कारण अहंकार जिथे असतो ना, तिथे नातं हळूहळू श्वास गुदमरून मरतं. दोन मनांच्या मधोमध उभी राहणारी ही अदृश्य भिंत हळूहळू एवढी जाड होते की, आवाजही आत जात नाही आणि भावना बाहेर येत नाहीत. प्रेमाचं सौंदर्यच त्यातलं “मी” आणि “तु” विसरून “आपण” घडवण्यात आहे.
प्रेमात कुणी मोठं नसतं, कुणी लहान नसतं...
तिथे फक्त दोन माणसं असतात- एकमेकांना धरून ठेवण्याची तयारी असलेली. कारण प्रेमाचं खरं वजन “अहंकाराने” नाही तर आधाराने टिकतं. आधार म्हणजे फक्त साथ देणं नाही… तर व्यक्ती तुटत असताना तिला धरून ठेवणं, राग आला तरी सोडू न देणं, गैरसमज झाला तरी नातं तुटू न देणं, आणि काळ बदलला तरी हात न सोडणं.
आधार हा शब्द छोटा आहे... पण आयुष्य उभं करायची ताकद त्यात आहे.
प्रेमात आधार मिळणं म्हणजे आपल्या मागे कुणीतरी भक्कम उभं आहे याचा विश्वास. परिस्थिती चुकीची जरी असली तरी “तू आहेस ना माझ्यासोबत” हे एक वाक्य व्यक्तीला पुन्हा जिवंत करतं.
प्रेम ही भावना आहे... अहंकार हा अडसर.
ज्यांना प्रेम जपायचं असतं ते कधी “कोण जिंकलं?” हा प्रश्न विचारत नाहीत.
ते फक्त एवढंच पाहतात -
“आपलं नातं टिकलं का?”
कारण जिंकण्यात समाधान मिळतं, पण आधार देण्यात मनं जिंकली जातात.
आणि म्हणूनच...
प्रेमाचा एकच नियम आहे -
अहंकार नाही...आधार मात्र आयुष्यभर असावा ! ❤️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा