आजकाल आपण सगळीकडे एकच सूर ऐकतो -
“खूप काम आहे. कामाचा भयानक ताण आहे. वेळच मिळत नाहाये.”
ऑफिस, घर, नाती, समाजकार्य – सगळीकडचं हेच चित्र.
दिवस संपतो तो दमून–भागून, कधी चिडचिडीत, कधी पूर्ण कोरड्या मनाने.
शरीर थकणं स्वाभाविक आहे; पण मन सतत ताण, ओझं, अस्वस्थता याच्या भोवऱ्यात अडकलेलं असतं.
थोडा थांबून स्वतःला शांतपणे एक प्रश्न विचारून पाहा –
खरंच “ताण” वाढलाय का,
की आपण “कार्यक्षमता” वाढवण्याऐवजी
फक्त कामांची यादीच वाढवत गेलो आहोत?
आपण सुट्या वाढवतो, मोबाईल–लॅपटॉप upgrade करतो,
फॅसिलिटीज वाढवतो, entertainment वाढवतो;
पण मुख्य गोष्ट वाढवत नाही. ती म्हणजे आपली स्वतःची अंतर्गत क्षमता, स्थिरता आणि शांतपणे काम हाताळण्याची ताकद.
याठिकाणीच हा प्रश्न जन्माला येतो-
ताण वाढवायचा की कार्यक्षमता?
ॲक्टिविटी वाढवायची की स्वतःला आतून उन्नत आणि सशक्त करायचं?
Stress Management की Capacity Building
आजकाल stress management च्या नावाखाली कितीतरी कोर्सेस, सेमिनार, workshops, व्याख्याने आयोजित केली जातात.
Corporate training असो किंवा personal growth –
सर्वत्र घोषवाक्य असतं :
“Learn How to Manage Your Stress”
इथे एक साधा पण डोळे उघडणारा प्रश्न आहे –
“स्ट्रेस ही काही Manage करण्याची गोष्ट आहे का?
स्ट्रेस ही काही तुमची मालमत्ता आहे की valuable asset,
की जिचं व्यवस्थापन केलं पाहिजे?”
ताण म्हणजे कुठेतरी बाहेर ठेवलेली गोष्ट नाही.
तो तुमच्या system मध्ये निर्माण झालेला एक संकेत आहे.
“जर एखाद्या गोष्टीमुळे, एखाद्या कामामुळे तुमच्यात ताण निर्माण होत असेल,
तर याचा सरळ अर्थ असा की त्या कामासाठी आजच्या क्षणी
तुमची आतली क्षमता अपुरी आहे. त्या कामासाठी तुम्ही अजून सक्षम झालेले नाही आहात”
पहिल्यांदा हे ऐकल्यावर वाक्य थोडं कठोर वाटू शकतं.
पण खरं तर ते फार प्रामाणिक आणि मुक्त करणारे आहे.
कारण मग प्रश्न असा राहत नाही –
हा stress मी कसा manage करू?
खरा प्रश्न होतो –
मी स्वतःला कसं उन्नत आणि सशक्त करू,
जेणेकरून हेच काम मला ताण न येता सहजतेने करता येईल?
फोकस बाहेरून आत येतो.
जग बदलण्यापेक्षा मी किती बदलू शकतो,
हा विचार सुरू होतो.
काम, ताण आणि कौशल्य
आपण सगळे म्हणतो – “काम योग्य तऱ्हेने, ताण न घेता करायचं आहे.”
पण असं हे फक्त positive thought ने होत नाही.
जर त्या कामात आपल्याला पुरेसं कौशल्य नसेल,
तर ताण येणं अगदी स्वाभाविक आहे.
खरं तर,
काम सहज, आनंदाने, ताणाशिवाय करायचं असेल,
तर त्या कामातलं कौशल्य प्राप्त केलंच पाहिजे.
कौशल्य म्हणजे फक्त “काय करायचं” हे माहीत असणं नाही; तर “कसं करायचं” हे शरीर, मन, हात आणि awareness यांच्या प्रत्येक कणात उतरून बसणं.
एक सुंदर वाक्य आहे –
Art cannot be taught, it has to be caught
कला, कौशल्य, नेमकेपणा –
हे पूर्ण अर्थानं कोणी शिकवू शकत नाही.
कोणी आपल्याला steps सांगू शकतं,
rules–techniques समजावू शकतं,
मार्गदर्शन करू शकतं.
पण त्या कामातला
निग्रह, नेमकेपणा, सहजता,
कामाशी जमलेलं आतलं मैत्रीचं नातं –
हे आपल्यालाच आतून पकडून घ्यावं लागतं.
म्हणजेच – ते caught करावं लागतं.आणि त्यासाठी सद्गुरू म्हणतात तसं-
काम करा हो, काम करा,
कामावरती प्रेम करा
आपण करत असलेल्या कामावरती प्रेम असल्याशिवाय कामातलं कौशल्य अवगत करणे शक्यच नाही.
आपण बघतो –
एखादा कारागीर, शल्यचिकित्सक, driver, कलाकार, किंवा उत्तम शिक्षक ,
काम करताना जणू effortless दिसतो.
आपल्याला वाटतं –
“इतकं सोपं आहे तर आपणही केलं असतं!”
पण त्या “सोप्या” असण्या मागे वर्षानुवर्षांची सरावाची शिदोरी, तपश्चर्या असते.
कौशल्याचं शांत आत्मसात करणं, आणि आतून उन्नत–सशक्त झालेली क्षमता असते.
तिथेच ताण कमी होतो
आणि flow सुरू होतो.
योगः कर्मसु कौशलम्– योग म्हणजे फक्त आसनं नव्हेत
गीतेतील प्रसिद्ध वाक्य आहे –
“योगः कर्मसु कौशलम्।”
याचा एक थेट, जगायला उपयोगी अर्थ असा –
“कामातलं कौशल्य म्हणजेच योग.”
योग म्हणजे फक्त आसनं, प्राणायाम, डोळे मिटून ध्यान करणं नाही.
योग म्हणजे –
मी जे काम करतो, ते
जागृतीने, नेमकेपणाने,
अंतर्मन शांत ठेवून,
कौशल्याने व प्रेमाने करणं.
जेव्हा कौशल्य नसतं,
तेव्हा काम आणि मी –
या दोघांत सतत संघर्ष असतो.
जेव्हा कौशल्य येऊ लागतं,
तेव्हा काम आणि मी –
यांच्यात मैत्र निर्माण होते.
आणि जेव्हा कौशल्य परिपक्व होतं, तेव्हा काम ही साधना बनते-
तिथे योग घडतो.
Enhance yourself म्हणजे नक्की काय?
आता “enhance yourself” या विचाराकडे परत पाहू.
आपल्या संदर्भात enhance म्हणजे –
स्वतःला आतून उन्नत आणि सशक्त करणं.
उन्नत – म्हणजे जाणीवेचा, समजुतीचा, जगण्याचा स्तर उंचावणं.
सशक्त – म्हणजे आतून मजबूत, स्थिर, समर्थ होणं.
हे फक्त शरीर मजबूत करणं नाही –
जरी शरीरसामर्थ्य महत्त्वाचंच आहे.
हे केवळ degrees, certificates, माहिती वाढवणंही नाही –
जरी ज्ञानही आवश्यकच आहे.
मी जी “जिवंतता” आहे, जे “life” आहे, तिला अधिक जागृत, प्रसन्न, शांत आणि सक्षम बनवणं – हा या enhance चा गाभा आहे.
* शरीर अधिक लवचीक
आणि जागरूक.
* श्वास खोल आणि शांत
* मन कमी तुटक आणि
जास्त एकाग्र
* भावना कमी अस्थिर
आणि जास्त सौम्य
* आतली जाणीव हळूहळू
अधिक स्पष्ट
हे सगळं मिळूनच –
स्वतःला उन्नत आणि सशक्त करणं.
सायकल, गाडी आणि “child’s play”
सायकल शिकायचा काळ आठवा.
पहिल्यांदा सायकल चालवताना –
बॅलन्स, ब्रेक, पायडल, रस्ता, लोक –
सगळ्याचं ताणात रूपांतर होतं.
“पडू की काय?” – ही एकच धडकी.
आणि
आज bike किंवा car चालवताना
ट्रॅफिक जास्त, वेग जास्त,
नियम जास्त; कामंही जास्त.
पण प्रत्येक क्षणी तुम्हाला “ताण… ताण…” असं वाटतं का?
बहुतेक वेळा नाही.
रस्ता तोच, जग तेच.
फरक इतकाच –
तुम्ही आतून उन्नत आणि सशक्त झालात.
कौशल्य आत उतरलं,
आत्मविश्वास स्थिर झाला,
awareness वाढला –
आणि driving हे काम
ताणातून flow मध्ये गेलं.
यालाच म्हणतात –
If you enhance yourself sufficiently,
whatever activity that comes your way
will be just a child’s play.
काम बदललं नाही,
“मी” बदललो.
माझी कार्यक्षमता वाढली.
योगिक दृष्टी: activity कमी नाही, क्षमता जास्त
ताण कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे –
काम कमी करणं.
काही वेळा ते आवश्यकही असतं –
“नाही” म्हणणं, प्राधान्य ठरवणं,
अनावश्यक ओझं बाजूला करणं –
हे सगळंही शहाणपणाचाच भाग आहे.
पण दीर्घकाळ टिकणारा मार्ग असा –
कामाच्या मानानं स्वतःला उंच नेणं, कौशल्य “catch” करणं, जाणीव वाढवणं,
स्वतःला उन्नत आणि सशक्त करत राहणं.
योगशास्त्र यासाठीच इतकी practical साधनं देतं –
* शरीर सुदृढ आणि
लवचीक ठेवण्यासाठी
आसनं
* श्वास स्थिर आणि शांत
ठेवण्यासाठी प्राणायाम
* मन स्वच्छ आणि स्थिर
करण्यासाठी ध्यान,
प्रार्थना आणि शुभचिंतन
* आणि व्यवहारात –
प्रत्येक कृतीत थोडी
जास्त जागृती, समतोल,
प्रेमळता येण्यासाठी भलं
कर ची साधना आणि
कृतज्ञता.
ही “extra कामं” नाहीत;
ही काम करणारा मी कोण आहे ?
हा centre हळूहळू बदलण्याची प्रक्रिया आहे.
रोजच्या छोट्या निवडीतील मोठं उत्तर
आता प्रश्न परत तोच –
ताण वाढवायचा की कार्यक्षमता?
याचं उत्तर मोठ्या भाषणांत नसून
आपल्या रोजच्या छोट्या निवडीत आहे.
* सकाळी उठल्यावर पहिलं
काम मोबाईल हातात
घेऊन इतरांचं जग
बघायचं, की दोन मिनिटं
स्वतःच्या श्वासाकडे,
शरीराकडे, मनाच्या
स्थितीकडे बघायचं?
* रिकामी दोन मिनिटं
मिळाली की लगेच
स्क्रीन उघडायचा, की
थोडंसं शांत बसून
स्वतःला जाणून घ्यायचं?
शुभचिंतन करायचं.
* कामाचा ताण जाणवला
की फक्त तक्रार करणं,
ब्लेम करणं, की शांतपणे
बघणं- कृतज्ञता मानणं
इथे मी कोणतं कौशल्य
आणखी deepen- प्राप्त
करू शकतो?”
ताण वाढवणं किंवा कार्यक्षमता वाढवणं-
हा निवडीचा क्षण इथे आहे.
शेवटचा साधा, पण टोकदार प्रश्न
ताण ही काही जपून ठेवण्यासारखी मालमत्ता नाही,
की ज्याचं “management” करावंच लागेल.
ताण हा फक्त संकेत आहे –
“इथे अजून थोडं उन्नत आणि सशक्त होण्याची संधी आहे.”
काम कमी करून प्रश्न तात्पुरता थांबवता येतो;
पण स्वतःची क्षमता वाढवली,
कौशल्य “caught” केलं,
जाणीव वाढवली –
तर प्रश्न मुळातून बदलतो.
मग “Stress management” पेक्षा
एक वेगळं सूचक वाक्य आपल्याला मार्ग दाखवतं –
Don’t manage stress.
Enhance yourself.
And
Enjoy Your STRESS
आणि शेवटी स्वतःलाच हलक्या,
पण प्रामाणिक स्वरात विचारायचं –
आजपासून मी काय वाढवणार?
ताण…
की स्वतःची उन्नत आणि सशक्त कार्यक्षमता?
How to Enjoy Stress, एक ताणमुक्त चिंतन-

जयंत जोशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा