कामावरुन दमून भागून आलेल्या अजितेमच्या चेहर्यावर, आज एक वेगळीच चमक होती. ईतर दिवशी अनुयाने दार ऊघडायचीच खोटी, की स्वतःचा शंभर कीलोचा देह सोफ्यावर लोटून देणारा तो. आज मात्र शिस्तीत येऊन बसला. मुलाकडून पाण्याचा ग्लास आला. मुलीने चहाचा कप दीला. आल्या आल्या ह्या दोन गोष्टींसाठीच तोंड ऊघडणार्या अजितेमने, आज चक्क मुलांची चौकशी केली. आपल्या पुरणपोळ्यांच्या खमंग, खरपूस सुटलेल्या दर्वळाचा हा परिणाम असावा, असं ऊगिचच वाटून गेलं अनुयाला. "अगं ए...ऐकलस का?" अजितेमला आल्या आल्या मी आठवले, म्हणजे कमालच झाली म्हणायची. असा मनातल्या मनात विचार करतच, अनुया स्वैपाकखोलीतून बाहेर आली.
"बोला... ऐकतीये".
"ऊद्या आम्हा मित्रा मित्रांचं मढ ला जायचं ठरतय. एकाचा बंगला आहे तीथे. रंगपंचमी खेळणार आहोत आम्ही तीथेच."
"अहो पण दर रंगपंचमीला आपण तुमच्या आई - बाबांकडे जातो ना?. ते वाट पहातील".
"तू जा की मुलांना घेऊन. मी करेन आईला फोन. सात वाजता निघायचय. लवकर जेवायला वाढ म्हणजे आवरुन वेळेवर निजता येईल. मी फ्रेश होतो तोवर."
"अहो पण... आपण सगळे एकत्र खेळतोना..."
अजितेम न ऐकताच निघून गेला होता आतमध्ये आवरायला. दुसर्या दिवशी दिवसभर खेळून दमलेल्या, बर्यापैकी 'high spirit' मध्ये असणार्या अजितेमने फोन घेतला हातात..."पंधरा मिस्ड काॅल्स, nonsense. मी नक्की कुठेय, कोणाबरोबर आहे. हे तपासायलाच फोन करत असणार ही. जाऊ दे, लागू दे जरा जिवाला घरघर तीच्या. पन्नाशीला आलो तरी अजुनही insecurity काही जात नाही हीची. useless... आता तर करणारच नाही फोन जा. घरी येईन तेव्हाच बोलू." अजितेम खवळला होता. घरी पोहोचेपर्यंत त्याला रात्रीचे नऊ वाजून गेले होते.
"What the hell is this?. दाराला कुलूप?? हे अजुनही आले नाहित??? ईथे भुकेने जिव चाल्लाय." अजितेमने तिरमिरीतच अनुयाला फोन केला. तीचा फोन नाॅट रिचेबल लागला. चरफडतच त्याने लेकीला, ओवीला फोन लावला. तीचा फोन बंद होता. "What the xxxx is this happening? कुठे मेलेत हे सगळे??" त्याने आईला फोन लावला. "तू केलेल्या पापाची फळं भोगतीये लेक तुझी" हे कसंबसं बोलून आई हमसाहमशी रडायला लागली. "अगं तू काय बोलतियेस? काय झालय?? तुम्ही आहात कुठे सगळे???" बाबांनी फोन घेतला. अतिशय गंभिरपणे ते बोलले. "सिटी हाॅस्पिटलला ये तातडीने" नी फोन कट केला त्यांनी. अजितेम आता मात्र पार हादरला. तसाच गाडी काढून तो हाॅस्पिटलला पोहोचला.
त्याला घरचे सगळे स्पेशल रुमच्या बाहेरच बसलेले दिसले, दोन - चार पोलिसही होते आजुबाजूला. ओवी मात्र कुठेच दिसत नव्हती. तो धावतच घरच्यांकडे गेला. सगळेच ढसाढसा रडत होते. अजितेम विचारत होता, पण कोणिही काही सांगायच्या मनःस्थितीत नव्हतं. तो बाबांकडे गेला. त्यांना गदागदा हलवलं त्याने. बाबा शांतपणे बोलले. "ओवी is molested, अजितेम... its a gang rape... चार जणांनी मिळून तिच्यावर. तीला आता आत घेऊन गेलेत. सगळ्या टेस्ट्स चालू आहेत तीच्या." ईतकावेळ राखून ठेवलेला संयम सुटला, नी बाबाही ओक्साबोक्शी रडू लागले. अजितेम सुन्न होऊन मट्टकरुन बाकावर बसला.
"डाॅक्टर मॅडम बोलावतायत तुम्हाला आत" वाॅर्डबाॅयने आणलेल्या निरोपावर, अजितेम यंत्रवत ऊठला. चालू लागला. केबिनवर पाटी होती डाॅ. ईरावती चाफेकर. हे नाव कुठेतरी ऐकलय...कुठे बरं? ह्या विचारांतच त्याने दार ऊघडलं. आणि समोरच टेबलाला टेकून, हाताची घडी घालून ऊभ्या असलेल्या डाॅ. ईरावतीना पाहून अजितेम चांगलाच गार पडला. तीस वर्षांपुर्वीची कोर्टकेस आठवली त्याला. व्हिक्टिम - अठरा वर्षांची एक मुलगी. अॅक्युज्ड - विशीतली तीन मुलं. चार्ज - सामुहिक बलात्कार. फाईनल व्हर्डिक्ट - नाॅट गिल्टी. अजितेमच्या घशाला कोरड पडली. त्या एअर कन्डिशन्ड केबिनमध्येही त्याला दरदरुन घाम फुटला. डाॅ. ईरावतींनी पाण्याचा ग्लास दीला अजितेमला, नी त्यांनी बोलायला सुरवात केली.
"Your daughter is very much critical Mr. Ajitem. पिढी बदलली ना, आणिक रानटी झाली. खर्या लांडग्यांसमोर सोडली असती, तर कमी लचके तोडले गेले असते तीचे. पण हे पांढरे कपडे घालून फिरणारे लांडगे जास्त भयानक. तीस वर्षांपुर्वीही होते. कांकणभर सौम्य बस्स. बाकी शेळी समोर आल्यावर, ते तुटून पडणं अगदी तस्सच. I asked ur daughter what you want to do now... you know what she said... माझा बाबा त्यांना सोडणार नाही असं म्हणाली. तीचा बाबा, 'अजितेम साने' a main accused in the rape case held in 1988. 'ईरावती चाफेकर' नावाच्या अठरा वर्षांच्या मुलिवर केलेल्या, सामुहिक बलात्कारातील प्रमुख संशयीत. खरंतर प्रमुख आरोपी आणि तो म्हणे सोडणार नाही ह्या बलात्कार्यांना... what a big joke... पण मी नाही बोलले तीला काही. मी नाही तोडला एका मुलिचा, तीच्या बाबावर असलेला ठाम विश्वास. काहिच चूक नव्हती तीची, जशी माझी नव्हती तीस वर्षांपुर्वी. ओळख नसलेलीही मुलगी 'जरा जास्त झाली होती' या सबबीखाली, स्वतःची मालमत्ता समजणारी मुलं. प्रत्येक पिढीत जन्माला येणार. पण त्यापैकीच कोणाच्या घरी. ईतिहासाची अशी पुनरावृत्तीही होऊ शकते, हे निदान लक्षात ठेवलं अशा नराधमांनी तरी खूप आहे. तुम्ही जा नी भेटा तुमच्या मुलिला. धीर द्या तीला, आत्मविश्वास द्या, खंबिरपणे ऊभे रहा पाठिशी तीच्या. your daughter is looking for a real man inside you... so be a man... तीस वर्षांपुर्वी दाखवलात तो भ्याडपणा होता. आता आपल्या लेकिला भक्कम आधार देऊन, पुरुषार्थही दाखवा. मी कोणालाही काहिही सांगणार नाही आणि हो... I seriously dont want the history to get repeated, in court's verdict also... 'not guilty due to unavailability of sufficient evidences'... my foot... फासावर लटकवा त्यांना. एक बाप तीस वर्षांपुर्वी हरला होता, खचला होता. पण तुम्ही तुमच्या काळजाच्या तुकड्याला न्याय मिळवून द्या. कारण जगात कोणालाही हक्क नाहिये, त्याला साधं बोट ही लावायचा. त्याच्या मर्जीशिवाय. माझे बाबा लढून हरले. त्यामुळे माझ्यासाठी ते कायमच हिरो राहिले. तुम्ही अगोदरच हरलेले आहात, पडलेले आहात तुमच्या स्वतःच्याच नजरेतून. पण आता लढा. तुमच्या लेकीसाठी, अन् तुमच्यासाठीही. कारण कुठल्याही मुलीसाठी तिचा बाबा हाच निरंतर नायक असतो. बाकी येतात नी जातात. या आता तुम्ही. पुढे कधी भेट झालिच तर माझ्या डोळ्यांत बघून बोलू शकाल, असं काहीतरी करा".
अजितेम हात जोडून घळाघळा रडत ऊभा होता, तीस वर्षांपुर्वीच्या रंगपंचमीची बसलेली 'झळ' सोसत... आणि डाॅ. ईरावतींना 'पाठ' नी ओवीला 'तोंड' दाखवायचा धीर एकवटत.
- सचिन श देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा