एक राजा होता.
त्याला एक
सुंदर मुलगी होती.
राजाचे आपल्या मुलीवर खूप
प्रेम होते.
एकदा ती
राजकन्या एका
राजकुमाराच्या प्रेमात पडली.
तिने ही
गोष्ट आपल्या वडीलांना सांगितली.
राजाने तिला विचारले,
“किती प्रेम करतेस त्याच्यावर?”
ती
म्हणाली,
“मी त्याच्याशिवाय
जगूच शकत
नाही.”
राजाने त्यांच्या प्रेमाची परीक्षा घ्यायचे ठरवले.
त्याने राजकुमाराला बोलावून घेतले. राजकन्या खूश झाली. पण राजाच्या मनात काहीतरी वेगळे होते. राजकुमार आल्यावर राजाने सैनिकांना आदेश दिला की, “ह्या राजकुमाराला
आणि
राजकन्येला एकमेकांच्या मिठीत एका
खांबाला घट्ट बांधून तळघरात डांबून ठेवा.
अन्न देऊ
नका.
राजकुमार आणि
राजकन्या आश्चर्यचकित झाले.
पण
आता
एकमेकांच्या मिठीत राहायला मिळणार म्हणून खूप
खूश
झाले.
त्यांनी एकमेकांना मिठीत घेतले आणि
सैनिकांनी त्यांना डांबून तळघरात कोंडले.
पहिल्या दोन
तासांत एकमेकांच्या नजरेत पाहून बरेच काही सांगून घेतले.
पुढच्या दोन
तासांत एकमेकांच्या मिठीत सुखी संसाराची स्वप्ने बघितली.
“आपण हे करु, आपण ते करु, हे घेऊ, ते घेऊ असे बरेच काही…”
पुढच्या तासांत तळघरातल्या गरमीने दोघे घामाघूम झाले. घामाने चिपचिपीत झालेली त्यांची शरीरे ओलचिंब झाली. मिठीत असल्याने जरा जास्तच गरम होऊ लागले आणि बांधल्यामुळे लांबही होत येता नव्हते. उपाशी पोटात कावळे ओरडत होतेच. हळू हळू दोघांची चिडचिड वाढली. “जरा हात बाजूला कर ना, मला गरम होताय.” “अगं, मग मी काय थंड हवेत मजा करतोय का? मलाही गरम होतयं” “आधी गरम होतय आणि त्यात तू डोक फिरवू नको हं.” “मी डोकं फिरवतोय?” “जरा शांत रहा रे… उभे राहून माझे पाय दुखतायेत… तुला काय?” “मी काय मग सिंहासनावर बसलोय का?” “उगाच बोलत बसू नको. मला जरा शांत राहू दे.” “गप्प बस जरा, किती बोलतेस तू.” थोड्या वेळापूर्वी स्वर्ग वाटलेली मिठी नरकापेक्षा जास्त त्रासदायक वाटू लागली. “बाजूला हो रे…… काढा मला कोणीतरी इथून बाहेर.” “ये………… मला पण काही जास्त मजा नाही येतं तुझ्या मिठीत. तुझे तोंड बघायची पण इच्छा नाही माझी.” “मला तर कुठे इच्छा आहे तुझे थोबाड बघायची.” थोड्या वेळाने राजा तळघरात आला. आणि दोघांनाही विचारले की, “आता काय म्हणणे आहे तुमचे?” दोघेही एकाच स्वरात एकत्र जोरात ओरडून म्हणाले की, “सोडा आम्हांला, एक क्षण पण सोबत जगू शकत नाही आम्ही.”
मी प्रेमाच्या विरोधात नाही. सुंदर जगायचे तर कोणाची ना कोणाची तर साथ हवीच. पण… कोणाशिवाय कोणाचे काही अडतही नाही. दूर गेल्यावर हूर हूर होते मनाची… मान्य आहे. पण वेळेसोबत सगळे ठीक होते. प्रेमामध्ये जितका जास्त सामंजस्यपणा असेल तितकेच प्रेम अधिक टिकते. कितीही वाईट परिस्थिती आली किंवा वाईट अनुभव आले तरी एकमेकांची साथ शेवटच्या क्षणापर्यंत सोडायची नसते. जर असे झाले तरच प्रेम टिकते नाहीतर नुसत्या दिखाव्याच्या प्रेमाला काहीही अर्थ नसतो. देव जन्माला घालताना पण एकटा जीव जन्माला घालतो आणि मरताना एकटाच जीव घेऊन जातो.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा