१) लग्नात मांडव कशासाठी ?
= मातेनं माझ्या मुलीचं मनही मांडवासारखं मोठं आहे, हे सांगण्यासाठी !
२) विहिणबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी?
= माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा, हे सांगण्यासाठी !
३) नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी?
=माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा, हे सांगण्यासाठी !
४) मुलीच्या मागं मामाचं उभा राहतो,हे कशासाठी?
= मुलीला सांगण्यासाठी की मी तुझ्या आईच्या पाठीशी भक्कम उभा आहे, हे सांगण्यासाठी !
५) लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी?
= प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही, राहणार नाही व राहू नाही हे सांगण्यासाठी !
६) लग्नात सप्तपदी माहित आहे का कशासाठी?
= तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं हि केवळ मर्यादा आहे, हे सांगण्यासाठी !
पहिले पाऊल :- तू एक पाऊल चाललीस, तुझे माझे सख्य झाले. सुंदर अन्न तयार करणारी अन्नपूर्णा हो. माझ्याशी एकनिष्ठ वाग. आपल्या कुटुंबाचे आपण कल्याण करू.।
दुसरे पाऊल :- तू माझ्याबरोबर दोन पाऊले चाललीस, माझे बळ वाढवणारी हो. आपण धैर्य आणि सामर्थ्य ठेऊन कुटुंबातील आनंद संरक्षित ठेऊ.
तिसरे पाऊल :- तू माझ्याबरोबर तीन पाऊले चाललीस, धनप्राप्त करून देणारी हो. आपण दोघे संपत्ती व ज्ञानाची संमृद्धी करू.
चौथे पाऊल :- तू माझ्याबरोबर चार पाऊले चाललीस, तू सुख वाढवणारी हो. आपण दोघेही सुख, आनंद वाढवू.
पाचवे पाऊल :- तू माझ्याबरोबर पाच पाऊले चाललीस, तू संतती वाढवणारी हो. आपण दोघे सद्गुणी संतती निर्माण करू.
सहावे पाऊल :- तू माझ्याबरोबर सहा पाऊले चाललीस, तू सर्व ऋतुमध्ये सुख देणारी हो.
सातवे पाऊल :- तू माझ्याबरोबर सात पाऊले चाललीस तुझे माझ्याशी सख्य दृढ होवो. आपल्या कुटुंबाचे सुख-दु:ख आपण आपल्या हृदयात जतन करू.
७) ध्रुव : अरुंधती -सप्तर्षी यांचे दर्शन : सप्तपदी झाल्यानंतर रात्री वधू वर उघड्यावर येऊन ध्रुव, अरुंधती ,सप्तर्षी यांचे दर्शन घेतात .ही एक प्रकारची प्रतीकोपासना आहे. ध्रुव हे अढळ्तेचे प्रतिक , अरुंधती ही स्त्रियांची आदर्श आणि सप्तर्षी आपले पूर्वज म्हणून त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्या प्रमाणे वागण्याचा निश्चय करणे असा या विधीचा उद्देश आहे. या विशिष्ट दृष्टीने या विधींकडे पाहिल्यास हे संस्कार प्रतीकालकता व सुचक्ते द्वारे वधू वरांना भावी आयुष्यातील कर्तव्यांबाबत जाणीव करून देतात असे ध्यानात येते .
७) लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी???
= तांदूळ ची अक्षता याच्या साठी की तांदूळ चे बीज लावताना आपण एक जागी लावतो ते थोडे मोठे झाले की मग त्याची लावणी वेगळ्या जागी करतो तसेच मुलींचे बालपण माहेरी असते त्या जिथे मोठ्या होतात तिथून त्यांना दुसऱ्या जागी जावे लागते तिथेच त्यांचा वंश वाढतो, याची आठवण रहावी म्हणून लग्नात तांदुळाच्या अक्षता टाकतात पण हे शास्त्र बऱ्याच लोकांना माहीत नाही..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा