शनिवार, २४ डिसेंबर, २०२२

99. मला नाही तुझी गरज

        मुलगा म्हणतो, कविता, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे गं…! मुलगी म्हणते, चूप बस नालायक. काही लाज बीज वाटते का नाही? घरी आई-बहीण नाही वाटतं. मुस्काट फोडून ठेवेन. तुझी लायकी तर आहे का? निच कुठला. तो म्हणतो, असं नको बोलू गं. मी इतकाही वाईट नाही की जितका तू समजतेस. मी तुला वाईट हेतूने नाही विचारले. कोणीही तुझ्या प्रेमात पडावे इतके अप्रतिम सौंदर्य आहे तुझ्याकडे. तुला माहित नसेलही कदाचित की ह्या भावना व्यक्त करण्यासाठी मी कितीतरी रात्री आणि दिवस खर्च केले आहेत. कृपया, मला समजून घे. हवे तर तू म्हणतेस तसं वागेन. मी सुधारेल. तुला खूप चांगली वागणूक देईन. पण मला अशी दूर लोटू नको. खरं तर मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मुलगी म्हणते, ठीक आहे. माझ्यासाठी तुला त्या मूर्ख मुलांची संगत सोडून द्यावी लागेल. तुझ्या टपोरी मित्रांना तुला मुकावे लागेल. जीवनात काही करुन दाखवायचे झाले तर तुझ्या नालायक मित्रांबरोबर टाईमपास करणं सोडून द्यावं लागेल.
      मुलगा म्हणतो, गप माकडतोंडेतुला काय थोडा भाव दिला तर लगेच अटी घालायला लागली. उद्या प्रेमासाठी माझ्या आईचं काळीज मागशील? माझ्या मित्रांसाठी तुझ्यासारख्या छप्पन ओवाळून टाकेल. कितीही नालायक असले तरी माझ्या अगोदर माझ्या आजारी बापाला हॉस्पीटलमध्ये पोहचवणारे तेच आहेत. ते आहेत म्हणून माझ्या बहीणीकडे कोणाची वर नजर करायची हिंमत नाही. मित्रांनी बळ दिलं नसतं तर तुला आज विचारायची हिंमत झाली सती आणि आली मोठी शहाणीचल फूटमला नाही तुझी गरज. – सुरज.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...