फॅन चालू आहेत दिसत नाही का बाप ओरडला..कायम बापाची किट किट असते कधी चप्पल पालथी पडली नीट कर तर कधी लाईट च विनाकारण चालु ठेवली लाईट बंद कर सारखी कटकट करतो हा बाप कधी एकदाच इंजिनिअरिंग पुर्ण होतय आणि या बापाला सोडून कायमचा जाईल.
मुलाला वैताग आला होता. इंजिनीअरिंग च शिक्षण पूर्ण करून एक ठिकाणी इंटरव्ह्यू साठी गेला. तिसऱ्या मजल्यावर इंटरव्ह्यू होता.
पहिल्या मजल्यावर झाडांच्या पालथ्या पडलेल्या कुंड्या त्याने नीट केल्या.
दुसर्या मजल्यावर विनाकारण चालु असलेले लाईट ट्युब बंद केले.
तिसऱ्या मजल्यावर खुप गर्दी पण सगळ्यांनी हॉलच्या बाहेर वाकड्या तिकड्या एकावर एक अस्ताव्यस्त चपला टाकलेल्या त्या त्याने नीट केल्या.
एकदा चांगल्या कामाची सवय झाली ना वाकडे तिकडे उलट पालट डोळ्यांना बघू वाटत नाही. जो आत इंटरव्ह्यू देऊन आला सगळे त्याला बोलावून विचारायचे. ये तुला काय विचारले सांग ना. पण याने कुणालाच काही विचारले नाही. शेवटचा नंबर त्याचा होता. जणू इंटरव्ह्यू घेणारे साहेब त्याचीच वाट पाहत होते.
तो आत गेला आणि पटकन साहेब उठले आणि त्याच्या हातात हात दिला.
आर यु सिलेक्ट अभिनंदन 🙏 🙏 🙏
हा म्हणतो सर पण मला तुम्ही काहीच विचारले नाही.साहेब म्हणाले विचारायची गरज नाही तुझ्या कृतीतूनच तुझी पात्रता कळाली.तुला ज्या बाबांनी घडवले त्यांना माझा सलाम.
आमच्या कंपनीसाठी आम्हाला नोकर नको तर कंपनी सांभाळणारा सुसंस्कारित मॅनेजर हवा आहे. सिलेक्शन लेटर घेतल घरी जाईपर्यंत मुलाच्या डोक्यात सारख घोळत होते आज मी बाबांची माफी मागणार. त्यांच्याविषयी माझ्या मनात खूप राग होता पण त्यांनी दिलेल्या संस्कारांची ही फलश्रुती आहे. परमेश्वराच्या कृपादृष्टीने चांगले घडत असते. देव दिसत नाही तो प्रत्येकाच्या शरिरात ठाण मांडून बसलेला आहे. मन सैरभैर पळते, वागते, चंचल आहे. स्थिरता नाही, घडीत येथे, घडीत तिथे अशीच अवस्था आहे.
मुलगा घरी जातो बाप अंगणात बैल पाणी पाजीत उभा होता. तितक्यात मुलगा धावतच आला आणि बापाच्या गळ्यात पडून रडू लागला. मुलाला रडताना पाहून बापाचा कंठ दाटून आला. रडतोस काय हे बघ जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुला काही कमी पडू देणार नाही. अरे एवढा मोठा धट्टा कट्टा गडी आणि असा इंटरव्ह्यू त नापास झाला म्हणून रडत आसतेत व्हयर पोरा.
ह्यो बाप आहे ना तुला. आजुन हजार इंटरव्ह्यू दे जोपर्यंत तुला काम मिळत नाही तोपर्यंत हा म्हतारा बाप थकत नाही.
बापाच हे बोलण ऐकून पोराला अजुनच रडू आलं आणि त्याने सिलेक्शन लेटर बापाच्या हातात दिले आणि पाया पडून आशिर्वाद घेतला.
कसला कागूद हाय र पोरा.
बाबा मी मॅनेजर झालो आणि तेही माझ शिक्षण नाही तर तुम्ही दिलेल्या संस्कारामुळे.
बापाने घरात तिजोरीत जपून ठेवलेले काही पैसे काढले. घाईघाईने पेडे आणून जमेल त्याला देत होता आणि डोळ्यात आसव आणून भुषणाने सांगत होता ल्योक मॅनेजर झाला बर.
🌸🦚 *🌸🦚 कथा हृदयाला भिडली तरच लाईक कमेंट्स शेअर करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा