सिग्नलला सोनचाफ्याची फुले विकणाऱ्या
त्या मुलीला पैसे देऊन
तोच सोनचाफा तिलाच भेट दिल्यावर
तिच्या मळलेल्या डोळ्यात उठलेली
आनंदाची चमक म्हणजे दिवाळी.
केरसुणीचा फडा घेताना
त्या आज्जीशी किंमतीची घासाघीस न करता
दोन केरसुण्या घ्यायची आणि
वर दहा वीस रुपये जास्त दिल्यावर,
त्या आज्जीच्या चेहेऱ्यावरच्या सुरुकुत्यांमधून
झिरपणारे मंद हसू म्हणजेच दिवाळी.
दुकानात गेल्यावर जे आवडते ते घेण्यासाठी
आपल्याजवळ पैसे आहेत
हे ज्या दिवशी पहिल्यांदा जाणीव होते
तो क्षण म्हणजे दिवाळी...
दमलेल्या तिला,
"दमलीस ना ?
बस जरा वेळ... मी तुला मस्तपैकी चहा देतो."
म्हणजेच ही दिवाळी.
सकाळपासून रात्री उशिरापर्यंत
घामाघूम होऊन आवराआवरी केल्यावर
लाडू, चकल्या, करंज्या, चिवडा, शंकरपाळे
डब्यात भरताना तिच्या मनांत
ओतप्रोत झिरपत जाणारा
तो खमंग आपलेपणा म्हणजेच दिवाळी..
ऑफीसाला निघालेलो असताना,
तिने समोर यावं आणि
हातांमधे चार पाच मोगऱ्याची फुलं ठेवावीत...
हा मोगऱ्याचा गंध म्हणजेच दिवाळी...
आपला मुलगा मोठा,
समजूतदार झाल्याचा क्षण म्हणजेच दिवाळी....
"बाबा, यंदा तुम्हांला आणि
आईला मी नविन कपडे घेणारेय..."
हे ऐकायला येण्याचा क्षण म्हणजेच दिवाळी.
"आज्जी, आजोबा, चला
आज लाँग ड्राईव्हला घेऊन जातो तुम्हांला..."
हे शब्द ऐकणं म्हणजेच दिवाळी...
आपल्याला ऑफीसचा बोनस कधी मिळतोय
याची वाट न बघता पूर्ण पगार आणि
बोनस दिल्यावर फरशी पुसणाऱ्या
मावशींच्या डोळ्यातला आनंद म्हणजेच दिवाळी.
परस्परांतील हेवेदाव्यांची,
झाल्या गेल्या मतभेदांची जळमटं दूर करुन,
ते सगळं विसरुन
एकत्र येणं म्हणजेच दिवाळी.
सकाळपासून पार रात्री उशिरापर्यंत आवराआवरी,
भाजणी - तळणी केल्यावर
भरलेल्या डब्या डब्यात ओतप्रोत झिरपत जाते,
ती खमंग जाणीव म्हणजे..." . दिवाळी"..!
भरदुपारी कामात असतानाच,
आपली चिमुकली आपण न सांगताच.
"आई, आज मी रांगोळी काढू का??" असे विचारते,
अशा मातृत्वाच्या पुन:महतीचा साक्षात्कार म्हणजे..... "" दिवाळी ""..!
आपल्याला पाडवा, भाऊबीज मिळण्याआधी
महिना पूर्ण भरण्याची वाट न पाहता,
पगार नि बोनस दिल्यावर"
मावशींच्या डोळ्यात नाचणारा
ऊन पावसाचा खेळ म्हणजे. "दिवाळी."..!
दिव्यांच्या झगमगाटात,
फट्याक्यांच्या लखलखाटात,
मनामनावर राज्य करते,
त्या रोषनाईची महाराणी म्हणजे. दिवाळी..!
आपल्यातील उणीवांची,
परस्परांतील हेवादाव्यांची
जळमटं दूर करण्यासाठी सुवर्णसंधी म्हणजे.."दिवाळी"
अशी दिवाळी आपणा सर्वांच्याच आयुष्यात आनंदाचे,
सुखा - समाधानाचे दीप पाजळत येवो.
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा