शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

2327. दिवा

     त्या रस्त्यावरून एक माणूस सतत जात येत असावा. कदाचित एक नोकरीवाला आणि रेल्वेचा तो कर्मचारी असावा. रोजची दोघांची तो घालमेल बघत होता. पावसाची रिपरिप सुरूच. संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ. विशेष म्हणजे धनतेरस चा दिवस.
अचानक तो थांबतो. त्या म्हातारीला विचारतो.  "दिवे कसे दिलेत."
तिचं लक्षच नसतं. ती भानावर येते. तो तरुण ही तिथं असतो. ती भाव सांगते.
"पूर्ण टोपलीमध्ये असलेल्या दिव्याची किंमत सांगा."
काकुळतीने म्हातारी म्हणते. "भाऊ कशाला गरीबाची थट्टा करता. सकाळपासून तुम्हाला कुणी भेटला नाही?"
तिच्या कोरड्या झालेल्या डोळ्यात टचकन् पाणि येतं. नकळत तिच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या डोळ्यात कसा आलं, त्यालाच कळलं नाही.
"नाही आजी... मी मस्करी नाही करत आहे. मला  खरंच दिवे घ्यायचे आहेत."
तिची नजर आश्वस्त झाली. तिचे डोळे चकाकले. तिच्या मुलाचा चेहऱ्यावरही तेज आलं. त्या आजीने हिशोब करत कमी पैसे लावत. १७१० रुपये सांगितले.
त्या माणसाने पटकन खिशात हात घातला. आणि पटकन २००० हजाराची नोट काढून तिच्या हातात ठेवली.
ती नोट ठेवल्या बरोबर तिच्या डोळ्यातलं पाणी त्या नोटेवर पडलं. तोही गहिवरला.
त्या म्हातारीची सून रोज वाट बघत होती... आपला नवरा येईल. आपली सासू  येईल. काहीतरी पैसे घेऊन येतील. आणि दिवाळीसाठी काहीतरी फराळासाठी घेऊन येतील.
घरात नवीन सुन आलेली. तिला तोंड कसं दाखवावं? हातात रुपया नाही. या चिंतेने ते दोघे ग्रासलेले होते. परमेश्वर कोण कोणत्या रूपात येऊन जाईल, हे सांगता येत नाही.
कदाचित तो माणसात देव च आला असावा.. त्यादिवशी एका गरीबाची दिवाळी गोड झाली होती खऱ्या अर्थाने. पावसाने त्यांचा धंदाच झाला नव्हता. 
ते दिवे घेतलेल्या माणसाने रेल्वे कॉलनीतल्या प्रत्येक घरांमध्ये दिवे वाटले, प्रत्येकाच्या घराघरात त्याने प्रकाश निर्माण केला. प्रत्येक दिवाळीला या माणसाची त्यांना आठवण येईल. कदाचित आयुष्यभर प्रत्येक दिवाळीला. आणि त्या म्हातारी आजीला आणि त्या तरुणाला ही आठवण राहील. त्या माणसाला भरभरून आशीर्वाद मिळतील यात शंकाच नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...