मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

2472. ऑपरेशन थिएटर

 ऑपरेशन थिएटरच्या दारापर्यंत एखादी व्यक्ती जाते, तेव्हा तिच्या अंगावरील सर्व दागिने, मंगळसूत्र, अंगठ्या, बांगड्या एकेक करून काढून ठेवले जातात. त्या क्षणी जाणवतं की आपण आयुष्यभर जपलेली, नात्यांचं प्रतीक म्हणून मानलेली ही प्रत्येक वस्तू… प्रत्यक्षात आपल्या आरोग्याशी, आपल्या जीवनाशी काहीही जोडलेली नसते.
ज्या मंगळसूत्राला आपण वैवाहिक नात्याची ओळख मानतो...
ज्या बांगड्यांना आपण सौभाग्याचं चिन्ह समजतो....
ज्या अंगठ्या, माळा आपण कधी कधी अहंकारानेही मिरवतो...
त्या सगळ्या गोष्टी एका क्षणात बाजूला पडतात.
कारण त्या क्षणी डॉक्टरांना, औषधांना, प्रार्थनांना आणि आपल्या जीवाच्या धडपडीला जास्त महत्त्व असतं दागिन्यांना नाही.
त्या निर्वस्त्र क्षणी कळतं की माणूस महत्त्वाचा, वस्तू नव्हे.
आपल्या श्वासांवर ना सोन्याचा हक्क, ना चांदीची हमी, ना कोणत्याही जडजवाहीराचा आधार असतो.
तिथे फक्त एकच सत्य उरते “जगायचं असेल तर शरीर निरोगी हवं.”
म्हणूनच....
जीवनात नाती जपा, माणसांना जपा, स्वतःच्या आरोग्याला जपा.
दागिने कधीही मिळू शकतात, पण शरीर एकदाच मिळतं.
मंगळसूत्र नसले तरी लग्न टिकू शकतं...
पण श्वास नसेल तर कोणतंच नातं उरत नाही.
कधी कधी हा ऑपरेशन थिएटरमधला छोटासा ट्रे आपल्याला मोठा धडा देऊन जातो.
“दीर्घायुष्याचा, सुखाचा आणि प्रेमाचा पाया दागिन्यांत नाही तर आपल्या आरोग्यात आणि एकमेकांवरील काळजीत असतो.” ❤️🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...