ती शेवटची चिठ्ठी. जी आईनं जपून ठेवली होती 💌 त्या सकाळी टपालवाला दारात आला आणि म्हणाला. “मनीष राव, तुमच्या आईची चिठ्ठी आहे. त्यांनी स्वतः सांगितलं होतं - ही नेमक्या एक वर्षानंतर तुम्हाला द्यायची.”
मनिष थबकला. कारण आज त्याच्या आईला जाऊन नेमकं एक वर्ष झालं होते.
एक वर्षापूर्वीची गोष्ट. आई. लता, वय ६७. वडिलांच्या निधनानंतर एकट्याच राहत होत्या. तीन मुलगे - अजय, दीपक आणि मनीष. सगळे आपापल्या जगण्यात व्यस्त. एक दिवस आईनं फोन केला.
“बाळांनो, जरा घरी या ना, काही बोलायचं आहे.” तीघेही पोचले.
आईनं जुन्या पेटीतून एक पाकिट काढलं आणि म्हणाली -
“हे २५ लाखांचं कर्ज आहे. तुमच्या वडिलांनी माझ्या आजारपणाच्या आणि तुमच्या शिक्षणाच्या खर्चासाठी घेतलं होतं. ते फेडायचं आहे, नाहीतर मला शांतता मिळणार नाही.”
अजय हसला -
“आई, आता त्या जुन्या गोष्टींचा विचार कशाला करतेस?
आम्ही सगळेच आमच्या मुलांच्या खर्चात बुडालो आहोत.”
दीपक म्हणाला -
“आई, तू उगीच काळजी करतेस. कुणी मागायला येणार नाही ते पैसे.”
आई फक्त हसली.
मग मनिष्कडे पाहिलं -
“मनीष, तू काही बोलणार नाहीस?”
त्याने शांतपणे मान खाली घातली.
नोकरी नुकतीच लागली होती. पैसे नव्हते.
पण आईच्या नजरेत एक विश्वास होता - जो तोडणं त्याच्या हातात नव्हतं.
तो म्हटला,
“आई, मी फेडेन. थोडं थोडं करून. पण नक्की फेडेन.”
आईच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली -
“मला माहीत होतं, माझं खरं लेकरू तूच आहेस.
कारण हिशेब फक्त पैशांचा नसतो रे, नात्यांचा असतो.”
त्या दिवसानंतर आई मनीष बरोबर राहायला आली. जीवन बदललं. बायको नेहा थोडी नाराज होती.
“मनीष, तुझे दोन्ही भाऊ निवांत आहेत, आणि भार फक्त आपल्यावर का?”
त्याने फक्त एवढंच म्हटलं,-“ती माझी आई आहे. कर्ज नाही, माझं कर्तव्य आहे.”
दिवसभर ऑफिस, रात्री डिलिव्हरी बॉयचं पार्टटाइम काम. नेहानं तिचे दागिने विकले, आईच्या औषधांसाठी. कधी कधी ते सगळे फक्त खिचडी खाऊन झोपायचे.
पण आई नेहमी म्हणायची -
“मनीष, देवाचं लेकरू आहेस तू, कधी रिकामा राहणार नाहीस.”
हळूहळू, त्याने ते ‘कर्ज’ फेडलं.
महिना महिना, थोडं थोडं करून - अखेर पूर्ण २५ लाख संपले.
आई आनंदी होती, पण थकली होती. एक रात्री म्हणाली -
“मनीष, मी नसले तर माझ्या कपाटातली निळी फाइल उघड, पण एक वर्षानंतर.”
त्याने मान डोलावली.
तीन दिवसांनी ती शांत झोपेत गेली. चेहरा हसरा, देह निरव. आणि आज एक वर्षानंतर टपालवाल्यानं तो लिफाफा दिला. हात थरथरत होते. आत ती निळी फाइल होती, त्यात एक पत्र आणि बँकेचं पासबुक.
पत्रात लिहिलं होतं -
-------------------------------
“माझ्या लाडक्या मनीषसाठी, तुझ्या वडिलांच्या निधनानंतर मी जे ‘कर्ज’ सांगितलं होतं ते खरं तर काही नव्हतं. ती एक परिक्षा होती, बाळा. मला पाहायचं होतं. माझ्या तीन मुलांपैकी अजून कोणाच्या हृदयात आईसाठी जागा आहे. अजय आणि दीपक आधीच दूर गेले होते. पण तू. तू मला फक्त आसरा नाही, सन्मान दिलास. म्हणून मी माझी आणि तुझ्या वडिलांची सगळी सेविंग तुझ्या नावावर केली आहे. हे पासबुक त्याचा पुरावा आहे.
रक्कम : ₹२५ लाख.
पण हे पैसे तुझ्या श्रमाचं फळ नाहीत. ते तुझ्या मनाच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस आहेत. आईला तुझा अभिमान आहे.
तुझी आई, लता.*
तो जमिनीवर कोसळला, हातात पत्र, डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. नेहा जवळ आली -
“काय लिहिलंय?”
तो हसत म्हटला,
“आईनं कर्ज दिलं नव्हतं. माझी परीक्षा घेतली होती.”
नेहा हसली, म्हणाली -
“आणि तू पास झालास.”
त्या दिवशी उमगलं -
आईचं प्रेम कधीच हिशोबात बसत नाही, ते नेहमी व्याजासकट परत मिळतं. ❤️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा