्यामुळे घराची चिंता नव्हती. प्रमोद ने आपल्या गरीब परिस्थिती वर मात करायची म्हणून आपण व्यावसायिक होऊन यातून बाहेर यायचे ठरवले होते त्यात त्याला यश देखील येत होते. आता त्याचा आत्मविश्वास वाढला होता आणि बाकी इतर व्यसन किंवा वाईट सवयी नसल्याने त्याने होणाऱ्या नफ्यातूनच अजून एक दोन नवीन व्यवसाय करायचे ठरवले होते.त्या प्रमाणे त्याने दोन कंपन्याशी करार सुद्धा केले होते.लवकरच त्या नवीन एजन्सीज देखील चालू होणार होत्या. प्रमोद चे वडील गंगाधरराव पण प्रमोद च्या यशावर आनंदी होते.
   प्रमोदच्या घरी दोन लहान भाऊ आणि आई वडील असे पाच जण राहत होते. धाकटा भाऊ लहानपणापासून पायात अपंग होता आणि मधला भाऊ आता  दहावीला होता. आई कायम आजारी असे.प्रत्येक घरात काहीतरी समस्या असतातच तो आयुष्याचा भाग आहे. असेच सगळे व्यवस्थित चालले होते. प्रमोद जिथे राहत होता तो मोठा प्लॉट आणि घर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खूप बाजारपेठेच्या जवळ होते. त्यामुळे बरेच व्यापारी ते प्लॉट आणि घर आम्हाला विका अशी मागणी करत असत. कारण त्यांना तिथे मोठा व्यवसाय करता येईल असा त्यांचा मानस होता. काही स्थानिक गुंड आणि राजकारणी सुद्धा याची मागणी करत होते. परंतु गंगाधरराव यांना ते विकायचे नव्हते कारण त्यांच्या वडिलांनी खूप कष्टांनी प्लॉट घेऊन घर बांधले होते. आता प्रमोद हुशार झाल्याने तो प्रत्येकाला पुरून उरत होता.त्यामुळे लोकांनी आता माघार घेतली होती.
       बाजारपेठेत एक नवीन व्यापारी प्रज्वल शेठ आला तो आधी सुरत ला होता आता त्याने या शहरात नवे दुकान थाटले होते.तो खूप श्रीमंत घरातून होता तिकडे भाऊ-बंदकी आड आल्याने सुरत सोडून तो इथे आला होता. स्वार्थी आणि कपटी असल्याने त्याला घरच्यांनी वाटा हिस्सा देऊन बाहेर काढले आणि तो इकडे आला. बाजारपेठेत आल्यावर त्याने सगळा सर्वे केला मार्केट कसे आहे, कोण कोण व्यापारी आहेत, होलसेलर्स कोण आहेत. फेरफटका मारताना त्याला प्रमोद चा प्लॉट आणि घर दिसले आणि त्याची विचारचक्र सुरु झाली जागा खूप मोक्याची आहे आपण घेतली तर मोठा मॉल किंवा सुपरमार्केट आपण उभारू शकतो. त्याने इतर व्यापाऱ्यांना याबद्दल विचारले असता सगळ्यांनी सांगितले आम्ही प्रयत्न केला आहे पण ते विकत नाहीत सगळ्याप्रकारे प्रयत्न केले आहेत तू पण नको बघू जमणार नाही पण याने चंग बांधला काहीही झाले तरीही ही जागा घ्यायचीच.सगळ्यांपेक्षा आपण वेगळ्या पद्धतीने घेऊ असं म्हणून त्याने आधी कोणाची जागा आहे मालक कोण आहे त्याची पार्श्वभूमी काय याचा अभ्यास चालू केला. माग त्याला प्रमोद बद्दल कळालं. प्रमोद कडे एजन्सी आहे आपल्याला त्याच्याशी जवळीक करावी लागेल त्याचा विश्वास मिळवावा लागेल तरंच आपल्या हाती काही लागेल हे कपट ठेवूनच त्याने प्रमोद शी मैत्री केली. प्रमोद च्या एजन्सी मधून माल घ्यायला सुरुवात केली. प्रमोद ला खूप जवळच मित्र बनवलं.त्याला त्याने खूप कौतुक करून आपलंस केलं.
        काही दिवसांनी त्याने आता आपला खरा उद्देश सध्या करायचा ठरवला प्रमोद ज्या कंपन्यांकडून माल घेऊन विकायचा त्यांच्या सेल्सहेड ला लाच देऊन प्रमोदचा माल शॉर्ट केला त्यामुळे वेळेत माल न मिळाल्याने बाजारात प्रमोदचे गिऱ्हाईक नाराज व्हायला लागले. काही दिवसातच मग प्रमोद आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला नव नवीन संकटं यायला लागली त्यातच त्याची आई खूप आजारी पडली. वडील गाडीवरून पडल्याने त्यांचा पाय मोडला अचानक आलेल्या संकटांनी प्रमोद खूप वैतागला होता एक दिवस असेच हो हताश असल्याचे पाहून प्रज्वल शेठ ने त्याला मुद्दामहून थोडी आर्थिक मदत केली प्रमोद ला थोडा आधार वाटला पण प्रज्वल शेठ च्या मनात काही वेगळेच होते हे त्याच्या लक्षात आले नाही.आता प्रज्वल शेठ ने विषयाला हात घातला तो प्रमोद ला म्हणाला अचानक एवढी संकटं आली म्हणजे नक्कीच तुझे काहीतरी ग्रह फिरले आहेत माझ्या ओळखीत एक ज्योतिषी आणि वास्तूशास्रज्ञ आहेत त्यांना आपण तुझी पत्रिका आणि घर दाखवू. काहीतरी सल्ला यात मिळाला म्हणून प्रमोद ला ही हायसे वाटले त्याने होकार दिला. 
    प्रज्वल शेठचे कपट कारस्थानाची सुरुवात झाली दोन दिवसानंतर ज्योतिषी आले. प्रज्वल शेठ च्या मर्जीतले आणि ओळखीतलेच ज्योतिषी आणि वास्तूशास्रज्ञ होते त्याने आपला उद्देश काय आहे काय आणि कसे सांगायचे हे पण सांगितले होते. प्रमोद ला दुकानात बोलवले ज्योतिषाने पत्रिका आणि हात पहिला आणि सांगितले तुमचे ग्रहमान खराब आहेत आतापेक्षा जास्त अडचणी वाढणार आहेत यावर उपाय काय विचारल्यावर वास्तुदोष सुद्धा असू शकतो त्याचे निवारण करावे लागेल त्यासाठी आधी आपल्याला घर पाहावे लागेल मग आपण बघू असे सांगितले. त्याप्रमाणे प्रमोद त्यांना आपल्या घरी घेऊन गेला सगळे बघितल्यावर वास्तुवाल्याने वास्तू दोष असल्याचे सांगितले तुम्ही एक तर यात खूप बदल करा किंवा ही जागा विका त्याशिवाय तुमच्या अडचणी दूर होणार नाहीत असे सांगितले. वास्तू दोषाने तुमचा भाऊ अपंग आणि आई सुद्धा आजारी असते आणि आता वडील देखील गाडीवरून पडले हे पटवून दिले वास्तविक पाहता हे वास्तू दोष वगैरे काहीच नव्हता माणसाचे विधिलिखित आणि भोग असतात त्यापुढे कुणाचे काहीही चालत नाही पण प्रमोद अडचणीत सापडल्याने त्याच्या हे लक्षात येत नव्हते. गंगाधररावांना हे काही पटले नव्हते पण प्रमोद पुढे त्यांचा नाईलाज होता. दोन दिवसांनी प्रज्वल शेठ ने प्रमोद ला सांगितले तू जागाच विकून टाक नाहीतर तुझे काही खरे नाही कारण आता तुझ्याकडे इतके पैसे नाहीत की तू घर पाडून पुन्हा नव्याने बांधु शकशील प्रज्वल शेठ ने प्रमोद च्या मनावर पूर्ण हे बिंबवले आणि बाजारात सुद्धा मुद्दामहून अफ़वा पसरवली की त्या जागेत दोष आहे त्यामुळे जागेचा भाव घटला. आता प्रज्वल शेठ चा 50% प्लॅन यशस्वी झाला होता. 
       आता फक्त जागा कशी विकत घ्यायची हे राहिले होते पुन्हा एकदा वास्तुशास्त्रज्ञ आले त्यांनी माझ्या ओळखीत एक जण आहेत त्यांना आपण ही जागा देऊ ते माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत असे सांगितले त्यामुळे प्रमोद ला हायसे वाटले. वास्तुशास्त्रज्ञाच्या अडून प्रज्वल शेठ च एका मित्राकरावी ती जागा घेणार होता. त्याप्रमाणे त्यांनी निरोपदेखील दिला. इकडे प्रमोद च्या घरी गंगाधर रावांना हा निर्णय अजिबात मान्य नव्हता पण प्रमोद ऐकायलाच तयार नव्हता. शेवटी प्रमोद ने जागा आणि घर विकण्याचा निर्णय पक्का केला दुसऱ्या शहरातील व्यापारी अर्थात प्रज्वल शेठ चाच माणूस येऊन बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सौदा केला एक महिन्यांनी खरेदी करणार सांगून काही रक्कम टोकन देखील दिली. बदनामी झाल्याने न विकणारा प्लॉट आणि घर फक्त प्रज्वल शेठ मुळे विकले गेले असा गोड गैरसमज प्रमोद चा झाला.
      गंगाधर रावांनी त्यांच्या थोरल्या भावाला सगळी हकीकत सांगितली तुम्ही तरी प्रमोदला समजवा अशी विनंती केली. थोरले बंधू पोलीस खात्यातून निवृत्त झाल्याने त्यांना जगाची पारख होती पण अश्या वेळेला काही पटतील अश्या गोष्टी किंवा पुरावे दाखवल्याशिवाय कुणाला पटत नाही हे माहिती होते त्यामुळे ते या प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरवले त्यांनी आधी प्रज्वल शेठ विषयी माहिती गोळा केली पण त्या चौकशीतून फार काही सापडले नाही मग त्यांनी तथाकथित ज्योतिषी आणि वास्तूशास्र वाला याची माहिती घेतली. बाहेरून चौकशीअंती तो वास्तू शास्रज्ञ कमी आणि एजंट जास्त असल्याचे कळाले मग त्याला भेटून प्रत्यक्ष भेट घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो कबूल झाला त्याने सर्व सत्यता सांगितली आपल्याला प्रज्वल शेठ ने कारस्थान करायला लावल्याचे सांगितले. त्याला या गोष्टी थांबवं अन्यथा मी तुला माझ्या पद्धतीने धडा शिकवतो असा दम भरल्यावर वास्तूशास्रज्ञ आणि ज्योतिषी घाबरला त्याने प्रमोद ला सर्व घटना क्रम समजावला.
     आता प्रमोदला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला आपल्या वाईटावर असलेल्या  प्रज्वल शेठ ला धडा शिकवायचा असे ठरवले. त्याने तो ज्या माल घेतो त्या कंपन्यांच्या मालकांना भेटला सेल्स मॅनेजर ने कसा कट केला हे सांगितले कंपनीच्या मालकांनी त्याच्या म्हणण्यानुसार त्या लोकांना कामावरून काढून टाकले. आता प्रमोद बाजारपेठेत जाऊन सगळ्या व्यापाऱ्यांना नक्की काय झाले आणि काय कट होता हे सांगितले. व्यापाऱ्यांनी प्रमोद ला साथ द्यायची ठरवून पुन्हा ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली. आता पुन्हा प्रमोद ने उभारी घ्यायला सुरुवात केली. प्रज्वल शेठ ला जाऊन भरपूर बोलून दम भरला त्याने प्रमोद ची माफी देखील मागितली.बाजारात प्रज्वल शेठ ची प्रचंड बदनामी झाल्याने त्याला या शहरातून काढता पाय घ्यावा लागला.
       प्रमोदच्या काकांनी प्रमोद ला सांगितले अरे, प्रमोद वास्तूशास्र हे एक शास्र जरूर आहे पण चमत्कार नाही. हे शास्र म्हणूनच घ्यायचे आहे त्यात विज्ञान आहे चमत्कार नाही. तुम्ही अडचणीत येता यात तुमच्या चुका किंवा हलगर्जी पणा असतो त्यात वास्तूचा काहीच संबंध नसतो. आपले काही पूर्वाश्रमिचे भोग असतात ते प्रत्येकाला भोगावेच लागतात त्यातून सुटका नाही अगदी देवांचे जे अवतार झाले आहेत त्यांना सुद्धा हे भोग चुकले नाहीत तर तुम्ही आम्ही कोण? ज्या वास्तू वाल्या आणि ज्योतिषीचे तू ऐकायला निघाला होता त्यांच्याच घरात खूप अडचणी आहेत तोच अर्थिक संकटात आहे म्हणून अशी कामं करतो त्याला एवढे ज्ञान आहे तर स्वतः च्या अडचणी का दूर करता आल्या नाहीत. तुझी जागा जर खराब आहे वास्तुदोष आहे मग त्याच्याच दुसऱ्या ग्राहकाला तो विकणार होता मग त्याला कशी काय ही जागा चालणार होती हा विचार तरी तू करायचा होता.
       आता मुद्दा राहिला आजारपणाचा भाऊ तर जन्मापासूनच अपंग आहे त्याचा जन्म झाला तेव्हा तुझे वडील दुसऱ्या शहरात नोकरी करत होते ते या घरात राहत नव्हते आणि आई चे वय झाल्याने आणि काही अनुवांशिक आजार असल्याने ती आजारी असते हे लक्षात घे. कधीही घर बदलल्याने किंवा नवीन घरात गेल्याने अडचणी दूर होत नसतात त्यावर आपल्याला मात करायची असते. प्रत्येक माणसाची वेळ आयुष्यात कधीतरी खराब येत असते ती चुकत नाही पण अश्या वेळेला माणूस हतबल होऊन अश्या लोकांच्या नादी लागतो कधी कधी त्याच्या संपर्कात आल्यावर चांगली वेळ येते पण त्या वेळेला आपला चांगला काळ सुरु झालेला असतो त्या माणसाचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे इथून पुढे संकटाला तोंड द्यायला शिक असे का होते आहे त्याच्या मुळाशी जा. या लोकांच्या नादी लागून निष्क्रिय होऊ नका.काहीही चमत्कार होणार नाही वेळ हेच मोठे औषध असते. फक्त कर्म चांगली ठेवा सगळं व्यवस्थित होईल. प्रमोद ला हे पटले या पुढे खबरदारी घेऊ असे मनोमन ठरवून तो पुन्हा नव्या जोशाने कामाला लागला. प्रमोदला हुशार काका भेटले पण सगळ्यांनाच काका असतात असे नाही  म्हणून हा लेखन प्रपंच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...