शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

2315. प्रेमबीज

    साधारणता दहा वर्षापुर्वीची गोष्ट. त्या काळी लाईट नसतानाही होणारा उकाडा हा आता लाईट असतानाही होणा-या उकाड्यापेक्षा ब-याच प्रमाणात कमी असायचा..पावसाळ्यात लाईट कमी आणि लोड शेडींगमुळे होणारा अंधार जास्त असायचा.. 
एकदा असाच पहाटे पाच वाजता माझा फोन वाजला..
"हॅलो.. डॉक्टर.. लवकर या.. एक खुप एर्मजंन्सि आहे.. अपघात झालाय.." तिकडुन नर्सचा अावाज आला..
"हम्म.. आता.. तिथे मी येईपर्यंत सांभाळा..मी लगेच निघतो.. ठेवा.. बाय..." मी सांगितल..
सकाळी पाच वाजता अालेल्या त्या फोन ने माझी झोप उडाली... 
"पिहु.. मी निघतो ग.. अर्जंट हॉस्पिटलला जाव लागतय..बाय.."
अंगावर कपडे चढवत असतानाच मी माझ्या बायकोचा निरोप घेतला...
"हम्म... नीट जा.." ती झोपेतच होती..
मी गाडीत बसलो.. जोरात गाडी हॉस्पिटलच्या दिशेने निघाली.. मला पेशंटबद्दल काहीही माहिती नव्हते.. ईतक्या पहाटे अालाय म्हणजे काहीतरी ईमरजंसि असावी म्हणुन बाकी विचारण्यात वेळ न घालवता मी पटकन निघालो होतो...अवघ्या दहाच मिनीटात मी पोहोचलो..
हॉस्पिटल बाहेर नातेवाईकांची बरीच गर्दी होती.. मला बघुन त्यांच्या जिवात जीव आला.. तेवढ्यात मला रमेश दिसला.. एका गावात व्हिजिट ला गेलेलो तेव्हा त्याच्याशी माझी आेळख झाली होती.. आणि त्यानंतर ही आेळख चांगल्या मैत्रित बदलली होती..
"तु ईथे कसा.. नातेवाईक आहे का कोणी तुझा..??" मी आत जाता जाता त्याला विचारल..
"डाक्टर साहेब.. बर झाल तुम्ही लवकर आला.. त्याला वाचवा.. पोरग हाय माझ ते.." डोळ्यातील अश्रु अडवत तो रडक्या आवाजात बोलला..
"बर...तु शांत हो.. बघतो मी काय ते..." मी दोन सेकंद थांबुन त्याला धीर दिला..
आणि तसाच पटकण आत गेलो.. 
आतल दृश्य मन पिळवटुन टाकणार होत.. 
त्याला ईतका जबरदस्त मार बसला होता की त्याच फुप्फुस आता काहीच काळात छातीच्या बरगड्या तोडुन बाहेर येणार अस दिसत होत.. 
बाकी कुठेही लागल नसल तरी छातीला जबर मार बसला होता.. 
त्यात बरेच रक्तही गेल होत.. 
फुफ्फुसाची हलचाल पुर्ण दिसत होती..
आणि तो मात्र बेशुध्द होता..
मी सगळ तपासुन लगेचच रमेश ला आत बोलावुन घेतल..
"हे बघ.. खुप कॉमप्लिकेटेड आहे हे.. आपल्याला लवकरात लवकर मोठ्या हॉस्पिटलात जाव लागेल त्याला घेऊन..आपल्या ईथे होईल तेवढ करुन लगेच त्याला मोठ्या दवाखान्यात आपण हलवुया.. जराही उशीर करुन चालणार नाही.." मी पुढची कल्पना त्याला दिली..
"तुम्ही सांगाल तस आपण करु... पण..." तो दोन मिनिट गप्प बसला...
"अरे काय झाल ??... लवकर सांग.." मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितल...
"माझ्याकडे पैक बी नाय आता.. हे समद समजल तसा लगेच निघालो मी. व्हत तेवढ पैक घिवुन..." 
"ईतकच ना...तु का काळजी करतो.. मी आहे न.. मी पण येतो सोबत..कोणालातरी अॅमब्युलन्स बोलवायला सांग.. तोवर मी बाकीच बघतो.."
अस सांगुन मी बाकी फॉरमॅलिटी पुर्ण केल्या.. व्यवस्थित ड्रेसिंग करुन महत्वाच सामान सोबत घेऊन आम्ही निघालो होतो.. 
३१ डिसेंबर ची रात्र.. त्यात मित्राची बाईक.. जिच्या हेडलाईट बंद होत्या.. अशी गाडी घेऊन सोहम म्हणजे रमेशचा मुलगा रात्री पार्टीवरुन घरी निघाला होता.. मित्राने नको नको म्हणत असतानाही हट्टकरुन तो निघाला.. पण रस्त्यावर अालेला मोठा दगड अंधारात न दिसल्याने तोल जाऊन गाडीसकट तो एका बैल गाडीला जाऊन ठोकला होता..आणि बरोबर छातीवरच मार बसला...
थोड्याच वेळात आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो..
माझा मित्र डॉक्टर देशमुखने पेशंटला बघितल..
सगळ चेकअप करुन ते माझ्याजवळ आले..
"तुला कळतय का काय आहे ते.. ह्या कंडिशनमध्ये त्याला वाचवण खुप कठिण आहे रे.. यु क्नो व्हेरी वेल.." डॉ. देशमुख काळजीच्या सुरात बोलत होते..
"यस.. बट प्लिज.. ट्राय युर बेस्ट..एकुलता एक मुलगा आहे रे त्यांचा.. प्लिज काहीही कर.. त्यांचे खुप होप्स आहेत.." 
"आेके.. आय विल ट्राय.. तु एक काम कर.. लवकरात लवकर आे पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप मिळतोय का बघ.. रक्त खुप गेलय.. रक्त नक्कीच द्याव लागेल .. सिस्टर ने ब्लडसॅमप्ल घेतल.. सो हरी अप .. आणि एकदा त्याच्या घरच्यांशी बोलुन घेऊयात.."
रमेशला आम्ही आत बोलावल.. डॉ. देशमुख बोलत होते..
"मिस्टर रमेश.. आपण आपले पुर्ण प्रयत्न करतोय.. आपल्याला लगेचच आॅपरेशन कराव लागेल.. बाकी सगळी कल्पना तुम्हाला पहिलेच दिलेली आहे.. तर आपण प्रयत्न करुया.. बाकी सगळ देवाच्या हातात.."
"साहेब मला तुमच्यावर ईश्वास हाय.. वाटल ते करा.. मी काईबी तरास न्हाय व्हवु द्यायचो बगा तुम्हाला.. जर माझ्या पोराला काय झाल तरी.." शेवटच वाक्य बोलतानी रमेश ने एक आवंढा गिळला ...
ईतक एेकुन डॉ. देशमुख आॅपरेशनसाठी आत गेले.. मी सुद्धा रक्त आणण्यासाठी ब्लड बॅंकेत गेलो.. पण तिथे जाऊन काही उपयोग नाही झाला...कारण रक्त होत.. पण त्यासाठी लागणारे पुरेसे पैसे आमच्याकडे नव्हते.. सगळ घाईतच झाल होत.. असलेले पैसे आैषध आणि बाकी गोष्टीसाठी खर्च झाले.. आणि उरलेल्या पैशातुन ब्लड विकत घेण कठिणच होत..
आता मात्र मला काही सुचेना.. माझी तल्लख बुध्दी काम करेनाशी झाली.. खाली आलोतर समोरच एक जुना पेशंट भेटला..त्याला जेव्हा हकीकत कळाली तेव्हा त्याने स्वताजवळ असणारे पैसे मदतीला देऊन अजुन पैशाची अरेंजमेंट करायला तो निघुन गेला..
हॉस्पिटलमध्ये आल्यावर आॅपरेशन अगदी व्यवस्थित पार पडल्याच समजल.. त्यानंतर त्याला रक्त चढवण्यात आल.. आणि काही दिवस आॅबजरवेशन साठी हॉस्पिटलमध्ये ठेऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आला..नविन वर्षात खरच त्याला नविन जीवन मिळाल होत.. जिवनदान मिळाल होत..
आता मात्र मी शांत होतो.. सगळ ईतक्या पटापट घडल होत..
त्यातच मी डॉ. देशमुखांच ते वाक्य आठवुन नेहमी देवाचे आभार मानायचो.. की
"मी माझ्या आयुष्यात खुपच केसेस बघितल्या.. पण ही वेगळीच होती.. शेवटी देवाची मर्जी.. काही वेळा साध्या साध्या वेळा लोकांची जीव जातात आणि काही वेळा लोक अशी मरणाच्या दारातुन परत येतात...
काही महिन्यानंतर..
असाच परत एकदा रमेश त्याच्या मुलाला परत घेऊन आला.. ह्यावेळेस कारण वेगळच होत.. त्याला ताप येत होता .. तपासण्या केल्या असता मलेरियाच निदान झाल... 
म्हणुन त्याला पुन्हा अॅडमिट करुन ट्रिटमेंट सुरु करण्याची कल्पना मी दिली..रमेश तशी तयारीच करुन आला होता..
तसच सोहमला अॅडमिट करण्यात आल.. आैषधी सुरु केली..
तसा ट्रिटमेंट ला त्याचा उत्तम प्रतिसाद होता..
ह्या वेळेसही त्याची बायको त्याची काळजी घ्यायला तयार होती..म्हणुन प्रोगरेसही उत्तम होता.. 
त्याला काय हव काय नको त्या सगळ्यावर ती लक्ष ठेवायची.. 
रात्रभर हॉस्पिटलमध्ये जागी राहुन त्याची काळजी घ्यायची.. 
म्हणुनच.. बायकोला अर्धांगिनी म्हणतात ते काय खोट नाही याची जाणिव तिच्याकडे बघुन व्हायची..
अगदी लक्ष्मीच जिवंत उदाहरण होती ती.. 
साधी,सरळ.. कोणालाही बायको म्हणुन आवडेल अशी..
पण सोहमकडे बघुन मला वेगळच वाटायच.. 
मी समोर असलो की तो शांत असायचा.. 
मी नसलो की तिला काहीही बोलण, तिला नेहमी हडतुड करत राहण,तिच्याकडे अजिबात लक्ष न देण अस त्याच वागण असल्याच मला नर्सकडुन समजल होत.. आज सोहमला डिस्चार्ज मिळणार म्हणुन कामातुन वेळ काढुन रमेश आला होता.. 
आमच्या गप्पा रंगलेल असतानेच मी विषयाला हात घातला..
"काहीही म्हण रमेश.. पण तुमची सुनबाई खुपच संस्कारी आहे.. अगदी लक्ष्मीच रुप.. तुमच्या घराला शोभेल अशीच सुनबाई शोधली तुम्ही मुलासाठी.."
"अव साहेब.. बरबर म्हणताय तुम्ही.. अगदी लक्ष्मीच हाय बगा ती.. किती काळजी घेती पोराची आमच्या.. तवा आपरिशन झाल तवा बी लई काळजी घेतली पोरीन..रातभर जागी राहायची.. आमाला बी लई धीर दिला बगा.. सगळी काम गप गुमान करती .. पण पोरीच्या नशीबी प्रेमच नाय बगा.."
"म्हणजे.."
"दोन वरीस झाल लग्नाला.. पण पो-या तिच्याकड बगत बी नाई.. फक्त मोलकरीण म्हणुन घरात आणलीय असा वागवतोया बगा.. तिच्यासंग नीट बोलत बी नाय कधी.. काम असल की बोलण व्हत तेवढच.. ते बी घरात कोण नसल तरच.. आम्ही लई समजवयाचा प्रयत्न केला.. पण काय बी एैकत नाही त्यो..हाय काय मनात त्याच्या काय बी समजनाय बगा.."
"त्याला कोण दुसरी मुलगी वैगेरे आवडते का मग??.. म्हणजे कुठे प्रेमप्रकरण वैगेरे..."
"नाय वो.. असल काय बी न्हाई आता.. पहिले आवडायची ईक पोरगी.. पण तिचबी कवाच लगिन झालया.."
तेवढ्यात सोहम व त्याची बायको निरोप घेण्यासाठी आत येतानी दिसले..... 
"अरे या ना.. बसा बसा.. बरा आहेस न आता.. आणि काळजी घे आता सोहम.." 
"हो डॉक्टर.. आज तुमच्यामुळे मी ईथे उभा आहे.. तुमच्यामुळे माझा जिव वाचला..तुमचे उपकार कधीच नाही विसरणार मी.." तो हात जोडत म्हणत होता..
"अरे माझे कसले उपकार मानतोस.. मी काही नाही केल.. उपकार मानायचेच असतील तर तुझ्या बायकोचे मान.." मी नकळत बोलुन गेलो..
"म्हणजे.. मला समजल नाही.." तो प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघत होता..
"तेच तर.. तुझ्या लग्नाला दोन वर्ष झाली ना.. तरी तुला तुझ्या बायकोच प्रेम समजल नाही.. अरे लक्ष्मी सारख्या बायकोवर प्रेम करायच सोडुन तु असा तिरस्कार करतो तिचा.. तुझा अपघात झाला तेव्हा सगळे होप्स संपले होते.. पण ती खंबीर होती.. तुझ्या घरच्यांना सांभाळत तुझी काळजी घेत होती ती.. अॉपरेशनच्या दिवशी दिवसभर त्या गणपतीच्या मुर्तिजवळ प्रार्थना करत बसली होती ती.. तु बेशुद्ध असतानेसुध्दा किती काळजी घेतली तुझी तिने.. अगदी निस्वार्थीपणे.. अरे त्या सावित्रीनेसुद्धा सत्यवानाचे प्राण परत आणले होते.. आणि हीने पण सावित्रीसारखीच तुझी सेवा केली.. कदाचित तिने कपाळी लावलेल्या कुंकवाच पुण्य म्हणुन दोन वेळा तु मरणाच्या दारातुन परत आला..
ही तुझी सावित्री नेहमीच होती पण तुला चांगला नवरा बनायला कधीच नाही जमल... ती मात्र स्वताची कर्तव्य पार पाडत राहिली.. कधीतरी तुझ प्रेम मिळेल ह्या अपेक्षेमध्ये..
पण तुझही तिच्यासाठी कायतरी कर्तव्य आहे हे तु विसरलास.. 
म्हणुन आभार मानायचेच असतील तर तुझ्या ह्या लक्ष्मीचे मान..
उपकाराची परतफेड करायचीच असेल तर तुझ्या ह्या लक्ष्मीच्या पदरात प्रेमाची बहार कर..."
मी बोलत होतो.. आणि तो शांतपणे एेकत होता.. त्यात मात्र डोळ्याच्या पाणावलेल्या कडा तो लपवु नाही शकला..
त्याचे पाणावलेले डोळे सगळ सांगुन गेले..
भरल्या मनानेच माझा निरोप घेऊन ते निघुन गेले..
मी मात्र स्वताला फार नशिबवान समजत होत.. कारण माझ्याकडे प्रेम करणारी सुंदर बायको होती.. लव्हमॅरेज साठी पळुन जाऊन केलेल्या लग्नाव्यतिरिक्त प्रेमाच्या बाबतीत माझ्या नशिबी निराशा कधीच नव्हती आली..
दोन वर्षानंतर सोहम त्याच्या बायकोला घेऊन स्वताच्या गोंडस बाळासोबत आशिर्वाद घ्यायला आला.. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभत होता त्यांचा.. मी पण खुप खुश होतो.. अखेर त्याने तिच प्रेम स्विकारल होत.. उशीरा का होईना..त्याच प्रेमबीज नव्या रोपट्याच्या रुपात उमलल होत..
आणि ते म्हणतात ना.. खर प्रेम केल की त्याच फळ नक्कीच मिळत.. फक्त ते निस्वर्थी हव..
आखिर अंत भला तो सब भला...
समाप्त....

 ©Dr. वंदिशा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...