गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

2170. या गोष्टी प्रायव्हेट ठेवा

 १) सर्वांजवळ सगळं शेअर करू नका :
प्रत्येक माणूस तुमचा विश्वासू नसतो. आपली वैयक्तिक माहिती फक्त विश्वसनीय लोकांनाच द्या,
२) सोशल मीडियावर फक्त हवं तेवढंच टाका :
आपले फोटो, लोकेशन किंवा आर्थिक माहिती ओपन केल्यामुळे तुमचा गैरवापर होऊ शकतो.
३) मोठ्या यशाबद्दल आधी शांत राहा :
एखादं ध्येय पूर्ण होईपर्यंत त्याबद्दल सर्वांजवळ सांगणं टाळा. कारण नकारात्मक ऊर्जेचा (नजर लागणे) प्रभाव होऊ शकतो.
४) आपली आर्थिक स्थिती गुप्त ठेवा :
तुमचं उत्पन्न, बचत, गुंतवणूक ही माहिती इतरांना सांगणं टाळा. याचा गैरवापर होऊ शकतो.
५) नातेसंबंधातील गोष्टी प्रायव्हेट ठेवा :
तुमचं प्रेम, भांडणं किंवा वैयक्तिक क्षण हे सगळे सोशल मीडियावर उघड केल्याने नातं कमकुवत होऊ शकतं.
पुस्तक वाचल्याने माणसाचं मस्तक सशक्त होतं. सशक्त झालेलं मस्तक, कुणाचं हस्तक होत नसतं. आणि हस्तक न झालेलं मस्तक, कुठेही नतमस्तक होत नसतं. कुणाचीही ताकद, तो किती मोठा आहे, यावर कधीचं अवलंबून नसते. अहो, जो डोळ्यांनी दिसत नाही, अशा एका सूक्ष्मजीवाने, अख्ख्या जगाला वेठीस धरलंय होतं की नाही. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते. म्हणून सुखा पेक्षा समाधान शोधा. आयुष्य खुप आनंदात जाईल.
ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते, त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते. म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार यशस्वी व सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येत असं नाही, पण जे वाट्याला येत त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात. यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्विकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं. हीच आहे जीवनाची परिपूर्ण परिभाषा.
आयुष्यात सर्व कांही मिळते पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही, आयुष्य संपत जाते शोध कार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्ष्यांत येते की, जे बाहेर शोधत होतों ते तर माझ्याच जवळ होते‌‌.
प्रामाणिक आणि मनमोकळे वागणाऱ्या व्यक्तीला लोक पाठिंबा कमी देतात, आणि बदनामीच जास्त करतात. ज्याला संधि मिळते, तो नशीबवान. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, आणि जो संधीचे सोने करतो, तो विजेता. एखाद्याच्या रूपापेक्षा त्याच्या स्वभावावर प्रेम करा... कारण रूप एकवेळ फसवं असू शकतं, स्वभाव नाही.
: प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत... एक तर देऊन जा, नाही तर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही.  
 प्रत्येकाच्या जीवनात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात,
प्रेम काळजी आणि आदर पहिल्या दोन तुम्ही दिल्या की तिसरी तुम्हाला आपोआपच मिळते. नाती टिकवण्यासाठी आवश्यकता असते झूळझूळ वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या झर्‍यासारख्या स्वच्छ मनाची आणि त्याच बरोबर अतूट विश्वासाची...  
 “श्रद्धा हे काही खूळ नसून पूर्ण अनुभव आणि विचारांती प्राप्त झालेला निर्णय असतो. शुद्ध बुद्धीवादानेच प्राप्त झालेला तो निर्णय आहे. अर्थात श्रद्धा ही बुद्धीवादाच्या विरोधी नाही तर ती त्यास पोषक आहे. या श्रद्धेवर भक्तियोग आधारलेला असल्याकारणाने भक्तिमार्ग हा बुद्धीवादाच्या विरुद्ध आहे असे म्हणणे बुद्धीहिनत्वाचे अतएव अडाणीपणाचे आहे.” 
: चांगल्या व्यक्तिसोबतची मैत्री ही "ऊसा" सारखी असते..!
तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, ठोका किंवा ठेचुन बारीक बारीक करा तरी अखेरपर्यत त्यामधुन "गोडवाच" बाहेर येईल.
 शरीर सुंदर असेल किंवा नसेल, पण शब्द आणि मन शुद्ध असायला हवे. कारण माणसाची सवय आहे, तो लवकर चेहरा विसरतो पण शब्द आणि चांगले मन कधीच विसरत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...