🍁 आतापर्यंत आपण सर्वांच्या तोंडून एकच ऐकत आलो आहोत कि आम्ही ईश्वराला, देवाला मानतो. परंतु ईश्वर मानायचा कि जाणायचा हे प्रथम निट समजले पाहिजे; आणि एकदा का हे समजले कि त्या ईश्वरा प्रती नक्कीच प्रेम , समर्पण वाढेल.
🍁 ईश्वराला, देवाला मानणारे त्याला कधीच जाणून घेऊ शकत नाही. कारण मानणे हा पर्याय वाचक शब्द आहे तर जाणणे हा आला ठामपणा. जे नाते आपल्या आयुष्यात नसते ते आपण मानतो,जसे कि कुणाला भाऊ मानणे कुणाला बहिण मानणे इ. जे नाते नाही त्या नात्याला आपण मानतो. आई वडिलांना आपण मानतो हा शब्द वापरतो का? नाही ना? आई आहे हे माहित आहे याची जाण आहे, वडील आहे याची जाण आहे त्याचप्रमाणे ईश्वर मानायचा नाही तर जाणायचा असतो. आता जाणायचा कसा हा प्रश्न पडला असेल ना?
🍁 ईश्वर फक्त एखादी छबी किंवा आकृती नाही कि आपण पाहू शकतो पण हो त्या ईश्वराची जाणीव होऊ शकते त्या ईश्वराची अनुभूती घेऊ शकतो. ते सुद्धा ज्याच्या त्याच्या समर्पणावर अवलंबून असते, त्याच्या प्रेमावर अवलंबून असते. ईश्वराला मानतो असं म्हणणं हेच मुळात चुकीची आहे.
🍁 खुप आधीपासून कुणी तरी सांगितले आहे की देव, ईश्वर आहे म्हणून मानतो की देव आहे. मानण्यासाठी काहीच करावं लागत नाही; मात्र ईश्वराला जाणून घेण्यासाठी मात्र स्वतः ला प्रयत्न करावे लागणार आहेत हे नक्कीच. सगळे म्हणतात देव, ईश्वर आहे म्हणून मानतो हे झाले मेंढरां सारखे एक चालला आहे त्याच्या पाठोपाठ सगळे चाललेत
कुणाला काही माहित नाही आपण काय करतो आहोत फक्त भटकंती चालू आहे.
🍁 ईश्वराला जाणून घेण्याचा, अनुभूती घेण्याचा विषय आहे.मानण्यात त्याची कृपा संपून जाते, मानण्यात त्याची अनुभूती येण्याची शक्यता वाटतच नाही. याउलट जे ईश्वराला खऱ्या अर्थाने जाणून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांनाच अनुभूती येऊ शकते. कारण जिथे मानायला सुरुवात होते तिथेच दोन भाग आले , दुजा भाव आला;जसे भाऊ मानतो अथवा बहीण मानतो आणि मानतो का तर नाही म्हणूनच ना आणि म्हणून त्याचे स्पष्टीकरण नाही व ज्याचे स्पष्टिकरण आहे तो आहेच तर ते मानण्याचे नाही तर जाणण्याचे.
🍁 निट पाहिले तर लक्षात येईल जे जे ईश्वर मानतात त्यांच्यावर कधीही त्याची कृपा दिसणार नाही परंतु ज्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला अथवा जाणून घ्यायचे आहे त्यांच्या वर कृपा होईल. आता हेच पहा प्रेम आहे हे मानले तर काय प्रेम आहे हे कळणार नाही; परंतु प्रेम जाणून घेतले तर प्रेम काय आहे हे कळेल फक्त मानण्याने प्रेमाची अनुभूती येऊ शकते का नाही ना? तसेच ईश्वराला मानण्या पेक्षा त्याला जाणून घेतले तर त्याची कृपा काय आहे ते कळेल त्याचे प्रेम कळेल त्याचे आशीर्वाद कळतील आणि जे ईश्वराला जाणतात त्यांची बाहेरची भटकंती बंद होऊन जाते. याउलट जे ईश्वराला फक्त मानतात त्यांची आयुष्य भर भटकंती ही होतच राहते. जे मानतात ते सतत ईश्वराच्या शोधात कुठे ना कुठे भटकत राहतात फिरत राहतात. याउलट ज्यांना जाणून घ्यायचे आहे ते एका जागी बसून स्थिर दिसतील. हिच खरी गोष्ट आहे जाणण्याची व मानण्याची. वर्षानुवर्षे चुकिच्या भ्रामक कल्पना घेऊन आपण ईश्वराला इतरत्र शोधण्याचा प्रयत्न करत राहतो म्हणून तर त्याची भेट होते नाही; त्याची कृपा दिसत नाही. त्या ईश्वराचा शोध घेत इकडे तिकडे फिरायला तो काय कुठे लपून बसलेला आहे का? आपण निट डोळे उघडे ठेवून पाहिले व त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर सर्वत्र त्याचेच दर्शन होईल व त्याची अनुभूती घेता येईल
🍁 जे त्या ईश्वराला जाणून घेतात त्यांची सततची धावपळ थांबून जाते त्यांची मनाची अवस्था स्थिर होते. त्यांच्या विचारां मध्ये स्थिरता येते, जीवन च स्थिर होते व जो शोध असतो तो संपून जातो. अन्यथा शोध , भटकंती कशामुळे आहे? त्या ईश्वराला जाणून घ्यायचे असेल तर एका जागी थांबावे लागेल आणि थांबण्यातच तर तो आहे याची जाणीव होईल. जाणीव होईल त्याच्या कृपेची, त्याच्या सावलीची, त्याच्या प्रेमाची परंतु मानण्यामुळे होते ती फक्त भटकंती आयुष्य भर भटकंती. याउलट जे त्याला जाणून घेण्यासाठी थांबले त्यांच्या नजरेत, वागण्यात स्थिरता दिसेल त्यांचे आयुष्य छान, आनंदी झालेले दिसेल.
🍁 आता आपणच ठरवायचं आहे त्या ईश्वराला फक्त मानायचे का जाणून घ्यायचे आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा