सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

90. प्रेमासाठी एकमेकांना समजून घेणे गरजेचे असते

           त्या दोघांचा ब्रेक-अप (एकमेकांबरोबर बोलणे किंवा कायमचा संपर्क तोडणे) झाला होता. त्याला नोकरी लागायला अजून वेळ होती. पण ती थांबायला तयार नव्हती. शेवटी गेली ती त्याला सोडून आणि तो सतत तिला आठवून रडत रहायचा. प्रेमविश्वासभावनायावरचा विश्वास उडून गेला होता त्याचा. त्या गोष्टीला तीन वर्षे झाली. पण त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. घरचे तर नेहमी मागे लागून रहायचे. पण हा नेहमी टाळाटाळ करायचा. पण एकदा त्याची आई त्याला विचारताच मुलीकडच्यांना बोलावते. तो येतो ऑफिसमधून. सगळे त्याची वाट बघत बसलेलेच असतात. सगळे समोर असल्यामुळे तो टाळाटाळ करता गप्प बसतो. मुलीकडे पाहण्याची तर इच्छा नसते. पण घरचे सगळे खूपच आग्रह करतात. बोलण्यासाठी बाहेर घेऊन जाण्याचा आग्रह करतात. दुसऱ्या दिवशी भेटण्याचे ठरते. त्या दिवशी कसातरी तिला नकार द्यायचा हा विचार तो रात्रभर करत असतो. दुसऱ्या दिवशी ते  भेटतात. संध्याकाळाचे चार वाजलेले असतात. तेवढ्यात त्याला आफिसमधून फोन येतो. तसाही त्याला नकार द्यायचा असतो. बोलण्याची पण इच्छा नसते म्हणून तो तिला म्हणतो, मला ऑफिसमध्ये थोडा वेळ काम आहे. तुमची हरकत नसेल तर आपण जाऊया का??? ती म्हणते, ठीक आहे. दोघेही टॅक्सीत बसतात. पूर्ण वेळ शांत. कोणी काहीच बोलत नाही. ऑफिस येते. ते बिल्डींगपाशी येतात. तो तिला म्हणतो, वर चल. ती म्हणते, उगीच ऑफिसमधले गैरसमज करतील. मी थांबते खाली. तू ये जाऊन.
     आणि तो जातो. तो ऑफिसमध्ये जातो. काम करत असतो. त्याचे साहेब त्याला बोलवतात आणि त्याला प्रमोशनचे पत्र देतात आणि बाहेर देशात जाण्याची संधीपण असते. तो खूपच खूश होतो. पण त्याचे साहेब त्याला म्हणतात की, तुला आताच्या आता मला एक प्रेझेंटेशन करुन द्यावे लागेल. मला लवकरात लवकर त्यांना पाठवायचे आहे. तो तयार होतो आणि लागतो कामाला. तो ती खाली वाट बघत आहे हे विसरुन जातो. सहा वाजतात, नंतर ,…8,…8.30 शेवटी त्याचं प्रेझेंटेशन तयार होते. तो जातो साहेबांना द्यायला. ते पण खूश होतात. साहेब, जा, आता घरी जा. आणि घरच्यांनापण आनंदाची बातमी देतेही, वाट बघत  असतील. त्याला अचानक आठवलं तो तिला खालीच सोडून आला होता आणि या प्रजेंटेशनमुळे विसरुन गेला होता. ती गेली असेल निघून असही त्याला वाटत होते. पण जर थांबली असेल तर…? तो लगेच तेथून निघतो मन त्याचं खूपच अस्वस्थ होते.
     तो गेटबाहेर येतो. पाहतो तर काय????? ती असते एका आडोशाला उभी. त्याला काय बोलावे सुचत नाही. तो म्हणतो, सॉरी गं, मी विसरुनच गेलो होतो. मला वाटले तू गेली असशील. तू गेली का नाहीस? मला फोन तरी करायचा ना? ती म्हणाली, अरे तूच म्हणाला होतास ना, की थोडा वेळ काम आहे म्हणून मला वाटले येशील लगेच. आणि फोन करायचा म्हटले तर तुझा नंबर आहे का माझ्याकडे? मनात आले तुझ्या घरी तुझ्या बाबांना विचारावा नंबर. पण मग ते नंतर तुलाच ओरडले असते. आणि माझ्या घरच्यांना विचारले असते तर त्यांचापण तुझ्याविषयी गैरसमज निर्माण झाला असता. वरती जावे वाटले पण परत ऑफिस मध्ये तुला डिस्टर्ब होईल म्हणून नाही आले. आणि तू बोलला होतास ना येतोमग. तिला काय बोलावे हेच सूचेना त्याला. पण तिचे मन आवडले होते त्याला. तो म्हणाला, तू मला आवडलीस. ती म्हणते, अरे पण असे अचानक. आपण अजून काही बोललो पण नाही. तू ओळखतही नाहीस अजून मला नीट. लगेच असे ठरवण्याचे कारण????? तो म्हणाला, होकारण आहे. पण मला एक सांगायचे आहे तुला. मी एका मुलीवर खूप प्रेम करत होतो. ती ही करत होती. पण लग्नासाठी तयार नव्हती. तिला माझ्या प्रेमासोबत माझे पैसे, नाव, प्रसिध्दी हेही हवे होते. पण तेंव्हा माझ्याकडे काहीच नव्हते.मी तिला थोडा वेळ मागितला. पण तोही ती द्यायला तयार नव्हती. शेवटी गेली सोडून ती मला. त्यानंतर मला प्रेम आणि विश्वास निरर्थक वाटू लागला. म्हणून मी नेहमी लग्नाला टाळाटाळ करायचो. तुलाही नकार द्यायचा हेच ठरवले होते मी. खूप अगोदरच. पण आज जे झाले त्याने माझे डोळे उघडले. जिच्यावर मी इतके प्रेम करत होतो तिने मला कधी वेळ दिलाच नाही. आणि आज माझ्या एका शब्दावर तू इतका वेळ थांबलीस. आणि मी विसरलो होतो हे ऐकूणसुध्दा तू मला इतके समजून घेतलेस. कदाचित प्रेम होण्याला अजून वेळ असेल आपल्यात. पण मला तुझा स्वभावच आवडलाते पुरेसे आहे आपल्या संसारासाठीहो ना? जर तुला मीही आवडलो असलो तर सांग???? ती हळूच नजर खाली घेते. त्याला तिचे उत्तर समजते. तो आईला फोन करतो आणि बोलतो, मला मुलगी पसंत आहे.
     लग्नासाठी प्रेम हे गरजेचे असतेच. पण त्यापेक्षाही एकमेकांना समजून घेणे गरजेचे असते. मला हम-तुम चित्रपटामधील राणीचा डायलॉग आठवतो. कभी तो पहिली मुलाकत काफी होती हैऔर कभी बहूत सी मुलाकते लग जाती है.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...