मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

2475. घर

 "हे काय पप्पा,तुम्ही सगळं घर घाण करून टाकले.आत्ताचं राधा ने फरशी पुसली होती आणि तुम्ही चपलांचे ठसे उमटवले. थोडं तरी समजायला पाहिजे तुम्हाला? तुम्ही काही लहान नाही."
सुनबाई रियाच्या तोंडून हे ऐकून अनिलजींना धक्का बसला.पोलीसच्या नोकरीत त्यांच्या एका आवाजाने अपराधी थरथर कापत असत आणि आज त्यांची सून त्यांच्याच घरात त्यांना इतके ऐकवत होती.
तेवढ्यात पत्नीने त्यांना सोफ्यावर बसवत म्हणाली "काही हरकत नाही,सुनेचे बोलणे काय मनावर घ्यायचे?फक्त तोंडाने फटकळ आहे,तसं तिच्या मनात काही नसतं."
अनिलजींनी पत्नी रमाकडे बघितले,जसे की विचारत होते की "खरंच?" आणि त्यांच्या ओठांवर हसु तरळले,पण डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
सोफ्यावर बसून ते विचार करत होते की किती प्रेमाने हे घर बांधले होते. एक एक वीट आपल्या मनाप्रमाणेने रचली होती या घराची जेणेकरून निवृत्ती नंतर पति पत्नी सर्व सोयी सुविधांनी युक्त घरात आरामात राहू. परंतु आज सर्व जग त्यांच्या खोलीपर्यंत मर्यादित झाले होते. खोलीतून बाहेर निघावे तर किती ऐकावे लागते त्यांना.
हॉल मध्ये शेकोटी पेटवण्यासाठी आवडीने भिंतीत चिमणी (फायर प्लेस) बसवली होती की थंडीच्या दिवसात तेथे शेकोटी पेटवून शेकत रमासह भाजलेल्या शेंगा खाऊ, पण काय हिम्मत की सुनबाई थंडीत शेकोटी पेटवू देईल. म्हणायची की 'सर्व घरात राखेचे कण पसरतील', मग ती चिमणी तशीच रंगवलेली दिसायची, एकदम नव्यासारखी, कारण सुनेला ती तशीचं आवडायची.
हा सर्व विचार करतचं होते की, हातात काॅफीचा मग घेऊन रमा त्यांच्याजवळ येऊन बसल्या. त्या आपल्या पतीला चांगले ओळखून होत्या. त्यांना चांगले माहित होते की ते आता रागात होते आणि त्यांच्या हातची काॅफी पिऊन त्यांचा राग शांत होऊन जाईल.
रमा पण काय करेल, पति आणि मुलगा सोमेशच्या प्रेमात अडकलेली एक भारतीय स्त्रीचं होती. दोन्ही बाजू सांभाळत दिवस काढत होती, कधी मुलांचे ऐकायच्या,कधी पतीचं.
एक दिवस सकाळी फिरुन आल्यावर पति पत्नी दोघे लॉन वर बसले होते. नोकर चहा ठेवून गेला, दोन ऐवजी चहाचे तीन कप बघून त्यांना थोडं वेगळं वाटलं. कारण त्यांच्याशिवाय फक्त सोमेश चहा पित असे आणि तो त्यांच्या सोबत कधी चहा पीत नसे. त्याने त्यांच्यासोबत बसणं कधीच सोडलं होतं, मग आज?
तेवढ्यात सोमेश तेथे येऊन बसला. सोबत चहा पिऊ लागला. पण एक अजब शांतता पसरली होती. हा तोच सोमेश आहे ज्याचे लहानपणी बोलणंच संपत नव्हतं. अनिलजी कितीही थकलेले असो, सोमेश सोबत खेळत असायचे. तो बोलून बोलून थकून झोपत नाही तोपर्यंत त्यांच्या गप्पाच संपत नसत. आज अजब औपचारिकता बाप-मुलामध्ये बनून राहिली होती.
तेव्हा रमा शांती भंग करीत म्हणाल्या, "सोमेश, पुढच्या महिन्यातच रियाच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे ना?"
"हो आई, त्याविषयीचं बोलायला आलो आहे. मुलाकडचे याच शहरातील आहेत व त्यांना लग्न याच शहरात करायचं आहे. म्हणून रियाच्या परिवाराला लग्नासाठी हे घर हवं आहे. आपले घर लग्नघर म्हणून पाहिजे आहे. म्हणून मला वाटतं, जोपर्यंत घरात गर्दी राहिल तोपर्यंत तुम्ही दोघं दीदी कडे जाऊन रहावं. तुम्हा दोघांना ही गर्दीमुळे त्रास होईल आणि दिदी पण याच शहरात आहे म्हणून तुम्हाला काही त्रासही होणार नाही. तुमची दोघांची खोलीही त्यांना कामात येईल.
