बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

93. दोघांपैकी एकाची निवड

    अंजली म्हणते, हो विशाल. तू चांगला मुलगा आहेस. पण मी राहूलला सोडू शकत नाही. कारण राहूलच्या हृदयाला छिद्र आहे. आणि त्याच्याकडे कमी दिवस राहिलेले आहेत. त्याचे राहिलेले आयुष्य मी त्याच्याबरोबर राहावे अशी आमची दोघांची इच्छा आहे. कारण आमचे प्रेम खरे आहे. विशाल म्हणतो, माझे पण तुझ्यावर खरे प्रेम आहे. त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल. अंजली म्हणते, राहूलकडे कमी आयुष्य आहे म्हणून मी त्याला सोडून तुझ्याबरोबर येऊन खऱ्या प्रेमाचे नाव खराब नाही करु शकत. म्हणून मला माफ कर.

(दहा दिवसानंतर)

        राहूल म्हणतो, अंजली एक आनंदाची बातमी आहे. मी हृदय नवीन बसवून घेतले आहे. दोघेही खूप खूश झाले. तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक पत्र दिले. त्या पत्रात लिहले होते की, अंजली मी तुमच्या प्रेमामध्ये येऊ शकत नाही. पण तुझ्यावर प्रेम करणेही थांबवू शकत नाही आणि तुझ्याशिवाय जगूसुध्दा शकत नाही. म्हणून मी माझे हृदय राहूलला दिले आहे. फक्त एका छोट्याशा अपेक्षेने की मलाही तुझे प्रेम मिळत राहील. माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि आता तुम्हां दोघांना उदंड आयुष्य लाभू दे.

फक्त तुझाच
स्वर्गवाशी (हृदयवासी) विशाल.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...