एका वेळेची गोष्ट आहे. एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांच्यावर खूप प्रेम करत होते. मुलगा खूप देखणा होता आणि मुलगी अतिशय सुंदर होती. तिची सुंदरता सगळ्या कॉलेजमध्ये प्रसिध्द होती. मुलगा गरीब घराण्यातला होता पण मुलगी श्रीमंत घराण्यातली होती. या गोष्टीमुळे मुलगीच्या घरातील सर्वजण नाराज होते आणि त्याने त्या मुलगीपासून दूर रहावे असे त्यांना वाटत होते. मुलग्याने विचार केला की मुलगीच्या आई-वडीलांचे हृदय जिंकल्याशिवाय काही पर्याय नाही. त्याने तिच्या घरी येणे-जाणे चालू ठेवले आणि आपली वर्तवणूक एकदम साधी ठेवली. हळूहळू मुलगीच्या घरातील तिच्या आई-वडीलांची त्या मुलाबद्दल विचार बदलत गेले. त्यांना पण तो मुलगा आवडला. परंतु ते त्याला म्हणाले, “मुला, प्रेम होणे चांगली गोष्ट आहे पण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बनणे पण आवश्यक आहे.” मुलग्याने वचन दिले की असेच होईल. काहीतरी बनून दाखवल्यानंतरच मी तिचा हात तुमच्याकडे मागेन. वेळ जात होता. त्यांचे नाते वाढत चालले होते आणि अभ्यासही चालू होता. मग ती वेळ आली जेंव्हा मुलग्याची भूदलामध्ये निवड झाली. मुलगा भूदलामध्ये सहभागी झाला. ट्रेनिंग पूर्ण करुन आला आणि मुलगीच्या आई-वडीलांकडे लग्नासाठी तिचा हात मागण्यासाठी परवानगी घ्यायला गेला. मुलगीच्या आई-वडीलांनापण त्याचा अभिमान वाटत होता की त्यांचा जावई भूदलामध्ये नोकरीला आहे. त्यांनी त्याला होकार दिला. मुलगा आणि मुलगी दोन्हीपण आनंदीत होते. त्यांचे प्रेम पण ध्येयाकडे वाढत चालले होते. दोघांच्या डोळ्यांमध्ये सोनेरी स्वप्ने तरंगू लागली. पण तेंव्हाच एक अडचण आली. शेजारच्या देशाशी युध्द सुरु झाले व मुलग्याला अचानक जावे लागले. मुलगीने रडत रडत त्याला बाय म्हटले. आणि तरीसुध्दा काही दिवस रडत होती. प्रत्येक दिवस ती प्रार्थना करत होती की युध्द संपून जाऊ दे आणि तिचा प्रियकर तिच्याजवळ परत येऊ दे.
परंतु एक घटना घडली. मुलगी एक दिवस भाजी-मंडईतून घरी येत होती तेंव्हाच एक कारवाल्याने तिला धडक मारली. अतिशय वाईट अपघात झाला. मुलगीला जेंव्हा दवाखान्यामध्ये शुध्द आली तेंव्हा तिने पाहिले की तिच्याजवळ तिचे आई-वडील उभे आहेत आणि तिची आई रडत आहे. तिला लगेच समजले की काहीतरी नक्कीच गडबड आहे. काही वाईट बातमी आहे का? पहिल्यांदा तिच्या मनात तिच्या प्रियकराचा विचार आला. मग तिने विचारल्यावर तिची आई म्हणाली, “नाही मुली. तो एकदम व्यवस्थित आहे. युध्द पण जवळ जवळ संपतच आलेले आहे. त्याची नियुक्ती अजून बॉर्डरवरच आहे पण त्याचा फोन आला होता की सगळे ठीक आहे.” मग तिने विचारले की, काय भानगड आहे? तुम्ही एवढे रडायला का लागले आहात? तेंव्हा तिच्या वडीलांनी सांगितले की, “ मुली, अपघातामध्ये तुझा चेहरा खूप खराब झाला आहे. खूपच खराब…” जेंव्हा मुलगीने आपला चेहरा आरशामध्ये पाहिला तेंव्हा ती किंचाळली. तिचा सर्व चेहरा बिघडला होता. ती प्रमाणापेक्षा जास्त विद्रुप दिसत होती. तिने विचार केला की हे माझ्याबरोबर काय झाले? माझ्या एवढया सुंदर चेहऱ्याचे एवढी वाईट अवस्था कशी झाली? मग तिच्या मनामध्ये आपल्या नवऱ्याचा विचार आला. तिने विचार केला की , अशा अवस्थेमध्ये ती तिच्यासमोर कसे जाणार? तो तिला बघितल्यावर नाकारुनच देऊ नये? मग तिने ठरविले की ती तिच्या चांगल्या नात्याच्या आठवणींना कधी दु:खी होऊ देणार नाही आणि तिने विचार केला की ती आपल्या चेहऱ्या त्या मुलग्याला कधीच दाखवणार नाही. मग त्या मुलग्याचे कित्येक संदेश आले, फोन आले पण तिने कधी रिप्लाय दिला नाही किंवा बोलली पण नाही. दोन महिन्यानंतर तिला दवाखान्यातून डिसचार्ज मिळाला.
आपल्या आई-वडीलांच्या सहाय्याने हळूहळू चालत जेंव्हा ती आपल्या घरामध्ये आली तेंव्हा तिचे डोळे आश्चर्याने भरुन गेले होते. समोर तिचा प्रियकर तो मुलगा हातामध्ये खूप मोठा गुलदस्ता घेऊन उभा होता. सगळ्या घरामध्ये लिहले होते, “घरामध्ये स्वागत आहे जे…” हे बघितल्यावर तिच्या डोळ्यातून पाणी आले. प्रेम तर ती करतच होती. जसे त्या मुलग्याने हात पकडून तिला म्हटले, “माझे तुझ्यावर प्रेम आहे.” ती मोठमोठ्याने रडू लागली. खूप वेळाने रडून झाल्यावर तिने विचारले की, माझा चेहरा बघितल्यावर तू असाच विचार करतोस? तेंव्हा त्या मुलग्याने सांगितले की तुझ्या आईला विचारले की काय भानगड आहे? तू का माझ्याशी बोलत नाहीस? तेंव्हा तुझ्या आईने सांगितले की तू अपघातमुळे विचार करत होतीस की मी तुला पसंत करुन घेणार नाही. पण अग वेडे, मी तुझ्या चेहऱ्यावर नाही, तुझ्यावर प्रेम केले आहे… करत आहे… आणि करत राहीन.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा