🤝"भेट" हिच खरी नाते टिकवण्याची "चावी" असतें . 🙍♀ 🙋♀ 🙋♂ 💁♂ 👩❤️👨
भेट ही अनपेक्षित असते, ती कधी माहित असून होते तर, कधी माहित नसताना होते. पण भेट ही होतेचं. भेटीला कधी बंधन नसतात. कारण, ज्यांना आपल्याला खरंच भेटायचे असते ते कधीच आपल्याशी होणारी भेट टाळत नाहीत. खरंच काही भेटी या आनंददायक असतात, तर काही दुःखदायक असतात, पण भेटीमुळे आपलेपणा वाढतो आणि नात्यातील प्रेम पराकोटीला जातं. म्हणून वेळेतला वेळ काढून आपल्या प्रिय व्यक्तीला कधीतरी भेटत जा. जेणेकरून त्यांच्यातील आणि तुमच्यातील दुरावा हा वाढणार नाही. भेटत चला. अनेकांना पण, नाती ही मर्यादित ठेवा व भेटी पण मर्यादित ठेवा. कारण अनेक भेटी या फक्त गरजेपोटी असतात. म्हणून अशा गरजेसाठीच्या भेटीला वेळच देऊ नका. ज्यांना खरंच आपली गरज आहे आणि ती व्यक्ती आपली आहे हे समजूनच भेट घ्या व त्यांना जपा. म्हणजे येणाऱ्या काळात ते तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपतील.
दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे. आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा. जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा. नकोत्या उठाठेवी करू नका. नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा.
संकलक, प्रा. माधव सावळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा