पूर्वीचं लग्नाचं एक वेगळंच जग होतं.
अगदी अनोळखी माणसाला मुलगी दाखवली जायची.
कधीकधी नात्याचा पुसट संबंध असायचा.
पसंती एकदा झाली की, एकदा मंगळसूत्र गळ्यात पडलं की, त्या क्षणी ते दोघं "नवरा-बायको" घोषित !
ओळख नव्हती, नातं नव्हतं,
व्हॉट्सॲप नव्हतं, फोन नंबर तर दूरची गोष्ट
पहिल्यांदाच एकमेकांना लग्नात भेटायचं.
पण गंमत म्हणजे,
ते अनोळखी माणसाच घरं...
थोड्याच दिवसांत "आपलं घर" वाटू लागायच
आणि आपलीच जन्माची मायबापाची घरं, परकी वाटायला लागायची.
नवऱ्याचं घर म्हणजे एक नवं विश्व.
त्या घरात पाऊल ठेवताना प्रत्येक मुलगी थोडीशी घाबरलेली असते.
नवऱ्याच्या स्वभावाचा ती हळूहळू अभ्यास करत असते.
"रागीट तर नाही ना?",
"काय आवडतं?",
"कशाला नाही म्हणतो?"
"काय आवडत नाहीं "
मग त्यानुसार आपलं वागणं ठरवायचं.
कुठली गोष्ट आपल्या मनासारखी करून घ्यायची असेल,
तर त्यासाठी कुठलं "शस्त्र" वापरायचं ते ठरवायचं!
कधी लाडिकपणा करायचा,
कधी थोडंसं रडायचं,
की रुसून बसायचं
की घरात भांडी आपटायची
कधी चविष्ट पदार्थ त्याच्या समोर वाढायचे
किंवा कधी गोड गोड बोलायच
मग काय, तो पण सहजपणे तयार होतो!
खरेदी करतानाही अभ्यास हवा —
माझा नवरा तर प्रत्येक गोष्टीला "नाही" म्हणणारा !
कधीही काही मागा, आधी उत्तर ठरलेलं – "नाही."
पण आता इतक्या वर्षांनंतर मी एकदम तज्ज्ञ झालेय –
जे हवं असेल, त्याला "नाही" म्हणायचं, म्हणजे ते नक्की मिळतं!
उदाहरणच घ्या —
कधी स्वयंपाक करायचा मूड नसेल,
आणि बाहेरचं काही खायचं मनात असेल,
तर लगेच म्हणायचं,
"आज जरा कंटाळा आलाय. पण जाऊ दे... बाहेरचं जेवण महागच असतं, खिचडीच करते."
मग थोडंसं थकलेपण दाखवायचं, लगेच नवरा म्हणतो —
"अरे जाऊ दे ! कितीसे पैसे जातात? मागऊन घे काहीतरी !"
तसंच, एखाद्या कार्यक्रमासाठी साडी घ्यायची असेल,
तर म्हटलं की, "राहू द्या हो आता कुठे साडी खरेदी करत बसणार तुम्हाला कुठे वेळ आहे. कपाटातलीच घालते. दोनदा वापरलीय फक्त."
बस्स ! लगेच नवरा म्हणतो - "चल, एवढा किती सा वेळ लागणार आहे किती मन मारते घेऊन टाक नवीन साडी 😃😃!"
कधीकधी त्याच्या कामातून उशीर झाल्यावर विचारलं की -
"अजून उशीर होईल का हो?"
तर तो म्हणतो, "हो, पण तू झोप. मी आलो की जेवणं घेईन हाताने"
पण खरं सांगायचं तर, त्याला माहित असतं –
ती झोपणार नाही. तो येईपर्यंत वाट बघणार.
हे त्याचं मूक पण मोलाचं नातं असतं.
सणासुदीच्या वेळी तर वेगळाच अनुभव.
त्याला काय साजेसं आहे, याचं निरीक्षण करत करत
साडीचा रंग, आरतीचं ताट, देवघराचं सजावट.
सगळं त्याला पटेल असं करायचं.
आणि खरंतर,
त्या प्रत्येक लहानशा गोष्टीतून बाई तिचं "घर" निर्माण करत असते.
कधी कमीपणा घेऊन, कधी समजूतदारपणानं,
तर कधी मिश्किल डावपेचांनी
😊 स्त्रीचं डोकं म्हणजे Google Autocomplete —
एक वाक्य बोललात की पुढचं ती आधीच ओळखते!
पण याच निरीक्षणशक्तीमुळे,
ती घर सांभाळते, नातं जपते आणि संसार गोड करते.
"ती आधीच भाकीत करते!"
(एक वाक्य ऐकून पुढचं तिला आधीच कळतं)
"वाक्याच्या पहिल्या दोन शब्दांवरच ती निष्कर्ष काढते !
"ती म्हणजे नवऱ्याच्या मनाचा रिमोट कंट्रोल!"
"ती म्हणजे घरातली Google… पण फक्त आधीच सगळं शोधून ठेवते!"
"ती नवऱ्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच उत्तर शोधून ठेवते!"
कारण खरं सांगायचं तर,
भांडण करून संसार टिकत नाही,
त्यात स्वतःचं नुकसान जास्त होतं.
पण नवऱ्याचा मनापासून अभ्यास करून,
त्याचं मन कसं जिंकायचं हे जमलं…
की संसार आपसूकच गोड होतो.

बायकोच्या मनात काय आहे ते
कुठल्याच नवऱ्याला कधी कळलंय का?
पण नवऱ्याच्या मनात काय आहे
ते प्रत्येक बायकोला मात्र कळत... अगदी बरोबर समजतं !!!!!
बायको म्हणजे नवऱ्याची Personal Diary च असते
कधी काय हवं, काय नको, कुणाचा वाढदिवस, कुणाच लग्न
सगळं तिच्या डोक्यात Save केलेलं असत ....
ते सुद्धा Reminder सकट
चोरांची प्रत्येक चाल जशी पोलिसांना कळते
तशी नवऱ्याची बायकोला.
तिच्याकडे सर्व पुरावे असतात पण जोपर्यंत
नवरा काही बोलत नाही तोपर्यंत बायको मात्र गप्प असते
एकदा का सापडलात तर मात्र तुमची काही खैर नसते.. 🤣
हवामान खात्यापेक्षा बायका दोन पावल पुढे असतात
नवऱ्याच्या चेहऱ्यावरूनच तिला भूतकाळ,
भविष्यकाळ, वर्तमान सगळ्यांची कल्पना येते
हो आणि येणाऱ्या प्रसंगासाठी बाई अगोदरच सज्ज असते😍
कधी प्रेमाने नवऱ्याला गोंजारायच आणि कधी दम द्यायचा
कधी अश्रूंच ब्रम्हास्त्र काढायचं. जसा अभिमन्यू आईच्या पोटी
चक्रव्ह्यू भेदायचा शिकला तशी ती हि शिकली असते ...
पण बायकोच ती.
म्हणून प्रत्येक नवरा संसाराचा गाडा ओढत असतो🥰
बायको म्हणजे संसाररूपी शरीराचं हृदयच असते
ती जोपर्यंत असते तोपर्यंत संसार संसार असतो
जवळ असली कि वसंत फुलतो
दूर असली कि शिषिर बसतो❤️
वेळप्रसंगी नवऱ्याला फुलाप्रमाणे जपते
आणि समईतल्या वातीसारखी नवऱ्यासाठी जळते.
संकटामध्ये कधी दुर्गा होते तर
कधी मुलांसाठी सरस्वती ,
घरच्यांसाठी कधी अन्नपूर्णा होते ,
कधी लक्ष्मी होऊन तीळ तीळ पैसे जमवते..🌹
शेवटी यमलाही परत फिरायला
भाग पडणारी बायकोच असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा