किती खर वाक्य आहे हे!!!! जसे विचार तसेच आचार घडतात . आपल्या मनात जे विचाराचे तरंग उठतात त्या प्रमाणेच आपण react होतो.😉 म्हणुनच तर काँसिलर सांगत असतात, विचार कसे ठेवा कसे positive रहा. 😄
अशीच एक ऐकलेली गोष्ट आठवली. ही गोष्ट बाहेरच्या देशातील आहे.
एका गावात एक कुटुंब राहायला येते. शहरातून .साहजिकच तिथले वातावरण व गावातले वातावरण यात जमीन अस्मानाचा फरक असतो. कस असत ना !!! गावात फक्त प्रॉडक्ट बनू शकते.ते विकले जात नाहीचांगल्या भावाला. त्यासाठी मार्केट असलेलीच जागा पाहिजे. म्हणच तर आहे' "पिकते तिथे विकत नाही'' .त्या कुटुंबातला कुटुंब प्रमुख हा अतीशय कल्पक डोक्याचा असतो. त्याच्याकडे बिझनेस पुढे नेण्याच्य्या बऱ्याच भन्नाट कल्पना असतात. तसेच गुण त्याच्या छोट्या मुलामधे ही उतरलेले असतात. एक दिवस तो या मुलाला किती business tacts हा मुलगा वापरून बिझनेस करू शकेल हे अजमावयाच ठरवतो.
तो एक दिवस मुलाला एक दोन मीटर एवढ कापड देतो आणि सांगतो. हे मार्केट मधे जाऊन विकून ये. मुलगा विचारतो हे किती rs पर्यंत विकले जाईल.?? तेव्हा वडील म्हणतात की दोन डॉलर एवढी तरी किंमत आहे पण तू ते कापड 20 डॉलर पर्यंत विकून ये.😀 मुलगा ते कापड घेऊन त्याला चांगली इस्त्री करतो. वेगवेगळ्या गावात जाऊन संध्याकाळ पर्यंत प्रयत्न करून ते कापड 20 डॉलर ला विकून आणून देतो. आता वडील काही दिवसानी अजून एक कापड देतात तसेच दोन मीटरचे, तू ते 200डॉलर ला विकून दाखव अस सांगतात. तो मुलगा ते कापड घेतो छान इस्त्री वगैरे करतो आधीच्या सारखी त्या कापडाला. आणि एक त्याचा मित्र असतो छान ड्रॉइंग काढणारा त्याच्या कडे जातो आणि त्यावर एक छान कार्टून काढून घेतो व एका इंग्लिश मिडीयम शाळे समोर शाळा सुटायच्या वेळेस जाऊन ते कापड विकायला धरतो. येणारी पालक मंडळी ते कार्टून काढलेले कापड बघत असतात. शाळेतली मुलं ते एवढ सुंदर कार्टून बघतात आणि आई बाबांच्या मागे ते कार्टून हव म्हणून मागे लागतात. एक बाई याच्याकडे येते. आणि किंमत विचारते तो 200 डॉलर किंमत सांगतो तिथे त्या शाळेत चांगली परिस्थिती असलेलीच मुल शिकायला येत असल्यामूळे त्यांना 200 डॉलर काहीच वाटत नाहीत. ती हसत हसत त्याला तेवढे डॉलर देते. मुलगा ते rs घेऊन आनंदाने बाबांना आणून देतो आणि काय ट्रीक वापरली ते सांगतो.
दोन डॉलर चे कापड थोडी मेहनत त्यावर घेऊन दोनशे डॉलर मिळवले असे दिसल्यावर बाबा त्याला पुन्हा तसेच कापड देतात आणि सांगतात की आता तुला याचे 1200डॉलर मिळवायचे आहेत. मुलगा खरच हुषार असतो. आणि बाबा पेक्षा जास्त कल्पक असतो. तो शहरात जायला निघतो, तेव्हा एके ठिकाणी सिनेमाचे शूटिंग चाललेले असते व खूप गर्दी असते शुटींग पहायला. हा त्या गर्दीतघुसतो लहानच असल्यामुळे घुसत घुसत तिथल्या हिरॉईन पर्यंत पोचतो व तीच्या समोर कापड धरतो आणि सांगतो तुमची साइन द्या यावर . ऑटोग्राफ प्लीज अस म्हंटल्यावर
ती कौतुकाने त्याच्या कडे पहायला लागते 😍🥰 आणि त्यांच्यावर झोकात सही करते. तो ते कापड घेऊन त्याच गर्दी समोर त्या सही केलेल्या कापडाची किंमत बाराशे डॉलर सांगतो या हिरॉईनने सही केलेले कापड अशी ऍडव्हर्टाईज करायला लागतो. लोकांच्या ते कापड घेण्यासाठी उड्या पडतात. तो ते कापड बाराशे डॉलरला विकून टाकतो आणि बाबाला बाराशे डॉलर आणून देतो आणि काय केल ते सांगतो.
तेव्हा बाबा त्याला सांगतो हे निर्जीव कापड सुधा तू तुझ्या अक्कल हुशारीने जास्त भावाला विकून येऊ शकतोस तर तुझे हे सजीव शरीर आहे त्यासाठी तुझे डोके वापर तुझ्या अंगात अनेक क्लुप्त्या आहेत त्या सगळ्यांचा वापर कर.
आपल्याकडे इतक्या चांगल्या गोष्टी आसतात पण आपण कस आहे ना त्या न बघता दुसऱ्याने ठेवलेली नावेच बघतो. एखादा जरी आपले पाय खेचत असेल आणि दहा जण आपल्या पाठीशी असतील तरी त्या एकाची निगेटिव्ह एनर्जी आपण जास्त आहे अस समजतो. मी स्वतः सुधा याचं अनुभवातून किती तरी वेळा गेली आहे की पटकन आपण निराश होतो आणि आपली विचारांची दिशाच बदलते. त्यासाठी च न्युट्रल thinking क्रिया कामी येते. जे आपल्याला पाठिंबा देत आहेत त्यांच्याकडेच पाहायचे. अस ठरवायला लागते. कारण स्वतः मधे तेवढी कुवत नसेल तर पाडण्यासाठी कुवत लागत नाही. त्यामुळे छुपे शत्रु हेरून त्यावर मात करता यायला पाहिजे. खरच तर आहे सोच क्या बदली जिंदगी बदल डाली.
सौ माधुरी बर्वे (तारापूर).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा