मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

2484. खऱ्या अर्थानं जीवन जगणं

 दुःख-त्रास, वेदना लपवून
बायकापोरांसमोर हसत
जगता आलं पाहिजे…

कपभर चहा घेताना
सार्‍या दुनियेचं टेन्शन विसरून,
क्षणभर हसत-हसत
जगता आलं पाहिजे…

बाप म्हणून…
डोळ्यातलं पाणी गिळत
मनातल्या वेदना जपून 
ठेवाव्या लागतात.

घराला धीर देण्यासाठी
स्वतःची घालमेल शांत करावी लागते.
खांद्यावर कर्जाची, 
आयुष्याची ओझी असली
तरी चेहऱ्यावर हसू ठेवावं लागतं.

कारण बापाच्या दुःखाने
घराचं आभाळच ढगाळतं.
मातीवरच्या या ताटातल्या चहातही
त्याचं जगण्याचं तत्त्व दडलंय

“जगणं कितीही कठीण असू दे.
हसून जगायचं,
कारण माझ्यावर 
कोणीतरी अवलंबून आहे”

तुटूनही न तुटता
दररोज स्वतःला उभं करणारा
तो बाप...
थकलेलं शरीर, कष्टाची काळी रेघ,
आणि तरीही मनापासून येणारं हे हसू
यालाच तर म्हणतात
खऱ्या अर्थानं जीवन जगणं.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...