मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

2348. टाहो !

जमलंच पोरा तर,
दिवाळीला येऊन जा.
म्हाताऱ्या मायबापाला,
डोळ्याने पाहून जा.

माहीत हाय पोरा,
तुला संसार हाय.
पिकलेल्या पानाच,
आता काय भरोसा नाय.

बाप तुझा जलमभर,
स्वाभीमानाने आहे जगलेला.
जीवनाची लढाई लढताना,
कुणापुढं हात नाही पसरलेला.

पोरा माय तुझी,
उपासतापास करायची.
पोटाला चिमटा घेऊ,
रातदिस तुझ्यासाठी राबायची.

पोरा तुझं वैभव पाहून,
आनंदाच उधाण येतं.
गावाकडच्या वाड्यात मात्र,
मन तुझी वाट पहातं.

मायनं तुझ्या नावाचा,
नुसता घोशा लावलाय.
नातवाच्या भेटीसाठी तिचा,
जीव पुरता तळमळलाय.

पोरा गावाकडं येताना,
रिकामा आलास तरी चालेल.
सून नातवाला पाहून,
तुझ्या मायबापाच मन भरेल.

नुसतं खट्ट वाजलं तरी,
म्हातारी दाराकडं बघतीय.
आलास काय म्हणून,
काठी टेकवीत सरकतीय.

पोरा एकदाच तू,
गावाकडं येऊन जा.
सून नातवाला दाखवून
वाट मोकळी करून जा !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...