सोमवार, १ एप्रिल, २०२४

1019. सारकोपेनिया

      सारकोपेनिया म्हणजे स्नायूंचे वस्तुमान, ताकद आणि कार्य हळूहळू नष्ट होणे. वृद्धत्वामुळे सांगाड्याच्या स्नायूंचे वस्तुमान आणि शक्ती कमी होत जाणे. प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेवर ते अवलंबून असते. पण ही परिस्थिती भयंकर असू शकते. चला तर मग सारकोपेनिया टाळण्यासाठी शोध आणि विश्लेषण करूया. 
   आपली सवय विकसित करा, जर तुम्हाला उभे राहता येत असेल तर जास्तीत जास्त उभे रहाण्याचा प्रयत्न करा. बसू नका. आणि उभे राहू शकत नसल्यास बसा हरकत नाही. पण शक्यतो बसा  झोपू नका. जेव्हा एखादी वृद्ध व्यक्ती आजारी पडते आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होते, तेव्हा त्याला/तिला अधिक आराम करण्यास सांगू नका, किंवा झोपण्यास सांगू नका, हे उपयुक्त नाही. त्यांना हळूहळू जसे जमेल तसा फेरफटका मारण्यास मदत करा. त्यांनी थोडेफार चालण्याची क्षमता जर गमावली तर नुसते पडून राहिल्याने किमान ५% स्नायू कमी होतात  आणि दुर्दैवाने, वृद्ध लोक नुकसान झालेले स्नायू हे  पुनर्प्राप्त करू शकत नाहीत. सामान्यत बहुतेक ज्येष्ठ/वृद्ध व्यक्ती या सक्रिय असलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त वेगाने आपले  स्नायू गमावतात.  सारकोपेनिया हा ऑस्टियोपोरोसिस पेक्षा जास्त भयानक आहे. सायकोकेनिया ऑस्टियोपोरोसिस यात वृद्ध व्यक्ती ने आपण खाली पडणार नाही. याची काळजी घेणे आवश्यक आहे. सारकोपेनिया केवळ जीवनाच्या गुणवत्तेवरच परिणाम करत नाही तर स्नायूंच्या अपुर्‍या वस्तुमानामुळे, क्षमतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण देखील वाढवते. स्नायूंचे सर्वात जलद नुकसान हे पायांच्या स्नायूंच्या आळशीपणामुळे होते. कारण बसलेल्या किंवा पडलेल्या स्थितीत, पायांची हालचाल होत नाही. आणि त्याचा पायांच्या स्नायूंच्या ताकदीवर थेट परिणाम होतो. याकडे वृद्धांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पायऱ्या चढून वर जाणे. चालणे, धावणे आणि सायकल चालवणे हे सर्व उत्तम व्यायाम आहेत आणि ते स्नायू वाढवू शकतात. 
     पण वृद्धावस्थेत हे अशक्य आहे. पण मात्र वृद्ध वयात चांगल्या दर्जाच्या जीवनासाठी.  हळूहळू कां होईना पण चाला पायांची हालचाल वाढवा. त्यामुळे  तुमचे स्नायू वाया जाणार नाहीत. वृद्धत्व हे नेहमी पायापासून वरच्या दिशेने खालून वर असे उलटे सुरू होते. स्नायु गमावले जाऊ नयेत म्हणून हालचाल सुरु ठेवून आपले पाय सक्रिय आणि मजबूत करा. जसे आपण वयाने वाढत  जातो वृद्धापकाळाकडे वाटचाल सुरू होते तसतसे आपण स्वतःच  पायांची हालचाल करुन ते नेहमी सक्रिय आणि मजबूत ठेवणे फार गरजेचे आहे. जर तुम्ही दोन/तिन आठवडे तुमचे पाय हलवलेच नाहीत. आणि नुसते बसून अथवा झोपून राहिलात तर तुमच्या पायाची खरी ताकद ही १० वर्षांनी कमी होईल. हे लक्षात घ्या मित्रांनो आणि मग हळूहळू परस्वाधीनतेने दुसऱ्यावर अवलंबून राहून जीवन जगावे लागेल. आपल्याला हालचाल करणेच अशक्य होईल. म्हणून पायांची हालचाल करत रहा जमत असल्यास थोडेफार चालणे, शक्य असल्यास सायकल चालवणे इत्यादी सारखे  जे वृद्धावस्थेत जमू शकतील असे नियमित व्यायाम खूप महत्वाचे आहेत जमल्यास आवश्यक करा. पाय हे एक प्रकारचे आपल्या शरीराचे स्तंभ आहेत. जे मानवी शरीराचा संपूर्ण भार सहन करतात ते चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी रोज जमेल तसे हळूहळू थोडेफार चाला. विशेष म्हणजे, ५०% मानवी हाडे आणि ५०% स्नायू हे पायांमध्ये असतात. हे फार विशेष आहे मित्रांनो.  पाय हे शरीराच्या हालचालीचे केंद्रस्थान आहे. दोन्ही पायांमध्ये मानवी शरीराच्या 50% नसा, 50% रक्तवाहिन्या आणि 50% रक्त त्या नसांमधून वाहात असते.       
    वयाच्या सत्तरी आणि ऐंशी नंतरही पायांचा व्यायाम  हळूहळू जसा जमेल तसा करावा. अती ताण देऊ नये कारण हांडे ठिसूळ झालेली असतात. मोडू शकतात. नको ते कांहितरी होईल. व रुग्णालय गाठावे लागेल. असे कांहितरी होऊ नये हे लक्षात घेऊनच हालचाल करावी. तुमच्या पायांना पुरेसा व्यायाम मिळावा आणि तुमच्या पायाचे स्नायू निरोगी राहावे म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी  बाहेर जमल्यास बाहेर न जमल्यास घरातल्या घरात का होईना दिवसातून किमान 30-40 मिनिटे चाला. ही महत्त्वाची माहिती माझे पर्यंत आली. मी आपणापर्यंत शेअर केली. आपण  हि माहिती तुमच्या सर्व मित्रांना आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसह सामायिक करा. विशेषत:४० वर्ष आणि त्यावरील वयोगटातील, प्रत्येकजण दिवसेंदिवस वृद्ध होत आहे.

अजूनही उशीर झालेला नाही. चला आजच हळू हळू चालायला सुरुवात करूया !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...