शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

2326. कुटुंब नियोजन, स्त्री स्वातंत्र्य आणि लैंगिक शिक्षण

 तिचा जन्म इंग्लंडमधील एडिंबरो येथे झाला.तिचे बाबा शिक्षक तर आई लेखिका होती; घरात एकंदर ज्ञानाचं वातावरण असल्यानं ती ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती.
“मी माझ्या आयुष्याची पहिली २० वर्षे विज्ञानाला,पुढची २० वर्षे सामाजिक प्रकल्पांसाठी आणि उरलेले शेवटची २० वर्षे फक्त कविता लिहिणार” तिनं अगदी बालवयातच आपली योजना जाहिर केली.
शालेय शिक्षण संपल्यानंतर तिनं विद्यापीठात ‘वनस्पतीशास्त्र’ हा विषय निवडला आणि वयाच्या अवघ्या २१व्या व्या वर्षी ती लंडन विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवणारी सर्वात तरुण महिला ठरली.
या नंतर ती कॅनडामध्ये आणि मँचेस्टर युनिव्हर्सिटीत प्राध्यापक म्हणून काम करू लागली खरी पण तिचं खऱ्या अर्थाने आयुष्याचं ध्येय वेगळंच होतं..
दुर्दैवानं तिचं पहिलं लग्न अयशस्वी ठरलं; या काळात ही गोष्ट समाजाला धक्का देणारी होती पण याच अनुभवातून तिला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे,”स्त्रियांना त्यांच्या शरीराबाबत माहितीच दिली जात नाही.” 
तिनं पाहिलं की स्त्रिया विवाह-मातृत्व-सेक्स आणि आरोग्य याबाबत पूर्णपणे अंधारात आहेत.अनेक स्त्रिया अवांच्छित गर्भधारणेमुळं त्रस्त होत्या तर कुणालाही कुटुंब नियोजनाचं कोणतंही मार्गदर्शनच मिळत नव्हतं..
१९१८ साली तिनं एक वादग्रस्त पण ऐतिहासिक पुस्तक लिहिलं “Married Love" या पुस्तकात तिनं विवाहित आयुष्यातील लैंगिकतेविषयी उघडपणं चर्चा केली..
त्या काळात अशा विषयावर बोलणं म्हणजे जणू समाजाशी युद्ध पुकारणं; पण हे पुस्तक तुफान गाजलं एवढंच काय अवघ्या काही आठवड्यांत ते बेस्टसेलर ठरलं..
पुढे तिने ‘Wise Parenthood’ हे पुस्तक लिहून कुटुंब नियोजनावर भर दिला आणि स्त्रियांसाठी नवचैतन्य ठरेल असं थेट जन्मनियोजन क्लिनिकच सुरू केलं; इथं ती स्रियांचं यथोचित मार्गदर्शन करत असे ते ही अगदी मोफत..
स्त्रियांनी तिथे रांगा लावल्या;अनेक जणी पहिल्यांदाच आपल्या शरीराविषयी शिकू लागल्या..
या क्लिनिकमध्ये फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यालाही महत्त्व दिलं जात होतं.ही संकल्पना त्या काळाच्या खूपच पुढची होती..
तिचं काम क्रांतिकारी होतं म्हणूनच तिला प्रचंड विरोधही सहन करावा लागला; चर्चनं तर तिच्यावर प्रचंड आगपाखड केली टीका..
अगदी काही डॉक्टरांनीही तिला ‘शास्त्राचा अपमान’ ठरवलं तर समाजात तिला लोक ‘बिघडलेली बाई’ असं म्हणू लागले..
पण ती यत्किश्चिंतही खचली नाही.तिचं म्हणणं होतं,
“मुलं ही प्रेमानं आणि तयारीनंच जन्माला यायला हवीत केवळ अपघातानं नाही.”
जगभर महिला आरोग्याच्या लढ्याचं प्रतीक ठरलेल्या तिनं 
तिच्या आयुष्यभराच दहाहून अधिक पुस्तकं लिहिली,
महिलांना आरोग्यशिक्षण दिलं आणि जगभर जन्म नियोजनाच्या चर्चेला चालना दिली..
आज आपण कुटुंब नियोजन,स्त्री स्वातंत्र्य आणि लैंगिक शिक्षण याबद्दल थोडंफार बोलू शकतो ते तिच्यासारख्या धाडसी स्त्रियांमुळंच..
बालपणीच केलेल्या घोषणेनुरूप ती आपलं आयुष्य शब्दश: जगली आणि १९५८ साली आजच्याच दिवशी तिचं निधन झालं पण तिचा प्रभाव आजही जागतिक आरोग्यनीतिंमध्ये जाणवतो..सॅल्यूट मेरी स्टोप. 

#Doctors_Diary
सौजन्य: प्रज्ञावन्त देवलेकर यांची फेसबुक पोस्ट


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...