हे ऐकून अनिलजी रागाने लाल झाले. तरीही आपला आवाज नाॅर्मल ठेवत म्हणाले,
"तिच्या घरच्यांना भाड्याने दुसरे घर घेऊन दे, दहा पंधरा दिवसांसाठी.आम्ही कशाला दुसऱ्या ठिकाणी जाऊ?"
"पप्पा, तुम्ही पण ना गजब करता, रियाच्या घरचे लोकं आहेत. आपलं इतकं मोठं घर असून त्यांच्यासाठी दुसरे घर बघायचे ! रियाने तर त्यांना सांगूनही दिले आहे. आता तुम्ही तुमचे पाहून घ्या, ते येथेचं येतील." असे बोलून सोमेश उठून आत निघून गेला. आतून सून रियाचा ही आवाज येऊ लागला. बहुतेक तिने सर्व ऐकले होते आणि तिला अनिलजींचं बोलणं आवडलं नसावं.
आज रमा डोळ्यांतून अश्रू ढाळत होत्या. अनिलजींनी आपला खांदा पुढे केला, जसे म्हणत होते की "अजून मी आहे, शसर्व ठीक करून देईन."
दूसऱ्या दिवशी सायंकाळी अनिलजी फिरून आले तेव्हा रमाने सांगितले की, सोमेश, रीया आणि मुलांसह सुट्टी आहे म्हणून सासरी गेला आहे.
अनिलजी हसले व म्हणाले, "बघ वेडी, हीचं मुलं आहेत ज्यांच्यासाठी तू माझ्याशी भांडत होतीस, ज्यांच्यासाठी कित्येक रात्री आपण जागून काढल्या होत्या, आज ते आपल्यालाचन आपल्या घरातून जायला सांगत आहेत. काही हरकत नाही,मी पण त्याचा बाप आहे." म्हणून आत निघून गेले. 
      एक आठवड्यानंतर सोमेश कुटुंबासह परत आला तर दरवाजाला कुलुप लावलेले होते. चौकीदार त्यांना बघून जवळ आला व एक चावी व चिठ्ठी सोमेशच्या हातात दिली. चिठ्ठी उघडून वाचू लागला, ती चिठ्ठी अनिलजींनी सोमेशच्या नावे लिहिली होती.
सोमेश,
मी आणि तुझी आई रामेश्वरमला जात आहे. एक महिन्यांनी परत येऊ. ही तुझ्या हातातली चावी या घराची नाही. ती दुसऱ्या फ्लॅटची आहे ज्यात तुम्हा सर्वांचे सामान ठेवलं आहे. तो फ्लॅट मी खुप पुर्वी विकत घेतला होता, तुला सांगीतले नव्हते. अगदी माॅडर्न भागात आहे. तुमच्यासाठी चांगला आहे. आवडला नाही तर आपल्या सोयीने दुसरा घेऊन घ्या. हे घर माझं आणि तुझ्या आईचं आहे आणि आमचंच राहिल. यातून आम्हाला कुणीचं काढू शकणार नाही. आतापर्यंत सर्व काही सहन करत होतो कारण तुझी आई खुश रहावी. परंतु तुझ्या बोलण्यामुळे तिच्या डोळ्यांत पाणी आलेले मी सहन करणार नाही. हे आमचे स्वप्नातील घर आहे ज्यात आम्हाला मुलं, नातवंडांसह रहायची इच्छा होती, पण देवाला हे मंजूर नव्हते आणि तुम्हाला आमचा सहवास आवडत नव्हता. ते घर मी आणि आईकडून आशिर्वाद म्हणून दिलं आहे. इच्छा असेल तर ठेवा नाही तर परत करा, आई-वडिल या नात्याने आम्ही आपला आत्मसम्मान सोडू नाही शकत.
आमच्या नंतर हे घर ट्रस्टला दिलं जाईल, जे येथे वृद्धाश्रम बनवेल.‌ या घरावर तुमचा किंवा तुझ्या बहिणीचा काहीही अधिकार रहाणार नाही, मी हे सर्व तुझ्या बहिणीला ही सांगितले आहे आणि ती माझ्या या निर्णयावर खुश आहे, आशा आहे तु ही असशील. तुम्ही सर्व आनंदी रहा. तुझा पप्पा.'
वाचून होताच सोमेशला धक्का बसला. डोळ्यात अश्रू होते, परंतु हे माहीत नाही की ते पश्चातापाचे होते की इतकं मोठं घर सोडावे लागेल म्हणून, की वडिलांची संपत्ती मुलांचीच असते हा विश्र्वास तुटल्यामुळे होते ते माहीत नाही.
      
 जे प्राप्त आहे- ते पर्याप्त आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...