शारदा किती उशीर?
किती वेळ
तुझी वाट
पहायची?
रात्रीचे साडे अकरा वाजून गेलेत की
गं…
अरे
हो
रे
. आज
थोडा उशीरच झाला.
पण
तुझ्यासाठी काय
आणलंय मी?...
काय?...
उकडीचे मोदक…
तुला खूप
आवडतात ना…
हो
खूपच आवडतात.
रवी
डब्यातला एक
मोदक खातो आणि
तिच्याकडे बघून विचारात पडतो.
तिला विचारतो,
“तुला भिती नाही का गं वाटत? गेली सहा महिने आपण रोज रात्री या झाडाखाली भेटतोय. तू माझ्यासाठी कायम काही ना काही घेऊन येतेस.” “भिती… कसली भिती?”
“भूताबितांची…”
“भूत-बित काही नसतं रे !”
“आणि एक दिवस खरंच भुतानं तुला वाटंत अडवलं तर?”
“तर ते भूत तू असशील ! चेष्टा पुरे हं आता.”
“ओके…सॉरी…सॉरी…”
“तू असलास की मला कशाचीही भिती वाटत नाही रवी !”
“असं, मग मी तुझ्यासाठी
किती महत्वाचा आहे
सांग ना
मला?”
“पुन्हा कधीतरी सांगेन, आता उशीर होतोय. मला जायला हवं. “अगं पण जाताना ते एकदा म्हणून जा ना जे ऐकण्यासाठी
मी
इथे
आलोय.”
“तूच म्हण ना मग.”
“आय लव यू शारदा.”
“मी सुध्दा.”
बारा तासानंतर… शारदाला वाचणाची खूप आवड आहे. पण कामाच्या ओघामुळे गेले कित्येक दिवस तिला वेळच मिळाला नाही. पण आज तिला वेळ मिळालाय. म्हणून ती स्वातंत्रयपूर्व काळापासून असलेल्या एका ग्रंथालयात गेली. तिथल्या धुळखात पडलेल्या बऱ्याच पुस्तकांच्या कपाटामध्ये ती सत्यकथांवर आधारीत असलेली पुस्तके शोधत होती. त्यामध्ये तिला एक पुस्तक मिळत जे पंचवीस वर्षापूर्वी घडलेल्या सत्य घटनावर आधारीत होतं. जेंव्हा ती ते पुस्तक उघडते तेंव्हा तिच्या पायाखालची जमिनच सरकते. तिच्या तोंडाचे पाणी पळते. अंगाचा थरकाप होतो. ती त्या पुस्तकातली काहीच पाणी उलघडते. त्यानंतर ती ते पुस्तक घेऊन या पुस्तकाच्या लेखकाला भेटण्याची इच्छा ती तिथल्या ग्रंथपालांसमोर व्यक्त करते. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीद्वारे ते शारदाला लेखकाचा पत्ता देतात. तो लेखक तेथून फक्त दोन तासांच्या अंतरावर असतो. शारदा लवकरच त्याच्या घरी पोहचते.
एक पंच्याहत्तर
वर्षांचे वृध्द दरवाजा उघडतात.
दारात उभ्या असलेल्या शारदाला पाहून ते
खूपच घाबरतात.
त्यांना जबर
मानसिक धक्का बसतो.
त्यांची ही
अवस्था पाहून शारदाला वाटतं की
हे
आपल्याला आधीपासून ओळखतात आणि
तिला खूपच घाबरत आहेत हे
पाहून शारदा त्यांना आपली ओळख
करुन देते.
तेंव्हा कुठे जाऊन त्यांची परिस्थिती स्थिर होते.
तेच
त्या पुस्तकाचे लेखक होते.
त्यांनी लिहलेल्या पुस्तकातील या
सत्य घटनेविषयी शारदा त्यांना विचारते.
ते
सांगू लागतात.
पंचवीस वर्षापूर्वीची
गोष्ट आहे.
जेंव्हा मी
पार्किनसन कंपनीतल्या रिसर्च कमिटीत काम
करायचो. एका खेडेगावात आमचा प्लँट लागणार होता. म्हणून आम्ही आमची कमिटी तिथलं निरीक्षण करायला गेलो होतो. पण त्या दिवशी तिथले गावकरी एका युवकाला जबर मारहाण करत आणत होते. एक मुलगी जीवाच्या आकांताने रडत होती. त्याला मारु नका, त्याला मारु नका
असं
म्हणत होती.
पण
कोणीही ऐकलं नाही आणि
सर्वांसमोर त्याला झाडावर लटकवण्यात आलं
आणि
तिथंच त्याचा मृत्यू झाला.
त्यावेळी शारदा म्हणते,
“पण हे कसं शक्य आहे? या पुस्तकात
जो
फोटो दिला आहे
तो
माझ्या प्रियकराचा आहे.
त्याला तर
मी
रोज
भेटते.
आम्ही दोघांवर खूप
प्रेम करतो.
मी
तर
या
पुस्तकातला याचा फोटो बघून तुमच्याकडे आले.”
“पोरी ही निसर्गाची
किमया म्हण किंवा आणखी काही म्हण.
हा
तोच
मुलगा आहे
की
ज्याच्यावर तू
प्रेम करतेस.”
“पण तुम्ही हे खात्रीने
कसं
सांगू शकता?”
त्यांनी एका
जुन्या कपाटातून फोटो काढला आणि
तिला दाखवला.
तो
फोटो तिचाच होता.
“ही आहे ती मुलगी जी त्या मुलावर प्रेम करायची आणि तिनं त्याला वाचवण्याचा
प्रयत्न केला.”
तो
फोटो शारदाचाच होता.
“
म्हणून तर
मी
तुला पहिल्यांदा दाराशी पाहिलं तेंव्हा घाबरलो होतो.
मन
सुन्न झालेल्या अवस्थेत शारदा तेथून निघून गेली.
मनात असंख्य प्रश्न निर्माण झालेले होते.
रवी
मेलेला आहे
ही
गोष्ट धरुन चालल्यास घडलेल्या बाकी सर्व गोष्टीचा योग्य तो
मेळ
बसत
होता.
शारदाला ही
गोष्ट पूर्णपणे पटली की
रवी
जिवंत नाहीये.
रात्र झाली. शारदा पुन्हा रवीला भेटण्यासाठी त्याच झाडाजवळ आली होती. आज पुन्हा उशीर… अगं किती वेळ तू उशीर करतेस? आणि हे डाव्या हाताला कापड कसलं बांधलंस. रवी मला तुला काहीतरी विचारायचं आहे? मला
खरं
खरं
सांगशील.
हो,
विचार नक्की खरं
खरं
सांगेन.
तुझा जन्म केंव्हाचा?
रवी
म्हणतो,
“शेवटी तुला सगळं कळलं तर… अगं मला असं तिरक्या नजरेने का विचारतेस? सरळ सरळ विचार ना. होय, मी एक आत्मा आहे. मी तुला सगळं खरं खरं सांगतो.”
शारदा म्हणते,
“त्याची गरज नाही. मला सगळं ठाऊक आहे. मला फक्त एवढंच सांग, तू मला तुझ्याबरोबर
नेणार आहेस की
नाही?
मी
फक्त तू
जिथे जाशील तिथेच जायचं.
सांग…
मला
सोबत नेशील ना?”
“शारदा काय बोलतेस तू? मी तुझा जीव नाही घेऊ शकत. तुला कळत कसं नाही. असं काय करतेस तू? “जे काय करायचे आहे ते तासाभरापूर्वी
केलय मी.”
“काय???... काय केलंस तू?...”
शारदाने आपल्या डाव्या हाताला बांधलेलं कापड काढलं आणि
त्याला दाखवलं.
तिच्या हाताची नस
कापलेली होतील.
“अगं, काय केलंस हे तू? यानं तुझा जीव जाईल. चल…”
“थांब रवी, माझा जीव मी आधीच दिलाय तासाभरापूर्वी. मी ही आता जीवंत नाही. माझं शरीर मी मागे ठेवून आलेय. आता तरी मी तुझी होईल ना? आता तरी मला तुझ्यासोबत
नेशील ना?”
रवीने शारदाला एक
घट्ट मिठी मारली.
त्या मिठीतला ओलावा ते
दोघेही अनुभवत होते.
दोघांच्याही डोळ्यात अश्रू भरुन वाहत होते.
पण
ते
जमिनीवरही पडत
नव्हते,
हवेतच विरुन जायचे.
जस
काही त्यांचं अस्तित्व संपलय.
शारदा आणि
रवीसारखं…
बारा तासानंतर… शारदाला वाचणाची खूप आवड आहे. पण कामाच्या ओघामुळे गेले कित्येक दिवस तिला वेळच मिळाला नाही. पण आज तिला वेळ मिळालाय. म्हणून ती स्वातंत्रयपूर्व काळापासून असलेल्या एका ग्रंथालयात गेली. तिथल्या धुळखात पडलेल्या बऱ्याच पुस्तकांच्या कपाटामध्ये ती सत्यकथांवर आधारीत असलेली पुस्तके शोधत होती. त्यामध्ये तिला एक पुस्तक मिळत जे पंचवीस वर्षापूर्वी घडलेल्या सत्य घटनावर आधारीत होतं. जेंव्हा ती ते पुस्तक उघडते तेंव्हा तिच्या पायाखालची जमिनच सरकते. तिच्या तोंडाचे पाणी पळते. अंगाचा थरकाप होतो. ती त्या पुस्तकातली काहीच पाणी उलघडते. त्यानंतर ती ते पुस्तक घेऊन या पुस्तकाच्या लेखकाला भेटण्याची इच्छा ती तिथल्या ग्रंथपालांसमोर व्यक्त करते. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीद्वारे ते शारदाला लेखकाचा पत्ता देतात. तो लेखक तेथून फक्त दोन तासांच्या अंतरावर असतो. शारदा लवकरच त्याच्या घरी पोहचते.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा