गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

2440. सावधान : राष्ट्रीय महामार्ग ५२ (बीड ते तुळजापूर) प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा

      बीड ते तुळजापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी बीड पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाकडून अत्यंत महत्त्वाचे आवाहन करण्यात येत आहे. खालील धोकादायक ठिकाणी चोरी, लुटमार आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
​📍 धोकादायक ठिकाणे (Hotspots):
​या १० ठिकाणी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे:
१. मांजरसुंबा घाट (बीड)
२. चौसाळा बायपास
३. पारगाव बायपास
४. सरमकुंडी फाटा
५. इंदापूर फाटा
६. पार्डी फाटा
७. घुले माळ जवळील उड्डाणपूल
८. तेरखेडा ते येडशी टोल नाका
९. येडशी बायपास
१०. धाराशिव ते तुळजापूर
​⚠️ चोरट्यांची लुटमार करण्याची कार्यपद्धती (Modus Operandi):
​गुन्हेगार प्रामुख्याने खालील प्रकारे लुटमार करत असल्याचे निदर्शनास आले आहे:
​कृत्रिम अपघात :महामार्गावर धावत्या वाहनांसमोर अचानक जॅक (Jack) किंवा खिळे असलेले लाकडी ओंडके टाकून अपघात घडवणे व मदत करण्याच्या बहाण्याने लुटणे.
​शस्त्रांचा धाक: वाहन अडवून शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणे.
​दुचाकीस्वारांना लक्ष करणे: धावत्या दुचाकीला धक्का देणे किंवा मागे बसलेल्या प्रवाशाला ओढून खाली पाडणे. तसेच पाठलाग करून 'चैन स्नॅचिंग' करणे.
​कृत्रिम गतीरोधक तयार करुन 
ठिबक चे पाईप बंडल वापरून गतिरोधक असल्याचे भासवून वाहन थांबायला भाग पाडणे आणि त्यानंतर दबा धरून बसलेल्या साथीदारांमार्फत सामुदायिक हल्ला करणे.
​ईंधनचोरी: रात्रीच्या वेळी हॉटेल किंवा पेट्रोल पंपावर थांबलेल्या मालवाहतूक वाहनांच्या टाकीतून डिझेल चोरी करणे.
​दुभाजकाचा (Divider) वापर: दुभाजकामध्ये असलेल्या झाडा झुडपात लपून बसणे आणि वाहनावर हल्ला करणे.
​🛡️ नागरिकांसाठी सुरक्षिततेच्या सूचना (Advisory):
​१. थांबू नका: वर नमूद केलेल्या १० धोकादायक ठिकाणी आणि निर्मनुष्य रस्त्यावर गाडी थांबवणे टाळा.
२. समूहाने प्रवास करा: रात्रीच्या वेळी प्रवास करताना एकटे जाणे टाळा. शक्यतो अनेक वाहनांच्या समूहाने (Convoy) प्रवास करा.
३. दुभाजकापासून अंतर ठेवा: वाहन चालवताना दुभाजकाला (Divider) एकदम खेटून चालवू नका, कारण चोरटे झुडपात लपलेले असू शकतात.
४. संशयास्पद हालचाली: रस्त्यात लाकूड, दगड किंवा संशयास्पद वस्तू दिसल्यास गाडी थांबवू नका, वेगात पुढे निघून जा.
५. मदत कोठे मागाल?: काहीही संशयास्पद वाटल्यास त्वरित जवळचे हॉटेल, पेट्रोल पंप किंवा धाबा यासारख्या लोकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी आश्रय घ्या.
​👮 पोलीस मदत आणि संपर्क क्रमांक:
​पोलिस प्रशासनाने सुरक्षेसाठी गस्ती पथके (७ वाहने) तैनात केली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
​📞 डायल ११२ (Dial 112) - तात्काळ मदतीसाठी
​पोलीस निरीक्षक शंकर शिंदे (पो. ठाणे वाशी): 93551 00100
​सपोनि (API) गोसावी (पो. ठाणे नेकनूर): 90090 08070
​सपोनि (API) भालेराव (पो. ठाणे येरमाळा)
सपोनि बाळराजे दराडे (बीड ग्रामीण) 7720050100 
​टीप: हा संदेश जनहितार्थ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सुरक्षित प्रवास करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...