दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची या दिवशी पूजन करतात. येथे ‘धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी ! अन्यथा अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते. या दिवसाला बोलीभाषेत ‘धनतेरस’ असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात.
धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्णविकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते.वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा आयव्यय (जमाखर्च) द्यायचा असतो.
ll धन्वंतरी जयंती ll
औषधं जगत् सेतु सत्यधर्मपरायणा
श्री विष्णुसहस्त्रनाम
आयुर्वेदाचे प्रवर्तक आणि अवतार काशीराज धन्वंतरी होय. शल्यतंत्र म्हणजे रोग बरे करणाऱ्या शस्त्रक्रियेची प्रक्रिया ज्या आयुर्वेदात सांगितली आहे, त्या आयुर्वेदाचे मुख्य उपदेशक. काशीच्या प्राचीन पुराणकालीन राजवंशातील आयुर्वेदाचे आचार्य असलेला धन्वंतरी राजा होय. हरिवंश, विष्णुपुराण, अग्निपुराण, वायुपुराण, भागवत इत्यादिकांप्रमाणे भगवान विष्णूच्या अंशापासून निर्माण झालेला धन्वंतरी हा देव काशीच्या राजवंशात वाराणसी येथे मनुष्यरूपाने अवतरले. त्यानीच आयुर्वेद प्रवृत्त केला अशी समस्त आपल्या हिंदूची धारणा व श्रद्धा आहे. हरिवंशात ही वंशपरंपरा अशी सांगितली आहे.(१) काश, (२) दीर्घतपा, (३) धन्व, (४) धन्वंतरी, (५) केतूमान, (६) भीमरथ (७) दिवोदास. काही पुराणांत दिवोदासालाही धन्वंतरी म्हटले आहे.
*पौराणिक व लोकथेतील संदर्भ *
धन्वंतरीचा जन्म असं देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला ती कथा अशी पूर्वी महर्षी दुर्वासांच्या शापाने देवांची सर्व संपदा समुद्रात बुडून गेली. म्हणून मंदार पर्वताची रवी करून त्याला वासूकीनागाच्या दोरीच्या साह्याने देवदैत्यानी सागर मंथन केले त्यातून जी चौदा रत्नन प्रगटली त्यामधले एक रत्न म्हणजे भगवान विष्णूंचे अंश असणारे वैद्यांचे देव अर्थात धन्वंतरी!हातात जळू ,शंख ,चक्र आणि अमृतकुंभ धारण करणारे धन्वंतरी वैद्यकशास्त्राचे परमेश्वर म्हणून ओळखले जातात.
चार हात असलेला भगवान धन्वंतरि एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्या हातात ‘जळू’, तिसर्या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन जन्माला आले. (समुद्रमंथनातून बाहेर आला.) या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरि करतात अशी हिंदुची धारणा व श्रद्धा आहे.
वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृततत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने प्रतिदिन खाल्ली, तर व्याधी होण्याची शक्यता नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे; म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
सुश्रुतसंहिता या सुप्रसिद्ध मूलभूत आयुर्वेद ग्रंथाचा कर्ते सुश्रुत हे आचार्य असून त्यांना व त्यांच्या बरोबर अनेक आचार्यांना मनुष्यरूपाने अवतरलेल्या काशीराज धन्वंतरी देवाने हा आयुर्वेद उपदेशिला, असे त्यामध्ये म्हटले आहेत. म्हणजेच सुश्रुतसंहिता हा धन्वंतरीच आयुर्वेद आहे.
वर उद्धृत केलेल्या पुराणांमध्ये संक्षेपाने वा विस्ताराने समुद्रमंथनाची कथा आली आहे. त्या कथेचे तात्पर्य असे : अमरत्व प्राप्तीकरिता देव व दानव यांनी मिळून क्षीरसागराचे मंथन केले. मंथन करीत असता लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, चंद्रमा इ. चौदा रत्ने निघाली. त्यांपैकी एक धन्वंतरी देव हा होय. एका हातात अमृतकलश घेऊन देव प्रकट झाले. भगवान विष्णूनीं वर दिला की, तू मनुष्यजन्म काशीराजाच्या घराण्यात घेतल्यावर जन्मतःच तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील तुला यज्ञामध्ये यजमान देव समजून आहुती देतील, आणि तू अष्टांग आयुर्वेदाचा प्रवर्तक होशील.
स्वयंभू ब्रह्मदेवाने आयुर्वेद निर्मिला. ही आचार्यवंशाची परंपरा अशी : ब्रह्मा–प्रजापती–अश्विदेव–इंद्र–भरद्वाज–धन्वंतरी.
धन्वंतरीच्या आयुर्वेदाचे आठ भाग पुढीलप्रमाणे आहेत : (१) काय (शरीरविज्ञान), (२) बाल (बालवैद्यक), (३) ग्रह (भूतपिशाचादिकांपासून झालेल्या पीडांचे वैद्यक), (४) ऊर्ध्वांग (शिरोभागात व तेथील इंद्रियांत होणाऱ्या विकारांचे वैद्यक) (५) शल्य (शस्त्राघाताची चिकfत्सा) (६) द्वंष्ट्रा (विषचिकित्सा), (७) जरा (आरोग्य वाढविणारे रसायन), (८) वृष (वाजीकरण).
धन्वंतरीच्या नावावर आणखी दहा–बारा ग्रंथ संस्कृतमध्ये उपलब्ध आहेत परंतु त्यांच्या प्राचीनतेबद्दल निश्चितपणे काही सांगता येत नाही. भगवान धन्वंतरी यांच्या नमनाचा
ll श्लोकll
ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतरये ।
अमृतकलशहस्ताय सर्वभयविनाशाय सर्वरोगनिवारणाय
त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूपाय
श्रीधन्वंतरीस्वरूपाय श्रीश्रीश्री औषधचक्राय नारायणाय नमः।।
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या दिवशी वस्त्रालंकाराची खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून साफसूफ करतात व पुनश्च योग्य ठिकाणी ठेवतात. कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात, यथाशक्ती दान करतात.
या दिवशी सायंकाळी तेलाने भरून एक दिवा प्रज्वलित करावा व नंतर त्याची गंधादी उपचारांनी पूजा करून घराच्या दाराजवळ, धान्याच्या राशीजवळ ठेवतात. हा दिवा रात्रभर जळत राहणे आवश्यक आहे.
धन्वन्तरी जन्मोत्सव – या दिवशी आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वन्तरी याचा उत्सव वैद्यकाची प्रगती होण्याकरिता वैद्य लोक करतात. हा देवांचा वैद्य व विष्णूचा एक अवतार मानतात.
दुर्वासाने इंद्रास शाप देऊन वैभवहीन केले. तेव्हा ते पुनरपि मिळविण्याच्या हेतूने देव-दैत्यांनी क्षीरसागराचे मंथन केले. त्यातून चौदा रत्ने निघाली. त्यांत सुधर्मात्मा व आयुर्वेदमय दंडकमंडलुसहित असा धन्वन्तरी हातात अमृतकलश घेऊन बाहेर पडला. हा विष्णूचा अवतार असून सर्व वेदांत निष्णात व मंत्रतंत्रातही विशारद होता. याला आदिदेव, अमरवर, अमृतयोनी, सुधापाणी, अब्ज इत्यादी अन्य नावेही आहेत.
याच्या अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार अमृतरूपाने देवांना प्राप्त झाले. ते जरामृत्युरहित बनले. त्यामुळे त्याला देवांचे वैद्यराजपद लाभले.
भागवत पुराणात विष्णूच्या चोवीस अवतारांत धन्वन्तरीचा समावेश केला आहे. विष्णूच्या अवताराची प्रतिष्ठा लाभल्यामुळे वैष्णवमूर्ती-समुदायात धन्वन्तरीच्या मूर्तीला स्थान मिळाले. याच्या प्राप्तीसाठी ईशान्य दिशेकडे मुख करून सायंप्रार्थना करावी. धन्वन्तरीने चिकित्सेचे ज्ञान भास्करापासून प्राप्त केले आणि भास्कराच्या आयुर्वेदसंहितेच्या आधारे ‘चिकित्सा तत्त्वविज्ञान’ नामक ग्रंथ रचला. तेव्हापासून आयुर्वेदाचा प्रसार सुरू झाला. फल – आरोग्य व दीर्घायुष.
दीपावलीला जोडून आश्विन वद्य त्रयोदशीला येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुवर्णालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती.
हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते.
या दिवसाला बोलीभाषेत ‘धनतेरस’ असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात.
धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा आयव्यय (जमाखर्च) द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेली संपत्ती प्रभुकार्यासाठी व्यय केल्यास सत्कार्यात धन व्यय झाल्यामुळे धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते. धन म्हणजे पैसा. हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला आणि वर्षभरात पै-पै करून जमा केलेला असावा. या पैशाचा न्यूनतम १/६ भाग प्रभुकार्यासाठी व्यय करावा, असे शास्त्र सांगते.’
धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन
वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृततत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने प्रतिदिन खाल्ली, तर व्याधी होण्याची शक्यता नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे; म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
नवनाथ दत्त मंदीर सावनेर जिल्हा नागपूर
यमदीपदान
प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकवता येत नाही; पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते, केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।
अर्थ : धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी.
भारतात प्रत्येक वर्षी अश्विन मास अमावस्या तिथीला दिव्यांचा सण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी घराघरात देवी महालक्ष्मीचे पूजन केले जाते. त्याचबरोबर श्रीगणेश आणि देवी सरस्वतीचे देखील पूजन केले जाते. लक्ष्मीसोबत श्रीगणेश आणि देव सरस्वतीच्या चित्रामध्ये काही खास संदेश दडलेला आहे.
ज्योतिषाचार्यांच्या म्हणण्यानुसार दिवाळीला लक्ष्मीसोबतच सरस्वती आणि श्रीगणेशची पूजा देखील का केली जाते हे आपण जाणून घेऊया.
महालक्ष्मी ही धनाची देवी असून सरस्वती ज्ञानाची देवी आहे, तर गणपती बुध्दीचे देवता आहे.
याचा अर्थ असा की, आपण फक्त धनाचेच अवाहन करु नये, धनासोबतच ज्ञान आणि बुद्धीला देखील बोलवावे. धन आले तर ते आपल्या ज्ञानाने सांभाळा आणि बुध्दीचा उपयोग करुन त्याचा उपयोग करा. असे केल्याने लक्ष्मीचा स्थायी निवास होईल.
म्हणूनच आपण सर्वजण दिवाळीला लक्ष्मीला प्रार्थना करतो की, लक्ष्मीने आपल्या घरी यावे आणि सोबत विद्या आणि बुध्दीला देखील आणावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा