बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

105. व्हॅलेंटाईन डे

           एकाच कॉलेजमध्ये असूनदेखील खूप दिवसांपासून आमच्या नजरेचेच संवाद चालू होते. मी तिसऱ्या वर्षीचा विद्यार्थी आणि ती पहिल्या वर्षीची विद्यार्थीनी. खूप दिवसांपासून तिला विचारावं म्हणत होतो. पण आज व्हॅलेंटाईन डे आहे. मी पूर्ण तयारी केली आहे आणि पूर्ण हिंमत करुन विचारलं देखील. तिने लाजून होकारार्थी मान हलवली. माझ्या आनंदाला पाराच उरला नाही, मी खूपच आनंदीत झालो.
        आमचं कॉलेज मागच्या तळ्याकाठी भेटणं ठरलं. मी खूपच उत्साहित झालो होतो आजच्या दिवसाबद्दल. कारण आज ती मला त्या तळ्याकाठी भेटणार होती. मी तिथे तासभर आधीच पोहचलो कारण मला राहवत नव्हतं ना म्हणून. पण ती तर माझ्या आधी तिथे पोहोचली होती. तिला पाहून मी तर दचकलोच आणि मला पाहून ती ही. मी तिच्या जवळ  गेलो आणि म्हणालो, आपलं तर दहा वाजता भेटायचं ठरलं होत ना? ती म्हणाली, हो, पण मला तुझ्या भेटीची ओढ रहावली नाही. मी म्हणालो, माझे सुध्दा तसेच झाले. तशी ती लाजली. काय ते तिचं लाजणं वेड लावणारं होतं. मी तिच्यासाठी आणलेली गुलाबाची फुल तिला दिली. ती तर एकदम खूश झाली. आणि मी तिला पुन्हा एकदा म्हणालो, आय लव यू. ती सुध्दा म्हणाली, आय लव यू टू. ते ऐकून मला धन्य झाल्यासारखं वाटत होतं. अशा प्रकारे सुरु झालेलं आमचं बोलणं जवळजवळ तासभर चालू होतं. तळ्यावर पडलेली सकाळची परावर्तीत सूर्यकिरणे खूपच सुंदर दिसत होती. पक्षांचा चिवचिवाट, झाडाखालची थंडगार सावली अन् तळ्यातलं ते शांत पाणी. खूपच मोहक वातावरण आणि माझी परी माझ्यासंगे आहे. आणि काय हवं? असंच वाटत होतं मला त्यावेळी. बोलता बोलता मी तिच्या केसांशी खेळत होतो ते तिलाही आवडत होतं. मग ती पाय पसरुन झाडाशी टेकून बसली. मी माझं डोकं अलगद तिच्या मांडीवर टेकवलं आणि पुन्हा तिच्या केसांशी खेळू लागलो. ती माझ्याकडं बघत गाल्यातल्या गालात हसत होती. मी हळूच तळ्यातील पाणी तिच्या डोळ्यांवर शिंपडलं. ते तिला आवडलं कदाचित. मग तिनेही माझ्या डोळ्यावर पाणी शिंपडलं. मी पुन्हा पाणी शिंपडलं. तिने पुन्हा पाणी माझ्या चेहऱ्यावर शिंपडल्यावर मला काहीतरी बोलू लागली. …… अरे मेल्या उठतोस का नाही? केंव्हापासून तुला पाणी मारुन उठवतेय. कॉलेजला जायचं नाही का रे?
     (माझी आई माझ्या चेहऱ्यावर पाणी मारुन उठवत होती.) किती सुंदर स्वप्न बघत होतो आणि आईनं सगळ्यांवर पाणी फिरवलं.
        खरंच अशा सगळ्या सुंदर घटना स्वप्नातच घडतात. वास्तविकमध्ये तर ती आपल्याला सोडून दुसऱ्याशी लग्न करुन निघून जाते आणि आपल्या डोळ्यात एक अश्रूसुध्दा येत नाही. कारण जेंव्हा आपल्याला कळलेलं असतं की, तिचं लग्न ठरलेलं आहे तेंव्हा जे अश्रू अनावर झालेले असतात ते तिच्या साखरपुड्यापर्यंत थांबतच नाहीत आणि तिच्या लग्नापर्यंत तर ते सुकूनच गेलेले असतात. नवरीच्या वेशातून मंडपाकडे जाताना तुला माझी एक तरी आठवण आली असेल का ? सोडून तुझ्या नवऱ्याच्या घरी जाताना आई-वडील असलेल्या अश्रूंमधला एखादा अश्रू माझ्यासाठी ढाळला असशील का गं? सांग नासांग ना गं…… किती मूर्ख होतो मीखरंच किती मूर्ख होतो मी तुझ्या प्रेमात.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...