सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

2465. उद्योग व्यवस्थापनाचे महत्त्वाचे 10 नियम !

 उद्योग सुरू करणे आणि सुरू केल्यानंतर उद्योगाचे व्यवस्थापन करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक मॅनेजर उद्योजक नसला तरी प्रत्येक उद्योजकाला एक चांगला मॅनेजर बनणे आवश्यक असते. काही महत्त्वाचे नियम प्रत्येक उद्योजकाने स्वतःला लावून घेतले पाहिजेत.आज या लेखामध्ये उद्योग व्यवस्थापनाचे महत्त्वाचे 10 नियम मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या व्यवसायाच्या प्रत्येक पायरीवर हे नियम नक्कीच दिशादर्शक ठरतील.
१. व्यवसायामध्ये कोणी मित्र नसतो, त्यात फक्त आपापल्या सोयी प्रमाणे नाती असतात.
२. स्पर्धा नेहमी आपल्या उत्पादनाच्या गुणवत्तेनुसार करा,कधीही किमतीवर स्पर्धा करू नका. भविष्यात कधीतरी कोणीतरी तुमच्यापेक्षा कमी किमतीवर विकणारा स्पर्धक येईल त्यामुळे किमतीवर केलेली स्पर्धा कधीही न संपणारी असते.
३. ग्राहकाच्या गरजा, ग्राहकाचा आदर,स्वाभिमान आणि नफा हे प्रत्येक व्यवहाराचे मूलभूत आधारस्तंभ आहेत.
४. कोणत्याही व्यवसायातून अपेक्षा /आकांक्षा ठेवण्या आधी वेळ द्या आणि एखाद्या लहान मुलाप्रमाणे प्रमाणे तो जोपासा. बाळ वाढवताना भविष्यामध्ये फायदा किंवा तोटा होईल याचा विचार केला जात नाही अगदी तसाच विचार व्यवसाय वाढवताना किमान ३ वर्षे केला पाहिजे.
५. नोकरी जाण्यापेक्षा बिझनेस अकाली बंद पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे बिझनेस करत असताना पुढील 1 ते 2 वर्षे पुरेल इतकी सेविंग अवश्य जवळ बाळगा.
६. काहिही बदल न करता जे चालू आहे ते तसेच चालू ठेवणे या मानसिकतेला उद्योग क्षेत्रामध्ये जागा नसते. सतत स्वतःहून बदल करत राहणे किंवा आलेल्या बदलाला स्वतःहून स्वीकारणे अत्यंत महत्वाचे आहे.
७. आपल्या कल्पना आणि योजना बद्दल इतरांना कन्व्हिन्स करण्यापेक्षा तुमचे सर्वोत्तम प्रदर्शन करून शांतपणे उत्तराची वाट बघा.
८. उद्योगाच्या आकारमानापेक्षा (turnover) नफा मिळवणे हे प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे. काही लघुउद्योग सुद्धा अवाढव्य कारखान्यापेक्षा मोठा नफा मिळवून देऊ शकतात. आधी खूप जास्त गुंतवणूक आणि नंतर उशिराने नफा असे गणित असलेल्या व्यवसायामध्ये जाण्याचे टाळा.
९. उद्योजकाला सगळ्या गोष्टींचे थोडे थोडे ज्ञान असलेच पाहिजे मग ते तांत्रिक निर्मिती, अर्थव्यवहार असो वा मार्केटींग किंवा एच. आर असो. हे माझे क्षेत्र नाही किंवा मला हे जमत नाही असे म्हणण्याचा उद्योजकाला अधिकारच नसतो.
१०. तुमच्याकडे पुढील महिन्याचा किंवा येणाऱ्या वर्षाचा प्लान ऑफ ऍक्शन तयार करून उद्योगाला सगळ्या अडचणींना सामोरे जाऊन खूप दूरवर न्यायची दुरदृष्टी हवी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...