बुधवार, २२ मे, २०२४

1159. ती अशीच

     आज तिनं ठरवलं की आता माघार घ्यायची नाही. मान्य आहे नातं टिकवायचं तर नमतं घ्यावं एकानं. पण प्रत्त्येक वेळी मीच का? नात्याची गरज माझी एकटीचीच कां ? त्याला याचं काहीच नाही. प्रत्येक वेळी माघार घेऊन, मन मारून आपण कवडीमोल ठरलोय कां ? याला जबाबदार कोण? मीच..... होय मीच.......पण  एखाद्याला जीव लावणं, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणं, त्याला हवं नको पहाणं, फक्त त्याचीच बनून राहणं, त्यालाच आपलं विश्व बनवणं गुन्हा आहे का ..? मुळीच नाही. पण  एखाद्या साठी हे सारं करताना  स्वत:चं अस्तित्व विसरणं नक्कीच गुन्हा आहे आणि तो  गेली पंधरा वर्षे स्वत: सोबत करतेय. विचार करता करता तिच मन अगदी दुथडी भरून वाहत होत . बॅग काढून  ती भराभरा कपडे भरत होती.  दोन चिमुकले... 👶🏻👧🏻 त्यांचाही विसर पडला तिला. आज आत्म्याला ठेच लागली होती. मन बंड करत होते. बस्स झालं आता किती अवहेलना करून घ्यायची स्वत:ची. तो मात्र नेहमी प्रमाणे आपल्या मनातील गरळ ओकून मोकळा झाला. लेकरांना घेऊन बाहेर निघून गेला. नऊ महिने रक्तामासां मध्ये वाढवलं, मरणयातना सहन करून जन्म दिला. अंगावरचं दूध पाजून मोठं केलं. त्या पोटच्या गोळ्यावरही आपला हक्क नाही. किती हा अन्याय ...!! पण मोकळ्या मनानं सारं काही मान्य असतं. प्रत्येक वेळी तिला गृहित धरायचं. असू देत लेकरं त्यांचे तर त्यांचे आपलं काहीच नाही. सगळे कपडे बॅगेत कोंबून बचत करून जमवलेली  पुंजी सोबत घेतली अन् निघाली. देव्हा-यातली समई फडफडू लागली. तिनं त्यात तेल ओतलं अन् देवाला नमस्कार केला. सांभाळ रे बाबा एक सुस्कारा सोडला. तशी परत समईची ज्योत डगमगली. लेकरांची आठवण झाली. गाई सारखा हंबरडा फोडला. समजावणारं ऐकणारं कुणी नव्हतं. बंद घरात मनसोक्त रडून घेतलं. 🚪   😭🧎🏻‍♀️👜
    तिनं स्वत:ला आवरलं डोळ्यांच्या कडा चिंबचिंब करत उंबरठा ओलांडला. दारं व्यवस्थित लावून गेटला ओढून नेहमीप्रमाणे तुळशीच्या कुंडीत घराची चावी ठेवली आणि निघाली... अधांतरी...खरंच स्त्रीचं स्वत:चं घर कोणतं ? लग्न झाले की माहेरची पाहूणी बनते अन् सासरी दुस-या घरून आलेली. तरीही किती अट्टाहास करते ती तिच्या साठी नसलेल्या घरासाठी. 🚌💨💨💨💨. ती स्टँडवर आली पुणे गाडी लागली होती. त्या गाडीत चढली पुण्याला एक मावशी असते तिच्याकडं जायचं असं आताच गाडी पाहून ठरवलं. चेहरा रुमालाने बांधला होता डोळ्यात आभाळ दाटून आलेले होते मनात आठवणींच्या ढगांचा गडगडाट चालू होता. अंतरी बेभान वादळ घेऊन मात्र तिची चर्या अगदी शांत. तिला क्षणभर वाटून गेलं की आपण चुकतोय. पण दुस-याच क्षणी  तिचा दुखावलेला आत्मा आक्रंदू लागला. नाही ..... नाही ........ तू आता थांबलीस तर जन्मभर उपेक्षित वंचित राहशील पोतरं बनून. मोठ्या कष्टानं नयनातील सरीतेला बांध घालून थोपवलं होतं. आज सकाळी जुजबी कारणा वरून त्यांनं किती सुनावलं होतं. चूक काय तर त्याचे कामाचे कागदपत्र घर आवरताना खालीवर झाले. त्याचं सिरीयल लावायला कितीसा वेळ लागणार होता ? पाच-दहा मिनिटे  पण त्याला निमित्त हवं होतं नेहमी सारखं. तू एकदम मठ्ठ आहेस .👈 चांगदेवासारखी कोरी. घरातलं काम काय करते स्वत:ला काय समजते कुणास ठाऊक. नालायक कुठली एवढी साधी गोष्ट समजत नाही. कुठून दुर्बुद्धी सुचली न हा गळ्यात दगड बांधून घेतला मी. तो तावातावाने बोलत होता अन्  ही तीळ तीळ तुटत होती. किती समर्पण केलं आपण हा संसाराचा डाव रचण्यासाठी. अन् काय ही पोचपावती श्शी ? हिला हिचं बालपण आठवलं. किती चपळ होती ती. प्रत्येक खेळात नंबर वन, चित्र काढणे, नृत्य सगळ्या गोष्टीत पारंगत. चार बहिणी आई बाबांना पण आपण जड वाटलो की काय देव जाणो. बारावीला असतानाच हे स्थळ आलं मुलगा चांगला नोकरीवाला ही खुपच सुंदर त्यामुळे भातुकलीच्या खेळ खेळायचा संपलाही नव्हता तर नशीबानं संसाराचा खेळ समोर मांडला. हिने ही आईवडीलां साठी मोठ्या हौसेने तो संसार सारीपाट मांडून घेतला नव्हे त्यात ती पुर्णपणे गुरफटून गेली. जीवापाड जपलं त्याला,त्याच्या घरादाराला अन् तो म्हणतोय 'दगड बांधून घेतला मी.' तिचं मन दुखावलं तुटून गेलं. आपणाला काही तरी येतंय कां, आपल्याकडे कोणतीतरी कला आहे यापेक्षा आपण माणूस आहोत आपणालाही भावना आहेत मन आहे हे त्यांच्याबरोबर आपणही विसरून गेलो याची खंत तिला बोचू लागली. ती विचारचक्रात मग्न होती. कंडक्टर जवळ आला अन् ' तिकीट तिकीट ' 👨🏻‍✈️🧾 असं म्हणताच ती दचकून भानावर आली. तो तिच्याकडे पाहू लागला तसं तिने पुणे असा अस्फुटसा आवाज दिला.पैसे दिले अन्  तिकीट घेऊन पर्स मध्ये ठेवले. मोबाईल काढला दहा मिस काॅल व पाच मेसेज. 
' कुठे आहेस? ' सांग ना, फोन का घेत नाहीस ?'
'एकदा बोल ना प्लीज. ' एवढं का मनावर घेतलंस, मी रागात बोललो सॉरी.  समजून घे ना परत नाही बोलणार खरंच गं '
' साॅरी , साॅरी , साॅरी .....'
आता पर्यंत तेच केलंय मी दहा वर्षांनी लहान असुनही समजून घेतंच आले. परत मेसेज आला' मुलं रडत आहेत. आई कुठे आहे म्हणून भंडावून सोडलंय मला. मुलांचं नाव घेताच मातृ- हृदय कळवळलं. आपोआप बोटं मोबाईल वर फिरू लागली 'लेकरांना सांभाळा मी पुण्याला जात आहे. मावशीकडे' कुठं चाललोय हे सांगणार  नव्हती आणि भावनेच्या भरात सांगून टाकलं. फोन वाजला हिचं धैर्य झालं नाही. तो तसाच वाजून बंद झाला.  मी खूप वेळ झाले तिच्या बाजूच्या सीटवर बसून निरीक्षण करत होतो. तिच्या मनाची घालमेल मला समजत होती. पण बोलण्याचं धाडस होईना. परत मेसेज आला' जिथे आहेस तिथे उतर मी गाडी घेऊन येतोय तुला घ्यायला प्लीज. माझी शपथ आहे तुला झाले त्याच्या या शब्दांनी ती कोलमडून गेली. मुसळधार पाऊस पडून जावा आणि आकाशानं निरभ्र व्हावं.सृष्टीनं आपलं स्वच्छ सुंदर रुपानं चरचरांचे स्वागत करावे तशी  तिची चर्या बदलली.चेह-यावरचे ढगाळ वातावरण निसरून गेले .त्याच्या एकाच वाक्यानं  'थांब मी येतोय ....'
    ती सारं विसरली पटकन उठली अन् कंडक्टर साहेबांना गाडी थांबवण्याची विनंती केली.'मला उतरायचंय,
माझे पती गाडी घेऊन येत आहेत मागे प्लीज थांबवा' 👧🏻👶🏻👨🏻🚗 💨💨
     कंडक्टर परत संभ्रमाने पाहू लागला तसं तिनं छानसं स्माइल दिलं आणि बॅग घेऊन खाली उतरली. कंडक्टरच्या तोंडून सहज उद्गार निघाले,
"औरत को समझना मुश्कील हैं ...."
मी तिथेच होतो मी म्हटलं "
नहीं जनाब कोई मुश्कील नहीं 
औरत को अगर दिल से समझोगे 
तो बहूत आसान है 
दिमाग लगाओगे तो
कभी नहीं समझ नहीं पाओगे.
👩🏻‍🦱👜👶🏻👧🏻👨🏻

जिवन मे पिया तेरा प्यार रहे
हाथों में मेरे तेरा हाथ रहे
🚗 💨💨 💨💨
🍁🌈🛕⛱️🍁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...