मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

2347.सायलेंट मोड

शीर्षक वाचूनच समजले असेल की,मला काय सांगायचे आहे. हल्ली समाजामध्ये आजुबाजूला बघतोय, प्रत्येक जण मल्टी टास्किंग मध्ये गुंतलेला. सकाळी एका ठिकाणी असेल तर दुपारी किंवा संध्याकाळी तो आपल्याच देशात असेल की नाही याची शाश्वती नाही. नोकरीत तर विचारू नका,काही जणांच्या दिवसभर मीटिंग, व्यवसाय,इतर क्षेत्रे, सगळीकडे नुसती धावपळ. प्रचंड दमछाक. त्यात भरीसभर सोशल मीडियावर जाणारा वेळ. अर्थार्जनासाठी व्यस्त असणे समजू शकतो.
माणसाने वेगवेगळ्या अँक्टिव्हिटीजमध्ये प्रमाणापेक्षा जास्त व्यस्त रहाण्याची खरंच गरज किंवा आवश्यकता आहे का? शरीराच्या, मानसिकतेच्या,
स्वतःच्या आनंदासाठी,
समाधानासाठी व्यस्त असावे हे जरी खरे असले तरी काही मंडळी दमछाक होईपर्यंत स्वतःला अँक्टिव्हिटीजमध्ये इतके व्यस्त करून घेतात की त्याचा त्यांच्या डेली रूटीनवर,आरोग्यावर निश्चितपणे विपरीत परिणाम होतो. 
हे मान्य आहे की,माणूस परिस्थितीनुसार व्यस्त रहातो. व्यस्त असायलाच हवे. काही वेळेस अती व्यस्त रहाण्याची मजबूरी असते. इंग्रजीत एक म्हण आहे, Empty mind is devil's workshop. माणसाने किती अँक्टिव्हिटीज मध्ये स्वतःला व्यस्त करून घ्यावे यावर थोडा विचार करावयास हवा.
तुमच्या ओळखी पैकी कोणालाही कॉल करा आणि म्हणा,कसं चाललंय तुझं?? उत्तर येईल प्रचंड बिझी,वेळच नाही आहे. प्रतिष्ठित डॉक्टर्स देखील त्यांच्या वैद्यकीय व्यवसायामध्ये व्यस्त राहून प्राणास मुकले आहेत. थोडासा सायलेंट मोड हवा. 
मान्य आहे की सद्ध्याची बाह्य परिस्थिती ही आपल्या जीवनास मजबुरीने फास्ट मोड वर नेते आहे तरीही त्याला किती फास्ट ठेवायचे हे आपल्या हातात आहे,असते. जाणीवपूर्वक याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दीर्घकालीन परिणाम विपरीत होण्याची शक्यता असते. 
समाजात बघतोय, सतत काही ना काही उपक्रम, इव्हेंट्स,प्रोग्रॅम्स चालू असतात. या 2 दशकांमध्ये एवढे प्रमाण वाढले आहे की प्रत्येक वेळी आपण तेथे उपस्थित नाही राहू शकत.
काहीजण मानसिक आनंद, स्ट्रेस बस्टर, काही जण आलेला एकटेपणा, नेम अँड फेम साठी, समाजातील स्टेट्स साठी स्वतःला व्यस्त करून घेतात. 
कधी कधी असेही वाटू शकते की, या सगळ्या गोष्टी आपण का करतोय? एवढी धावपळ कशासाठी?? यातून आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे?? पैसेही खर्च होतात, शरीरही थकते. आपण स्वस्थ राहू शकत नाही का?? 
असे जर प्रश्न मनात आले तर आत्मपरीक्षण करून स्वतःला सायलेंट मोड वर ठेवणे आवश्यक आहे. कायमस्वरुपी नाही पण काही काळापुरते सायलेंट मोड वर असायला हवे. 
एखाद्या सभागृहात, नाट्यगृहात गेले की आयोजक घोषणा करतात,तुमचे मोबाईल्स सायलेंट मोड वर ठेवा. ते एवढ्याचसाठी की, सर्वांना त्या प्रोग्राम किंवा इव्हेंटचा आनंद घेता यावा. त्या इव्हेंटमध्ये मोबाईल रिंगचा व्यत्यय नको म्हणून. फोकस असतो प्रोग्राम चांगला होणे. 
आपल्या आयुष्याचेही असेच आहे,गरजेनुसार, आवश्यकतेनुसार आपल्याला आवश्यक असतो सायलेंट मोड
कुटुंबाच्या स्वास्थासाठी, परिस्थितीनुसार आवश्यक असतो सायलेंट मोड 
गैरसमज झाल्यावर काही काळ जाऊ द्यावा लागतो,अशा वेळी आवश्यक असतो सायलेंट मोड
वादग्रस्त परिस्थिती,वादविवाद टाळण्यासाठी आवश्यक असतो सायलेंट मोड
सायलेंट मोड म्हणजे मौन पाळणे नव्हे. इथे फोकस असतो मन:शांती. स्वतःला स्वतःची स्पेस देणे म्हणजे सायलेंट मोड.
कोणत्याही तणावात्मक परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी आवश्यक असतो सायलेंट मोड 
समाजातील किंवा सोशल मीडियावरील,काही ग्रुप्समध्ये कधीतरी,कोणत्यातरी इव्हेंटमध्ये काही कारणांवरून वाद होतात,अशा वेळी कोणीतरी एकाने सायलेंट मोड वर जाणे आवश्यक असते. परिस्थिती निवळण्यासाठी आवश्यक असतो सायलेंट मोड
काही वेळा आपल्याला माहित असते की दुसरा चुकलेला आहे, तरी पण स्वतःच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक असतो सायलेंट मोड.
कधी कधी काही गोष्टी पटत नाहीत आणि त्या व्यक्तही करू शकत नाही. अशा वेळी नातेसंबंध, मैत्री अबाधित, सुरळीत रहाण्यासाठी आवश्यक असतो सायलेंट मोड
काही लोकांना तात्विक वाद घालण्याची इतकी सवय असते,मी किती टॅलेंटेड आहे हे जनमानसात दाखवून द्यायची सवय असते तसेच काहींना माझंच खरं म्हणण्याची बाय डिफॉल्ट सवय असते,अशा वेळी आपण सायलेंट मोड मध्ये असणे हिताचे. स्वतःची एनर्जी का खर्च करा?? हल्लीच्या काळात हे पटणार नाही,इगो आडवा येतो. 
कधी कधी सायलेंट मोड वर असणाऱ्या किंवा दिसणाऱ्या व्यक्ती आतून स्ट्रॅटेजिक असतात तो भाग वेगळा. काही मंडळी वरून जरी सायलेंट मोड वर दिसत असली तरी त्यांच्या अंतर्मनात काय खळबळ चालू असते याचा थांगपत्ता लागू न देण्यात खूप माहीर असतात. माझे आजोबा म्हणायचे (वडिलांचे वडील) कमी बोलणाऱ्यांपासून 4 हात दूर रहा. त्यांच्या मनाचा ठावठिकाणा घेता येत नाही. बँकेतील 40 वर्षाचा अनुभव. 
सोशल मीडियावर काही जणांना मी किती बुद्धिवादी आहे, टॅलेंटेड आहे हे सांगण्याची खुमखुमी असते,वाद घालण्यात पण ही मंडळी खरंच वरचढ असतात,दुसऱ्यांना कन्व्हिन्स करण्यात त्यांनी खूप स्किल अवगत केलेले असते. तुझेच बरोबर आहे म्हणा. पुढे चालू लागा. अशा वेळी सायलेंट मोड वर गेलेलं बरं. एनर्जी खर्च करू नका. 
सोशल मीडियावर वादग्रस्त,प्रक्षोभक पोस्ट करणारी बरीच मंडळी आहेत. त्यांना खरंच दीर्घकाळात मन:शांती मिळते का?? हा चर्चेचा विषय होऊ शकतो. 
ध्यानधारणा (मेडिटेशन) म्हणजे सायलेंट मोड
विपश्यना म्हणजे सायलेंट मोड.काही व्याधींना कंट्रोल करण्यासाठी सायलेंट मोड. ( आरोग्य मेन प्रायोरिटी )
आता थोडं लाईट मोड वर नेतो. एवढे सगळे सायलेंट मोड सांगितले पण नवरा बायकोच्या पेल्यातील वादळात नेहमी कोण सायलेंट मोड वर कोण असते?? ते तुम्हीच ठरवा. 
सायलेंट मोड वाचल्यावर प्रश्न मनात येतो तो म्हणजे - मग आम्ही नेहमी मूग गिळून गप्पच रहायचे का? असा प्रश्न साहजिकच तुमच्या मनात येऊ शकतो याची जाणीव मला आहे.
Getting involved in too many things, sometimes invites frustration. So reduce or minimise the activities in order to get Peace of mind. Everything counts at the last lap of the life. 
ज्या ज्या वेळी राग येतो,चिडचिड होते,स्ट्रेस, बदला घेण्याची वृत्ती,वाद घालण्याची वृत्ती कृतीत येते,ताणतणाव ज्या ज्या प्रमाणात असतो त्या त्या प्रमाणात आपलं शरीर कोर्टिसोल नावाचा हार्मोन रिलीज करत असते की जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. कोर्टिसोल हार्मोन निर्मितीची अजून बरीच कारणे आहेत. आतून शरीराची बॉडी केमेस्ट्री समजून घेणे आवश्यक आहे हे या लेखाच्या अनुषंगाने सांगावे वाटते. 
Health on top priority यासाठी ही पोस्ट.
दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच माझी सदिच्छा. आनंदी रहा,आरोग्यमय रहा. 
लेखातील विचार हे तुमच्या मतांशी,विचारांशी सहमत असतीलच असे नाही

तुमचाच PK 
प्रमोद कुलकर्णी 
पुणे 
शनिवार,
18/10/2025
9552582361

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...