रचनाला नववा महिना लागलेला. दहा वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आता कुठे पाळणा हलणार होता रचना अणि रचित फार आनंदी होते. रचित सेने मध्ये, बरेचदा बॉर्डर वर पोस्टिंग असायची, त्यामुळे रचना सासू कडेच असायची बरेच वर्ष. मागील दोन वर्षात सुरक्षित स्थळी पोस्टिंग मिळाले तेव्हापासून दोघे सोबत राहत असे. आता रचित बाळंतपणासाठी तिला सोडायला म्हणुन आलेला. पंधरा दिवसाच्या सुट्या घेऊन. सासुबाई म्हणाली "अग तुझे पहिले बाळंतपण, तुला माहेरी करायचे असल्यास करू शकते. अन्यथा मी करायला तयार आहे" रचना च्या डोळ्यात पाणी आले भरलेल्या गळ्याने म्हणाली "नाही आई, मी इथेच करणार बाळंतपण. सद्ध्या आईची तब्येत ठीक नसते अणि तुम्ही पण मला आई सारख्याच आहे. बरेच दिवस एकटी सासुबाई जवळ राहण्यामुळे रचनाचे अणि सासुबाईचे छान पटत होते. सासुबाईला तिच्या मनाची घालमेल कळली. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली "ठीक आहे बेटा, सगळ सुरळीत झाले की बाळाला घेऊन जाशील आईच्या भेटीला." रचना ला गहिवरून आले. तिला तिची आई आठवू लागली.
रचना चे बाबा उच्च पदस्थ अधिकारी होते अणि आई नर्सिंग चे शिक्षण घेत होती. आई अणि बाबा एकाच परिसरात राहत होते. बाबाची पर्सनॅलिटी इतकी आकर्षक होती की, कोणतीही मुलगी प्रेमात पडावी. आई पण अप्रतिम सुंदर. दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले. लग्न करायचे असे ठरले परंतु जात आडवी आली. आई उच्चवर्णीय तर वडील वेगळया जातीचे. परंतु आई ठाम होती. दोघांनी आई वडीलांच्या मर्जीविरुद्ध लग्न केले. बाबा चांगल्या पदावर असल्यामुळे परिस्थिती छान होती. बाबांनी सांगितले की तू नर्स ची नोकरी नाही करायची बर! माझा पगार भरपूर आहे. तेव्हा तू घर सांभाळायचे अणि आपल्या मुलांना. तिलाही ते पटले अणि ती बाळाचे स्वप्न पाहू लागली. अगदी दोन महिन्यात गरोदर राहिली. दोघांना खूप आनंद झाला. बाबा आईला फुला सारखे जपू लागले. आई खूप आनंदी होती . तिला आपल्या नशीबाचा हेवा वाटायचा. कधी कधी आई बाबा ची आठवण झाली की वाईट वाटायचं. मनात म्हणायची एक ना एक दिवस माफ करतील मला. बाबा खुप हेल्थ कॉन्शस होते. अगदी रेग्युलर जिम, स्वीमिंगला जायचे. आता आईला चौथा महिना लागला होता. बाबा सकाळी जिमला गेले. व्यायामादरम्यान काय चुकले, कसे झाले काही कळलेच नाही. बाबांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
आईवर आभाळ कोसळले. आई वडीलांच्या घराचे दरवाजे बंद. मुलगा गेल्यामुळे सासू सासर्यांनी पण तिला दूर लोटले. बाबाच्या नोकरीला पण जास्त दिवस झाले नव्हते म्हणुन पैसा पण फारसा मिळणार नव्हता. सरकारी कॉर्टर होते. ते पण खाली करावे लागणार होते. तीच जीवन अंधारमय झाले होते. पुष्कळ मैत्रिणी सल्ला द्यायचा. अग अॅबॉर्शन कर. तुझ्या समोर उभ आयुष्य पडल आहे. अवघी बावीस वर्षाची आहेस. तू सुंदर आहे कुणीही मुलगा सहज मिळेल. दुसर लग्न कर. ती म्हणायची, नाही, माझ बाळ माझ्या प्रेमाचे प्रतीक आहे अणि मी त्याला जन्म देणारच. दुसर्या लग्नाचा विचार तर मी कधीच करणार नाही. अग भावनेच्या भरात निर्णय घेऊ नको. शांतपणे विचार कर. उभ आयुष्य एकटीने जगणे फार कठीण असत. पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. ती बाबांच्या ऑफिस मधील वरीष्ठांना भेटली. त्यांना विनंती केली सर, फक्त सहा महिने मला कॉर्टर मध्ये राहू द्या. वरीष्ठांनी तिची विनंती मान्य केली. ते म्हणाले, ठीक आहे तस राहता येत नाही पण तुझी परिस्थितीत बघुन मी माझ्या रिस्क वर परवानगी देतो. तिचा राहण्याचा प्रश्न सुटला होता. थोडा फार पैसा होता, पण किती दिवस पुरणार. तिनी सरकारी नोकरीसाठी अनुकंपा तत्त्वावर अर्ज केला. सरकारी प्रक्रियेला निदान दोन वर्ष लागतील तोपर्यंत काय? मैत्रिणीच्या मदतीने एका खाजगी नर्सिंग होम मध्ये नोकरी पकडली. पगार कमीच होता पण नसण्यापेक्षा असला बरा. गरोदरपण, तीन शिफ्ट मध्ये ड्यूटी, फार त्रास व्हायचा आईला. पण तिला ते करणे भाग होते. रचनाचा जन्म झाला. खाजगी नोकरी, बाळ अणि घर सांभाळताना आईला खूप त्रास व्हायचा. रचना अडीच वर्षाची असताना सरकारी नोकरी मिळाली. आता थोडा दिलासा मिळाला कारण पगार ही बरा होता अणि वेळप्रसंगी सुट्या ही घेऊ शकत होती. कधी रचना ला पाळणाघरात तर कधी सोबत ड्युटीवर नेऊन ती दिवस काढत होती. रचना पाच सहा वर्षाची झाली असताना , तिला आईचा त्रास कळायला लागला. ती म्हणायची, आई किती दमते ग तू आई म्हणायची." माझ्या पिल्लू चे एक स्माइल बघितले की माझा थकवा भुरकन उडून जातो" रचना जसजशी मोठी होत होती ती आईला कामात मदत करू लागली. आता आई एक प्रख्यात नर्स झाली होती. कितीही अवघड प्रसूती असो ती बरोबर, गरोदर स्त्रीला विश्वासात घेऊन नॉर्मल करायची. प्रतेक डॉक्टरांना ती आपल्या टीम मध्ये असावी अस वाटत होत. अगदी सिजेरियन च्या केसेस सुद्धा बरेचदा ती नॉर्मल करून बाळ बाळंतीण ची सुटका करायची. रचना, आई चे सौन्दर्य अणि बाबांची बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आली होती. ती नामांकित कॉलेज मधून बीई. एमबीए झाली. शिक्षणादरम्यान रचितशी तशी ओळख झाली. रचित सेनेमध्ये उच्च पदस्थ अधिकारी होता. दोघांच्याही आई वडीलांच्या संमतीने लग्न झाले. रचना अगदी सुखात होती. थोडासा दुःखाचा भाग हाच होता की संवेदनशील ठिकाणी तो रचना ला सोबत नेत नव्हता अणि त्यामुळे की काय त्यांना बाळ होत नव्हते. रचनाच्या आईला खूप काळजी वाटायची. ती आपल्या ओळखीतील डॉक्टर कडे रचना ला घेऊन जायची. डॉक्टर हसायचे. म्हणायचे काय सिस्टर, काही प्रॉब्लेम नाही हो तुमच्या मुलीत अणि जावयात पण त्यांनी कमीत कमी सहा महिने एकत्र तर रहायला हवेत ना. आईला सगळ कळायचे पण आईची वेडी माया.
