सोमवार, २२ एप्रिल, २०२४

1072. वाढदिवस

 नवरा बायको मुलाच्या वाढदिवशी रात्री दीड वाजता आईने फोन केला. 
म्हणाली, बाळा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मुलगा वैतागला. चिडूनच म्हणाला, 
"अगं, ही काय वेळ आहे फोन करायची ? 
सकाळी फोन करता आला नसता का ?" 
शुभेच्छांचा स्वीकार न करता मुलाने फोन ठेऊन कट केला.
 काही वेळाने त्याच्या खास मैत्रिणीचा फोन आला, 
तब्बल दोन तास बोलला.
 नंतर मैत्रिण फोन ठेवते बोलली, सकाळी बोलु बोलली
तरी तिची ईच्छा नसतानाही अजुन जबरदस्तीनं दहा मिनिटं जास्तच बोलला,
 शेवटी तिनंच फोन कट केला.
 नंतर एवढा वेळ फोन व्यस्त लागुनही वडिलांनी फोन केला. .
आता तो मुलगा रागवत नाही, पण शांतपणाने म्हणतो, "बाबा, सकाळी करायचा ना फोन.
आताच आईचा फोन येऊन गेला. तिने."  
वडील म्हणाले, "मी तुला हेच सांगायला फोन केलाय, की
तुझी आई खरंच वेडी आहे,
मूर्ख आहे जिनं तुला तुझा वाढदिवस म्हणून फोन करून तुझी झोपमोड केली.
खरं तरं ती पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच अशी वेडी, मूर्ख झालेली आहे. 
पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा डॉक्टरानी तिला सांगितले होते, 
की तातडीनं ऑपरेशन करून मूल अॅबाॅर्ट करावं लागेल तेव्हा आई जगू शकेल. 
पण तेव्हा ती मरायलासुद्धा तैयार झाली होती. 
तुला जन्म द्यायचाच ही भावना होती तिची. 
रात्री दीड वाजता तुझा जन्म झाला बाळा. 
संध्याकाळी सहा वाजल्यापासून तिला प्रसववेदनांनी त्रास होत होता. 
त्यावेळी खरंच ती जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर होती असह्य वेदना सहन करत !
पण तुझा जन्म झाला आणि ती सगळ्या वेदनाच विसरून गेली.
डॉक्टरांनी तर आधीच आमच्याकडून लिहून घेतले होते की 
तिच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर डाॅक्टर जबाबदार नाहीत म्हणून ...
तुझा जन्म सुखरूप झाला आणि तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
आज तुला रात्री दीड वाजता फोन करून तुझी झोपमोड केली 
त्याबद्दल तिला माफ कर.
 एक सांगायचंय, तुझी आई पंचवीस वर्षांपासून मला रोज रात्री दीड वाजता उठवते 
आणि अभिमानाने सांगते, आपल्या बाळाचा जन्म याचवेळी झाला होता बरं का 
फक्त हेच सांगण्यासाठी तुला फोन केला होता. 
असं सांगून वडिलांनी फोन ठेऊन दिला. 
मुलगा हे सगळे ऐकून सुन्न झाला होता. 
सकाळीच तो वडिलांच्या घरी पोहोचला. 
आईचे पाय धरून त्यांची त्याने माफीही मागितली.
वडील म्हणाले , "ती नेहमी म्हणायची, 
आपला मुलगा आहे, त्यामुळे आपल्याला कसलीही चिंता नाही. 
आता मी तिला सांगेन जशी आधीपण काळजी घेतली, तशीच तुझी काळजी मी यापुढे घेईन.
"आई म्हणाली, "असू द्या हो  माफ करा त्याला ...."
आई वडिलांना आपली धन दौलत, सम्पत्ती नव्हे तर आपले प्रेम हवं असतं. 
तुम्ही त्यांची काळजीही करावी अशी त्यांची अपेक्षा नसते पण तुमच्यामध्ये त्यांच्याप्रति जाणीव जरी दिसली तरी त्यांना धन्य वाटते.
तुम्ही आई-वडिलांना वेळ द्यावा अशीही त्यांची इच्छा नसते 
पण त्यांना वेळ दिलात तर त्यांना समाधान वाटते कारण त्या दोघांचं प्रेम जगात अनमोल आहे.

एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही.
एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही.
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं. 
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...