आज ऑफिस मधुन लवकर सुटले. घरीही काही काम नव्हतं म्हणुन म्हटलं आज शॉपींग करावी. ऑफिसजवळच् एक नविन मॉल ओपन झाला होता वाटलं तिथे जावं. मॉल मस्तच् होता. पण शॉपिंग करता करता अचानक माझी नजर एका व्यक्तीकडे गेली. ती व्यक्ती थोडीशी ओळखीची वाटली. जरासा आठवायचा प्रयत्न केला. आणि आश्चर्याचा धक्काच् बसला.
अरे हा...हा तर तोच्. दर्पण देशपांडे. चार वर्षापूर्वी ज्याला मी 'रिजेक्ट' केलेलं. दिसायला बरा. पण राहणीमान एकदम ढोबळ. ना कपडे व्यवस्थित. ना दाढी, ना केस व्यवस्थित. बोलायला म्हणाल तर एकदम अबोल. माझ्या बरोबर असायचा तर मलाच् लाज वाटायची. शेवटी मीच् त्याला सांगितलं होतं. आपलं काही जमायचं नाही. पण आता. कपडे टापटीप. दाढी, केस व्यवस्थित. पोरींनी बघितलं तर एकदम घायाळ होतील असा लुक. न राहावुन मीच् त्याच्याकडे गेले... म्हटलं "एक्सक्युज मी."
त्यानं वळुन बघितलं. मला बघुन तो पण आश्चर्यचकित झाला. "हाऽय.. कशी आहेस? बऱ्याच् दिवसांनी?"
"हो.... चार वर्ष...."
"अरे व्वा....! लक्षात आहे तर?"
"हो......", जरा लाजुनच् म्हटलं.
मग त्यानेच् विषय बदलला, "कॉफी घेशील?" मॉल मधल्याच् CCD त गेलो. कॉफी मागवली. त्याने विचारलं, "अजुन काही मागवायचं का?"
"नको. आत्ताच नाष्टा करुन निघाले ऑफिसवरुन." त्याने ऑर्डर दिली. मग थट्टेच्या सुरातच् बोलला "ऑफिसमध्ये कॉफी मिळत नाही का?"
"मिळते रे. पण ति भैयाची कॉफी. त्याला ना रंग ना वास, ना चव."
तो जरासा हसला. क्षणभर त्याला न्याहळलं. अगदी केसांपासुन बुटांपर्यंत. त्यानीही बघितलं. तशी त्याची नजर चुकवली. तरीही त्याने विचारलच्. "काय बघतेयस..?"
"काही नाही."
तेवढ्यात कॉफी आली. कॉफी घेता घेता त्याने विचारलं."मग.., कुठे बाण लागला कि नाही?",
जरा लाजुनच् म्हटलं "नाही रे... अजुन बघणं चालुच आहे.",
"आणि तुझा.",
म्हणाला "होय. वर्षापुर्वीच्. सहा महिने होतील बेड्या अडकुन." मिश्किल हसतच् बोलला.
"अरे वा... congrats..." धक्क्यातून सावरतच् म्हटलं. "काय करतायत वहिनी?"
"अवंती. आर्किटेक्चरल डिझायनर आहे." फोटो दाखवत म्हणाला.
फोटो बघुन मनात म्हटलं 'ठिक आहे.', पण म्हटलं "व्वा...सुंदर.".
थोड्या वेळाने त्यानेच् विषय काढला "तु विचार करत असशील ना? हा एवढा कसा बदलला? ह्याला ह्या मुलीने कसं पसंत केलं?"
आढे वेढे घेत मी म्हटलं "नाही, नाही, असं काही नाही. पण थोडसं आश्चर्य वाटलं.".
हसून म्हणाला "कधी कधी मलाही आश्चर्य वाटतं. हिने काय बघितलं माझ्यात.?"
मी म्हटलं "of course... तुझा लुक बघुन घायाळ झाली असणार.".
तो मोठ्याने हसायला लागला. आजुबाजुचे couples पण बघायला लागले. तो control करत म्हटला "हा लुक? हा तर तिनेच् घडवलाय."
"काऽय...?" माझे डोळे बाहेर पडायचे बाकी होते.
मला सावरुन म्हटला. "सांगतो..." कॉफीचा सिप घेत घेत तो बोलायला लागला. "तुझ्याकडुन जेव्हा निर्णय आला, तेव्हा थोडंसं वाईट वाटलं. नंतर दोन-तीन मुली अजुन बघितल्या. त्यांनीही रिजेक्ट केलं. मग वाटलं 'काय प्रॉब्लेम आहे माझ्यात?' पगार व्यवस्थित आहे. दिसायला चांगला आहे. पण जमणं कठीण दिसतंय. असं समोरची पार्टीच् म्हणायची. मी माझ्या घरच्यांना सांगीतलं कि आता बास्स. पण ते ऐकायलाच् तयार नव्हते. नंतर एकदा घरच्यांनी अवंतीची प्रोफाईल दाखवली. मी मनात म्हटलं आता हिच्याकडुन पण नकारच् येणार. पण घरच्यांसाठी मी 'ठिक आहे' म्हटलं. आमचा 'चहा-पोह्यांचा' कार्यक्रम झाला. तेव्हा तिच्या नजरेतुन माझ्यासाठी काही चिन्हे दिसत नव्हती. तरीही मी घरच्यांसाठी म्हटलं 'पसंत आहे' म्हणुन. एक-दोन दिवसांत त्यांचाही फोन आला. 'हिला मुलाला भेटायची ईच्छा आहे.' आमचे फोन नंबर्स exchange झाले. एके दिवशी आम्ही भेटलो सुद्धा. तिने तिची background सांगितली. मला विचारली. मीही सांगितली.
दुसऱ्या दिवशी त्यांच्या कडुन फोन. 'मुलगा पसंत आहे'...
मी फक्त चक्कर येऊन पडायचा बाकी होतो. मी तिला लगेच् फोन करून 'भेटशिल का?' विचारलं.
ती म्हणाली, 'मी सद्ध्या ऑफिसमधे आहे, ऑफिस सुटल्यानंतर भेटु.'
तिच्या ऑफिसखालीच् तिची वाट पाहत ऊभा होतो. ती ऑफिस सुटल्यानंतर आली. आम्ही एका हॉटेल मध्ये गेलो. ती म्हणाली, .'हम्म... बोल....'
मी स्पष्ट विचारलं 'तुझा निर्णय पक्का आहे ना..'
ती म्हणाली 'हो... का?'
मी म्हटलं. 'काय पहिलंस माझ्यात? मी थोडासा अबोल, रहायला एकदम ढोबळ, सद्ध्याच्या मुलींना तर न आवडणारा, थोडक्यात आऊटडेटेड. तुला कसा आवडलो?'
ती हसुन म्हणाली 'मला आवडला तो तुझ्यातला सच्चेपणा, आपण पहिल्यांदा भेटलो, तेव्हा तु सगळं सगळं खरं सांगितलंस, तुझे strengths, तुझे weaknesses, तुला काय व्हायचंय, सगळं सगळं. म्हटलं, जो माणुस आपल्याला पहिल्याच् भेटीत मनातलं सगळं खरं खरं बोलुन दाखवतो, तो माणूस आपल्याला आयुष्यात कधिही फसवु शकत नाही आणि अबोलपणा, ढोबळपणाचं म्हटलंस, तर तो काय उद्याही बदलु शकतोस. माणसाचा बदल हा त्याच् माणसावर अवलंबून असतो. तो कधी बदलायचा हे त्याच्यावरच् depend असतं. आणि तुझ्याकडे बघुन मला असं वाटलं कि तू तो बदलशील.' 'हॅल्लो? कुठे हरवलास?' हसत तिनं मला भानावर आणलं प्रसंगातुनही आणि आयुष्यातही. मी तेव्हा म्हटलं काही नाही. पण मी मनापासुन पक्कं केलं. लग्नं करीन तर हिच्याशीच्. मग हळुहळु भेटीगाठी वाढल्या तिने मला काही शारीरीक आणि मानसिक बदल सुचवले. मी ते केले आणि माझ्या असं लक्षात आलं कि सालं हेच् आयुष्य तर मला जगायचं होतं. आपण म्हणतो कि 'बंद घड्याळाकडे कोणीही बघत नाही. पण त्या घड्याळाला जर चावीच् दिली नाही आणि ते अचुक वेळेवर आणलं नाही तर ते घड्याळ अचुक वेळ दाखवणार नाही, आणि कोणी त्याकडे बघणारही नाही.' माझ्या आयुष्याच्या बंद घड्याळाची चावी अवंतीकडे होती आणि आत्ता सद्ध्या तुझ्या समोर बसलाय. त्याचा 'modifier' सुद्धा तिच् आहे..."
"सर... बिल...." वेटरनं म्हटल्यावर दोघंही भानावर आलो. मी TTMM म्हणत असतानाच् त्यानंच् बिल paid केलं.. म्हणाला, "ह्याची परतफेड घरी भेटायला येऊन करायला लागेल."
मी म्हटलं.., "नक्की.....तेवढंच् अवंतीशी भेटुन होईल"
आम्ही निघालो. माझी शॉपिंग झाल्यावर ऑटोने घरी निघाले.
रिक्षात बसल्यावर मनात विचार चालुच होते. 'ज्याला आपण एका बाईने जोडिदार म्हणुन रिजेक्ट केलं त्याच् माणसाला एका बाईनेच् असं बदललं. कि आत्ता त्याच् माणसाचा हेवा वाटावा. माणसाला त्याच्या negativity मुळे नाकारणं सोप्पं असतं पण त्याच् माणसाची negativity स्विकारून त्यात काही positive बदल घडवुन आणणं खुप कठिण असतं.'
©हेमंत रोडे. ✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा