गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

2439. लोक काय म्हणतील ?

 आमच्या वेळी नव्हते बाई असे, तुमचे आपले बरयं, सरळ सरळ नवऱ्याला आॉर्डरी सोडता, सुचना देता, नवरे पण काय ताटाखालचे मांजर हो!" 
 रेखाताई तावातावाने सुनेशी म्हणजेच आर्याशी बोलत होत्या.
   निमित्त काय होतं तर, आज आदीत्यने सकाळचा नाश्ता व चहा केला कारण आर्याला आॉफीसचे महत्वाचे काम असल्याने तिला वेळ नव्हता. 
   हे रेखाताईंच्या मनाला पटले नव्हते न पटण्याचे कारण म्हणजे.गावाकडची मंडळी आलेली त्यांच्या समोर अदित्यने स्वयंपाकघरात केलेली लुडबुड रेखाताईंना  पटली नव्हती.
 कारण या विषयावर गावाला खुप चर्चा होणार हे गावाकडचे लोक एकमेकांना सांगून हा विषय तिखटमीठ लावून सांगणार. याची रेखाताईंना भीती वाटत होती. 
   हे आदित्यच्या लक्षात आले होते म्हणून तो आईला लगेच म्हणाला,"अग आई आज सकाळीच आर्याची मिटींग होती. तिला अटेंड करणे भाग होते.काय होतं मी केले तर एरवी करतेच कि ती सगळे." 
हे सुध्दा तो आईला  समजावणीच्या सुरातच म्हणाला. आई हे सगळे करण्यात मला कमीपणा वाटत नाही. लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही. लोक कसेही बोलतातच. 
 यावर रेखाताई म्हणाल्या, पण आदित्य ही ना प्रत्येक वेळेस अशीच पळवाट काढते आॉफीसच्या नावाखाली.मग  तिच्या अवगुणावर पांघरूण घातले जाते.एवढे मात्र  सत्य आहे. 
   आई काय खोटे आणि काय बरोबर? याची शहानिशा नको मला! ती काम करते. तिच्या आॉफीसचे काम जोखमीचे आहे , तिला सुट्टीही नसते. 
   स्वयंपाकाचे म्हणशील तर ती अताशी शिकते ती हळूहळू. मुख्य म्हणजे कुठे अडत नाही. ति करते तिला मोजकेच येते. 
 काय हरकत आहे मी केले तर?आदित्यने आर्याची बाजू घेतली.
 " हे अती होतयं आई, आणि या छोट्या मोठ्या गोष्टीचा परिणाम आमच्या कामावर होतो.अग खुप जबाबदाऱ्या असतात आॉफीसच्या आमच्यावर.जरा विचार कर." तावातावाने बोलून आदित्य रूम मध्ये निघून गेला.
  आर्या लॅपटॉप वर मिटींगची सेटिंग करत होती. तिच्या डोळ्यात पाणी होते. हे अदित्यच्या नजरेतून सुटले नाही.
 त्याने तिच्या डोळ्यातील पाणी पुसले.आर्या शांतपणे मिटींग attend कर. विसर सगळे मग बोलू आपण.
  आर्याने अदित्यच्या हात हातावर थोपटले आणि तिचा कॉल सुरू केला.अर्धा तास नॉनस्टॉप समोरच्या कलीग बरोबर बोलून तिने US चा प्रोजेक्ट हासील केला.
कॉल सक्सेस झाला.
 आपल्या मॅनेजरशी बोलून तिने ही बातमी सांगितली. आर्या सकाळी सकाळी किती मोठी आनंदाची बातमी.
  आॉफीसला या तुमच्यासाठी सरप्राईज आहे. म्हणत त्यांनी फोन ठेवला. 
   आर्या आता किचन मध्ये गेली. बाकीचा पसारा आवरू लागली. परत रेखा ताई आल्याच. राहू द्या हो तुम्हांला महत्वाचे काम आहेत ते करा. 
  त्यांचा त्रागा पाहून आता राघवची म्हणजेच अदित्यच्या बाबांची चांगली सटकली.
ते शेवटी म्हणाले,
 रेखा केंव्हाच झाले मी पाहतो आहे या न् त्या कारणाने तू त्या मुलीला बोलतेस. ती काही उत्तर देत नाही. नक्कीच तुझा कशावर राग आहे. आलं माझ्या लक्षात. 
  अग ते गावावरून आलेले पाहुणे त्यांची सून, अग कुवतीप्रमाणे सगळे अलबेल. त्यांचा मुलगा शिकला नाही. त्याच्या योग्यतेची मुलगी त्यांना सुन म्हणून मिळाली. म्हणून घरकामाला प्राधान्य देते ती. पण आर्या वेगळी आहे लक्षात ठेव. लोक काय म्हणतील हा विचार मनातून काढून टाक. 
  अग गडगंज संपत्ती आहे त्याच्याकडे आयत्या पिठावर  रेघोट्या मारतात त्यांचे चिरंजीव. काय काम असते मग त्यांना फक्त नावे ठेवणे बस्स! 
  त्यांच्याशी आपल्या मुलांची तुलना करून मनाला त्रास करून घेतेस? लाखमोलाचा हिरा तुला आर्यांच्या रूपात मिळाला आहे..
   तेंव्हा कोणाची तुलना कोणाबरोबर करावी याचे भान ठेव. प्रत्येक वेळी सुनेला काही येत नाही याचे टिमकी कशाला वाजवतेस. 
   तिच्या योग्यतेचा विचार कर. आत्ताच एका कॉल वरच तिने एक महत्वाचे प्रोजेक्ट मिळवले. त्याची तुला कल्पना आहे का ? 
 मी तर म्हणेल आज आर्याला जेवढ्या गोष्टी येतात,माहिती आहेत त्यातले एकतृतीयांश सुध्दा तुझ्या लेकाला माहिती नसणार. ति करते त्यातल्या किती गोष्टी तुमचे चिरंजीव करतात? 
   विचारून बघ त्याला आणि त्यालाच काय. आत्ता जे गेले ना गावी तुझे कान भरून त्यांनाही विचार. 
  तुझी सुन सकाळी उठून दुध आणने, पेपर आणने, भाजीपाला व्यवस्थित भाव करून आणने, सासू सासऱ्यांची औषधे, त्यांचे रूटीन चेकअप् बाजारहाट. सगळे तुला आणून देते. 
  यातले किती तुमचे चिरंजीव  म्हणजेच आदित्य करतात? आणि त्या पाव्हण्यांची सुन पण करते का ग हे सगळं? 
 मला कोणती औषधे लागतात,तुझी कोणती संपली?कि जातीने लक्ष देते. पै, पाव्हणे त्यांचा पाहूणचार तिच करते. 
 खरय ना? आज ऐवढे महागडे गिफ्ट तू त्या पाव्हण्यांना दिलेस. कोणी आणले कधी आणले, प्रत्येकांच्या आवडी निवडी सगळे मनापासून जपते ती पोरगी. 
  तू सरळ सरळ  तिला घालून पाडून बोलतेस. कारण काय तर तर तुझ्या मुलाने आज सकाळचे नाष्टा व चहा केला. ते सुध्दा पाव्हण्याचा समोर एवढेच ना! अग करू दे काय बिघडले? 
  मी तर म्हणेल "अग करू दे त्यांचा संसार आहे.करतील नाही तर ठेवतील."अलिप्त हो रेखा आता या मोहमायातून अलिप्त हो."
  राघवने म्हणजेच आदित्यच्या वडीलांनी रेखाताईंना समजावून तर सांगितले. 
 पण रेखाला कितपत पटले असेल देव जाणे. शेवटी लोक काय म्हणतील याचे गारूड तिच्या मनावर घट्ट बसले गेले होते. 
    
पण एवढे मात्र नक्कीच प्रत्येक वेळी "एक बोट दुसऱ्याकडे करताना चार बोटे तुमच्याकडे असतात"
  सुनेला काही येत नाही पण स्वत:च्या मुलाला किती गोष्टी करता येतात हे, पडताळून पाहणे प्रत्येक रेखाचे काम आहे. काय बरोबर ना! 
  शेवटी लोक काय म्हणतील म्हणून आपण आपल्या घरात शुल्लक गोष्टीतून वातंग माजवतो आणि खुप मोठ्या क्षणाच्या आनंदाला मुकतो. 

  ©️®️सौ.ऊज्वला रवींद्र राहणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...