दोन वर्षापासुन सुरक्षित स्थळी पोस्टिंग मिळाल्यामुळे दोघे सोबत राहत होते अणि आता रचना बाळंतपणासाठी आलेली. तिला फार वाईट वाटत होते की आपली आई या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहत होती अणि आज आपण जाऊही शकत नाही, ती आपल बाळंतपण करू शकत नाही कारण वर्षभरापूर्वी तिला फुप्फुसाचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता. आईची सेवा करायला म्हणुन दोन महिने थांबली होती रचना आईकडे. पण आईच म्हणाली अग तु किती दिवस थांबणार? अग जा तू. किती वर्ष तू रचित पासून वेगळी राहिली. आता कुठे सोबत रहायला मिळते आहे अणि मला लवकर तुझ्या बाळाला बघायचे आहे. मला आजी व्हायचे आहे. केअरटेकर ठेवून रचना निघून गेली. तिला गुड न्यूज दिली तेव्हा किती खुष झाली होती आई. नाचणेच बाकी होते. आजारी असूनही फोन वरुण तिच्या आवाजातील उत्साह दिसून येत होता. फोनवर नेहमी आईच्या प्रकृतीची चौकशी करायची. आवाजावरून अस वाटायच की प्रकृती ठीक नसावी पण आई तस कधीच दाखवत नव्हती. मनात यायचे जायचे का भेटीला? पण इतक्या लांब एकटीने जाणे अणि त्यातल्या त्यात गरोदरपण. रचीतला अधेमध्ये सुट्या नाही मिळायच्या. रचना मनात म्हणाली, बस आता आणखी काही दिवसाची प्रतीक्षा आहे आई. बाळ झाले की बाळाला घेऊन आम्ही येतोच आहे तुझ्या भेटीला. आई, किती खुष होशील ना तू! रचना चे मन भरून आले. आईच्या आठवणीने डोळ्यातुन अश्रू वाहू लागले.
दुसर्या दिवशी फोन आला आईची प्रकृती नाजूक आहे. रचनाला कळेना काय करावे. तसे डॉक्टरांच्या तारीखीनुसार अजून दहा दिवस बाकी होते. आता नाही गेले तर आईची भेट कधीच होणार नाही. ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी तपासले अणि म्हणाले तसही बाळ आडवे असल्याने तुझी नॉर्मल डिलीवरी होणार नाही अणि अजूनतरी आठ दहा दिवस वेळ आहे. तेव्हा तू जाऊ शकते. फक्त त्रास व्हायला नको म्हणुन ट्रेन नी जा. रचितनी तात्काळमधे रिजर्वेशन केले. त्यांना ज्या डब्यात जागा मिळाली त्या डब्यात सर्व मुले होते. आजूबाजूच्या डब्यात पण मुले होती बहुतेक काही आर्मी कॅम्प वगैरे असावा. रचितच्या गावापासून आईचे गाव आठशे किलोमीटर लांब होते. अर्धा प्रवास झाला असेल अणि रचना च्या पोटात दुखायला लागले. ट्रेन सुपरफास्ट होती त्यामुळे दोन तासांच्या अंतापर्यंत एकही स्टेशन नव्हते. तो ट्रेन मधील ऑफिसर ला भेटला म्हणाला मध्ये एक स्टेशन लागत, तिथे प्लीज ट्रेन थांबवा कारण तिथे एक हॉस्पिटल होते. जिथे रचना च्या आईची पोस्टिंग बरीच वर्ष होती पण अधिकार्यांनी नकार दिला. आम्हाला अस करता येणार नाही कारण ट्रेन मध्ये एक व्हीआयपी पेशंट आहे. त्याला काहीतरी त्रास होत आहे तेव्हा त्यांना लवकर दवाखान्यात पोहोचवायचे आहे. वाटल्यास तुम्ही तिथे उतरू शकता. अहो त्याला अजून दोन तास आहे. अणि व्हीआयपी पेशंटला काही गंभीर प्रॉब्लेम आहे का? अधिकारी म्हणाला, माहिती नाही. बहुतेक नाही पण थोड पोटात दुखत आहे. त्यांना वेळ झाला तर माझी नोकरी जाईल. रचित ला फार वाईट वाटले. एका सैनिकांच्या बायकोच्या जिवाला, व्हीआयपी च्या जीवापुढे काही किम्मत नाही. रचना वेदनेने विव्हळत होती. रचित मदतीसाठी विनवत होता. पण पूर्ण डब्यात एकाही अनुभवी स्त्री नव्हती.
