मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

2477. शरिरात कोण बसलय ?

 देवाचा अंश जिव. आपण आपल्या गाडीत कोण मोठा व्यक्ती बसले. की ड्रायव्हरला उतरायला सांगुन आपण स्वतः गाडी चालवतो.
हो ना..! मग परमात्मा शरिरात वास करतो तर धिरे धिरे शरीर चालवल पाहीजे.
शरिराला आपाय होईल अस कांही करायला नकोय. जिवनात दुःख भरेल, अस कांही करायला नकोय. देव दुखावेल. अशी काळजी हवीय ना !
व्यसन केल तर ताबा सुटुन जाईल. अपघात होईल, हात पाय तुटेल, जिव कासाविस होईल, अस कांही व्हायला नकोय. देव अंश परमात्मा दुखावेल !
आत्म्याला दुखावण्याचा, पिडा देण्याचा कांहीही हक्क नाही.
समजल ना ! हे स्वतःला पोसणे नव्हे तर कांही दिवस तरी वास्तव्य देवाचे या देहात आहे. मग ते सुखी व्हावेत आपल्याला मी मी वाटते ते खरय मला माहीत नाही की मी भासमान आहे.
 देवच खरा आदी अंती आहे. मी मी भासमान आहे.
पाप कर्म करताना सुद्धा विचार करायला पाहिजे. आत्ता पाप करते वेळी गोड वाटते, पण भोग आत्म्याला भोगावे लागतात.
आत्मा परमात्मा आहे. त्याला चांगल्या अर्थाने सुखी ठेवले पाहिजे. पुण्य करत गेल आणि सरळ मार्गी चाललय तर नक्की आत्मा सुख पावेल. तो आनंद मलाच अनुभवायला मिळेल.
पण हे स्वतःचा ऐशोआराम पहाणे नाही. तर सुखी आत्मा या देहात रहावा ! म्हणून प्रयत्न शिल असल पाहिजे. देव माझ्या वृधयात विराजमान आहे, हे विसरुन चालत नाही. तो फक्त नामस्मरण सुरु केल तरी साऱ्या बाजुनी सरळ मार्गी जिवन चालत... परमार्थ साधतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...