तेवढ्यात एका ठिकाणी स्पीड थोडी कमी झाली अणि एक नर्स डब्यामध्ये शिरली . नर्स सरळ रचनाकडे आली. सगळ्या मुलांना बाजूला व्हायला लावले. गरम पाणी मागितले. रचित म्हणाला, सिस्टर पण बाळ आडवे आहे. अहो काही काळजी करू नका. आमच्या मॅडम एक्स्पर्ट आहे .या मॅडममुळे तर मला यावे लागले. रचितला काही कळेना. काय बोलते ही बाई. मनात म्हणाला, बुडत्याला काठीचा आधार . अर्धा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर रचनाने गोंडस बाळाला जन्म दिला. मुलगी झाली होती. बाळाला स्वच्छ केले एका कापडात गुंडाळले अणि म्हणाली बघा मॅडम किती सुंदर बाळ. रचित मनात म्हणाला, वेडी आहे का नर्स? पाहते कुठे, बोलते कुठे, रचनाला तर शुद्ध नाही. मला मॅडम म्हणते की काय. बर माझ्याकडे बघुन तर म्हणाव. कशी का असेना, हिच्यामुळे माझ्या रचनाचा, माझ्या बाळाचा प्राण वाचला. एका ठिकाणी गाडी काही क्षणासाठी थांबली, मॅडम मी निघते म्हणुन गाडीतून उतरली निघून गेली. जाताना तिने काळ्या धाग्यात असलेले एक लॉकेट बाळाच्या गळ्यात बांधले अणि म्हणाली तस सगळ सुरळीत आहे पण घरी पोचल्यावर एकदा दोघींना डॉक्टर ना दाखवून द्याल.
रचना खूप आनंदी होती. बस आता आईच्या भेटीमध्ये काही तासाच अंतर. रचनाला वाटत होत गाडी इतकी हळू का चालते? अस वाटत होत की उडून जाव पटकन अणि आईला म्हणाव बघ तुझी नात. रचित ला दहा वेळा विचारून झाले की अजून किती वेळ आहे पोहचायला? तो म्हणाला अग, धीर धर. बस आणखी एक तास. रचना आतुरतेने आईचे गाव यायची वाट पाहू लागली. एकदाची प्रतीक्षा संपली. तिघेही स्टेशनवर उतरले. वेळ जायला नको म्हणुन स्टेशनवर पोहोचायच्या आधीच कॅब बूक केली. कॅब गेट वर उभीच होती. पोहोचलो म्हणुन सूचना द्यावी असा विचार केला तर दोघांचे मोबाइलचे चार्जिंग संपलेले.
घरी गेले तर गर्दी जमलेली. रचनाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पाहते तर काय आई गेलेली. घरात, आत मध्ये गेली तर आईची अर्धी साडी फाटलेली अणि बाळाकडे बघितले तशाच कपड्यात बाळाला गुंडाळलेले . तिनी बाळाच्या गळ्यातील लॉकेटकडे बघितले. अरे हे तर माझ्या बाबांचे, जे आईनी मला घालायला दिलेले अणि नंतर ठेवून घेतले म्हणायची माझ्या नातवाला देईल. रचित हे सगळ पाहत होता. आता त्याच्या लक्षात आले की ती सिस्टर सारखी मॅडम मॅडम का म्हणायची. त्याला तिचे हाव भाव आठवले. त्याला तेव्हा ती विचित्र वाटली होती. आता त्याला कळले की ती आईच्या मार्गदर्शनात बाळंतपण करीत होती म्हणुन बरेचदा ती मधेच थांबायची समोर पहायची अणि नंतर पुढची कृती करायची म्हणजे आई जस सांगायची तस ती करायची. प्राण गेल्यावर आई तिला घेऊन आली होती. केअरटेकर ला विचारले किती वाजता गेली आई. पहाटे चार वाजता. सारख्या बडबडत होत्या. रचना, बाळ मी येते, घाबरू नको, धीर धर. जवळ जवळ अर्धा तास त्या बडबडत होत्या अणि चार वाजता एकदम हसल्या अणि शांत झाल्या. मी तुम्हाला खूप फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन लागत नव्हता. रचना मनात म्हणाली, बरोबर त्याच वेळ माझे बाळंतपण झाले अणि मुलीचा प्राण वाचविण्यासाठी आई खास ट्रेन मध्ये आली होती. नातीला आपल्या डोळ्यानी पाहण्याची इच्छा पण पूर्ण केली होती. तिने बाळाला छातीला लावले अणि म्हणाली आई ही आई असते. आई तू मला दोनदा जन्म दिला. तुझ्यामुळेच मी या जगात आली अणि आज परत तुझ्यामुळेच जिवंत आहे. हा माझा पूर्वजन्म आहे अणि कदाचित तुझा सुद्धा. रचनाच्या डोळ्यातुन अश्रू वाहू लागले.
आई ही आई असते.... Love you आई....
(कथा ही काल्पनिक आहे)
©अर्चना अनंत धवड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा